
केस खूप जास्त पातळ झाले आहेत? मग खोबरेल तेलात मिक्स करा 'हे' पदार्थ, केसांच्या समस्या होतील कायमच्या गायब
महिलांपासून ते अगदी पुरुषांपर्यंत सगळ्यांचं केसांच्या बऱ्याच समस्या उद्भवतात. केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस तुटणे तर काहीवेळा केसांमध्ये टक्कल पडण्याची जास्त भीती असते. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये दुर्लक्ष केले जाते. पण कालांतराने केसांमध्ये टक्कल पडून केस खूप जास्त पातळ वाटतात. त्यामुळे शरीरासोबतच केसांची काळजी घेणे फारच आवश्यक आहे. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर बऱ्याचदा महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या महागड्या हेअर केअर प्रॉडक्टचा आणि सीरामचा वापर करतात. पण याचा फारसा परिणाम केसांवर दिसून येत नाही. केसांची मूळ कमकुवत झाल्यानंतर केसांना वरून कितीही पोषण दिल्यास केसांच्या समस्या कमी होत नाही. त्यामुळे केसांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात आवळा, मेथी दाण्यांचा समावेश करावा. यामुळे केसांना भरपूर पोषण मिळते. यासोबतच नियमित केसांना तेल लावणे, केस स्वच्छ धुवणे, केसांची निगा राखणे फार आवश्यक आहे.आज आम्ही तुम्हाला केसांच्या लांबलचक वाढीसाठी आणि केस मुलायम सॉफ्ट होण्यासाठी खोबरेल तेलात कोणते पदार्थ मिक्स करून लावावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
वातावरणात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यासोबतच केसांवर सुद्धा लगेच दिसून येतो. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर केसांना पोषण देण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या हेअर सिरमचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. मागील बऱ्याच वर्षांपासून खोबरेल तेलाचा वापर केसांच्या वाढीसाठी केला जात आहे. यामध्ये असलेले गुणकारी घटक केस मुळांपासून चमकदार करण्यास मदत करतात. लांब आणि घनदाट केसांसाठी घरी तयार केलेले हेअर ऑइल लावावे. यामुळे केसांना कोणतीही हानी पोहचत नाही केस चमकदार राहतात.
हेअर ऑइल बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये मेथी दाणे घेऊन त्यात पाणी टाका आणि रात्रभर भिजत ठेवा. सकाळी भिजलेले मेथी दाणे पाण्यातून काढून मंद आचेवर शिजवून घ्या. शिजवलेले मेथी दाणे थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. मेथी दाणे नारळाच्या तेलात शिजवावे. यामुळे केसांना पोषण मिळते. तयार केलेल्या तेलाचा वापर आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा करावा. रात्री झोपण्याआधी केसांना तेल लावून हलक्या हाताने मसाज करावा. मसाज केल्यामुळे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते आणि केस मजबूत होतात.
मेथी दाण्यांचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी सुद्धा केला जातो. यामध्ये असलेले गुणकारी घटक केसांच्या मुळांना आवश्यक पोषण देतात. मेथी दाण्यांमध्ये प्रोटीन, निकोटिनिक एसिड, लेसिथिन, विटामिन ए, बी आणि सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. मेथी दाण्याच्या वापरामुळे नवीन केस उगवतात आणि केसांची झपाट्याने वाढ होते. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर इतर कोणतेही उपाय करण्याऐवजी मेथी दाण्यांचा वापर करून बनवलेले तेल केसांवर नियमित लावावे.