वाढत्या वयात चेहऱ्यावरील ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. आहारात कधी महागडा डाएट घेतला जातो तर कधी वेगवेगळ्या डिटॉक्स पेयांचे सेवन केले. पण हे सर्व उपाय करून सुद्धा चेहऱ्यावर कोणताच फरक दिसून येत नाही. याला धावपळीची जीवनशैली कारणीभूत करते. आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. वयाच्या विशीनंतर शरीर आणि मन दोन्ही घडते. याच काळात महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्यामुळे यादिवसांमध्ये आहारात खाल्ले अन्नपदार्थ आणि जीवनशैलीचा थेट परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. फास्टफूड, अनियमित झोप, ताण, आणि पोषणाचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींमुळे कमी वयात शरीराला गंभीर आजारांची लागण होते.(फोटो सौजन्य – istock)
‘या’ आजारात हाडे होतात पोकळ, फ्रॅक्चरचा धोका झपाट्याने वाढतो, Bone Density कशी वाढवायची?
शरीरात निर्माण झालेल्या पोषणाच्या अभावामुळे सांधेदुखी, हाडांची झीज, हार्मोनल असंतुलन किंवा त्वचेवरील वृद्धत्वाच्या खुणा इत्यादी लक्षणे त्वचेवर दिसून येतात. त्यामुळे शरीरासह काळजी घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला वाढत्या वयात चेहऱ्यावरील ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे आहारात सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात आणि आरोग्य सुधारते. तसेच चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा येतो.
थंडगार दही खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये लोक दह्याचे सेवन करतात. दह्यासोबतच ताक, लस्सी इत्यादी पदार्थ सुद्धा खाल्ले जातात. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी दही खाल्ले जाते. तसेच दह्यामध्ये असलेल्या कॅल्शियममुळे हाडांचे आरोग्य कायमच हेल्दी राहते. सांधेदुखी आणि हाडांची झीज झाल्यास आहारात दह्याचे न चुकता सेवन करावे. आहारात कॅल्शियम असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास चेहऱ्यावर सुद्धा चमकदार ग्लो दिसून येईल. दही, रवा, नाचणी, पनीर किंवा तीळ यांसारखे पदार्थ नियमित खावे.
शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी पालक आणि बीटचा रस प्यावा. यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघते. नियमित बीटचा रस प्यायल्यास थकवा, केसगळती आणि अनियमित मासिक पाळी इत्यादी सर्वच त्रासांपासून सुटका मिळेल. याशिवाय आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पालकच्या भाजीचे किंवा पालक सूपचे सेवन करावे. पालक, बीट, हरभरा, छोले, डाळी किंवा मनुके इत्यादी पौष्टिक पदार्थ खाल्ल्यास शरीरात रक्ताची कमतरता कधीच निर्माण होणार नाही.
नियमित व्यायाम, ध्यान किंवा प्राणायाम केल्यास दीर्घकाळ तरुण राहाल. व्यायाम केल्यामुळे शरीराच्या सर्वच अवयवांपर्यंत रक्तपुरवठा व्यवस्थित होतो आणि आरोग्य सुधारते. दिवसभर काम करून थकलेल्या शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते. त्यामुळे नियमित ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे आवश्यक आहे. झोपल्यामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि आरोग्य सुधारते.