Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केस होतील घनदाट, लांबसडक आणि मजबूत, तांदूळ-मेथीचा मास्क करेल कमाल

Hair Growth Tips: घरच्या घरी भात आणि मेथी दाणे सहज उपलब्ध होतात. यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही. केस धुण्यासाठी नैसर्गिक घटकांचा वापर केल्याने टाळू आणि केसांचे आरोग्य सुधारू शकते. भात आणि मेथी दाण्याचा मास्क कसा वापरावा जाणून घ्या.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 09, 2024 | 12:09 PM
केसांची काळजी घेण्यासाठी हेअर मास्क

केसांची काळजी घेण्यासाठी हेअर मास्क

Follow Us
Close
Follow Us:

तांदळाचे पाणी चेहऱ्यासाठी खूप चांगले मानले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का की तांदळाचा मास्क देखील तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी खूप चांगले काम करू शकतो. तांदळात अनेक पोषक घटक असतात जे तुमच्या केसांसाठी खूप चांगले असतात. तुम्ही जर भातामध्ये मेथीचे दाणे मिसळून मास्क तयार केलात तर केसांसाठी उत्तम ठरते. 

साधारणपणे केसांसाठी लोक तांदूळ आणि मेथीचे पाणी वेगळे वापरतात. पण जर तुम्ही ते एकत्र करून मास्क बनवला तर केसांशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळू शकतो. यामुळे कोंडा, फिकट केस, केसांची चमक आणि केस गळणे या समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होतात. ब्युटिशियन स्मिता कांबळे यांनी हा सोपा उपाय सांगितला आहे. (फोटो सौजन्य – iStock) 

केसांसाठी मेथीचे फायदे

केसांसाठी मेथीचा कसा होतो फायदा

केसगळती थांबवण्यासाठी आणि केसांची लांबी वाढवण्यासाठी मेथी दाणे खूप प्रसिद्ध आहेत. मेथी दाणे हे लोह आणि प्रथिनांचे चांगले स्त्रोत आहेत, जे केसांच्या वाढीसाठी खूप चांगले पोषक आहेत. याशिवाय मेथीच्या दाण्यांमध्ये फॉलिक ॲसिड, विटामिन ए, के आणि सी भरपूर प्रमाणात असतात, तुम्हाला पोटॅशियम आणि कॅल्शियमसारखी खनिजेही चांगल्या प्रमाणात मिळू शकतात. त्यामुळे हा मेथीचा मास्क तुम्हाला कुरळ्या केसांमधील गुंतागुंत, चिकट केस आणि केसगळती टाळण्यास मदत करू शकतो.

केसांसाठी तांदळाचे फायदे

केसांसाठी तांदळाचा कसा होतो फायदा

तांदळाची पेस्ट केसांच्या अनेक समस्या दूर करू शकते. तांदळामध्ये जीवनसत्त्वे, अमीनो ॲसिडस् आणि झिंक, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी आणि सी यांसारख्या खनिजे अधिक प्रमाणात आढळतात. याशिवाय तांदळात अँटीऑक्सिडंट्सही मुबलक प्रमाणात असतात. तांदळाचे पाणी केसांची लवचिकता सुधारण्यास मदत करते. 

तांदळाचे पाणी वापरल्याने तुमचे केसांमध्ये गुंता जास्त प्रमाणात होत नाही. तसंच दाट, सुटसुटीत आणि मुलायम केसांचे स्वप्न तांदळामुळे पूर्ण होऊ शकते. तांदळाचे पाणी कंडिशनरचे काम करते, ज्यामुळे तुमचे केस अधिक नितळ दिसतात.

मास्क बनविण्यासाठी साहित्य 

  • 2 चमचे तांदूळ
  • 1 मोठा चमचा मेथीचे दाणे
  • 1 कप पाणी
असा बनवा मेथी-तांदळाचा मास्क 

हेअर मास्क बनविण्याची पद्धत

  • 2 चमचे तांदूळ आणि 1 चमचे मेथी दाणे रात्रभर पाण्यात वेगळ्या भांड्यात भिजत ठेवा
  • जोपर्यंत तुम्हाला गुळगुळीत पेस्ट मिळत नाही तोपर्यंत भिजवलेले तांदूळ आणि मेथीचे दाणे वेगवेगळे मिक्स करा
  • एका भांड्यात तांदळाची पेस्ट आणि मेथीची पेस्ट मिक्स करा आणि घोटून घ्या
  • हा मास्क तुमच्या केसांना टाळूपासून केसांच्या टोकापर्यंत नीट लावा. केसांवर काही वेळ, 20 ते 30 मिनिटे मास्क ठेवा
  • आपले केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा, कारण यामुळे टाळूची छिद्रे उघडण्यास मदत होईल, ज्यामुळे मास्क केसांमध्ये चांगले शोषले जाईल
  • केस नैसर्गिकरित्या सुकू द्या आणि तुम्हाला योग्य परिणाम दिसेल. आठवड्यातून एक वेळ तुम्ही याचा वापर करू शकता 
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Rice and methi seeds mask for hair growth how to use

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2024 | 12:05 PM

Topics:  

  • hair care
  • hair care tips

संबंधित बातम्या

केसगळती थांबवायची तर कांद्याच्या रसात मिसळा ‘हे’ दोन घटक, मास्टरशेफ पंकज भदोरियाने सांगितला प्रभावी घरगुती उपाय
1

केसगळती थांबवायची तर कांद्याच्या रसात मिसळा ‘हे’ दोन घटक, मास्टरशेफ पंकज भदोरियाने सांगितला प्रभावी घरगुती उपाय

केसांची होईल घनदाट वाढ! केस गळती थांबवण्यासाठी घरीच बनवा आवळा कढीपत्त्याचे ड्रिंक, जाणून घ्या सविस्तर
2

केसांची होईल घनदाट वाढ! केस गळती थांबवण्यासाठी घरीच बनवा आवळा कढीपत्त्याचे ड्रिंक, जाणून घ्या सविस्तर

महागड्या- केमिकल युक्त कंडिशनरचा वापर करण्याऐवजी १० रुपयांमध्ये घरीच बनवा नॅचरल हेअर मास्क, केस होतील मुलायम
3

महागड्या- केमिकल युक्त कंडिशनरचा वापर करण्याऐवजी १० रुपयांमध्ये घरीच बनवा नॅचरल हेअर मास्क, केस होतील मुलायम

केस खूप जास्त पातळ झाले आहेत? मग खोबरेल तेलात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांच्या समस्या होतील कायमच्या गायब
4

केस खूप जास्त पातळ झाले आहेत? मग खोबरेल तेलात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांच्या समस्या होतील कायमच्या गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.