Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लांब आणि चमकदार केसांचे सीक्रेट आहे तांदळाचे पाणी, फक्त योग्य प्रकारे वापरण्याची पद्धत जाणून घेऊया

केसगळती, कोरडेपणा आणि मंद वाढ या समस्यांनी त्रस्त असाल, तर महागड्या उत्पादनांऐवजी घरगुती उपायही प्रभावी ठरू शकतात. तांदळाचे पाणी हे केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी वापरले जाणारे एक लोकप्रिय नैसर्गिक उपाय मानले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 28, 2026 | 08:15 PM
लांब आणि चमकदार केसांचे सीक्रेट आहे तांदळाचे पाणी, फक्त योग्य प्रकारे वापरण्याची पद्धत जाणून घेऊया

लांब आणि चमकदार केसांचे सीक्रेट आहे तांदळाचे पाणी, फक्त योग्य प्रकारे वापरण्याची पद्धत जाणून घेऊया

Follow Us
Follow Us:
  • तांदळाच्या पाण्यातील पोषक घटक केसांच्या मुळांना पोषण देऊन त्यांना मजबूत करण्यास मदत करतात.
  • साधे, आंबवलेले तांदळाचे पाणी किंवा हेअर पॅक अशा विविध पद्धतींनी याचा वापर करता येतो.
  • नियमित वापरामुळे केसांची नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यास आणि केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.
केसगळती अनेकांसाठी त्रासदायक ठरते. कोरडेपणा आणि केसांची मंद वाढ या समस्या आजकाल फार सामान्य झाल्या आहेत. महिलाच काय तर पुरुषांनाही केसांच्या समस्येचा सामना करावा लागतो. बरेच लोक केसांच्या समस्या दूर करण्यासाठी महागड्या प्रोडक्ट्सची किंवा पार्लर ट्रीटमेंटची मदत घेतात. पण यात बरेच पैसे खर्च होतात. शिवाय अशा ट्रीटमेंट किंवा हेअर प्रोडक्ट्समध्ये काहीसा रासायनिक पदार्थांचाही वापर केलेला असतो ज्यामुळे केस डॅमेज होण्याची शक्यता असते.

अंघोळ केल्यानंतर सुद्धा अंगाला वास येतो? शरीरसंबंधित ‘या’ समस्यांमुळे वाढतो दुर्गंधीचा धोका, वेळीच करा उपचार

यासाठीच आम्ही तुम्हाला सुचवतो की, केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही महागड्या गोष्टींऐवजी तांदळाच्या पाण्याचा वापर करु शकता. होय, हे खरं आहे. मागे सोशल मिडियावर कोरीयन स्किन केअर खूप जास्त व्हायरल झाला होता. यात तांदळाच्या पाण्याचा चेहऱ्यावर वापर केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का? या पाण्याचा तुम्ही तुमच्या केसांवरही वापर करु शकता. तांदळाचे पाणी केसगळी थांबवून केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.

हिवाळ्यात अनेक आशियाई देशांमध्ये तांदळाच्या पाण्याचा वापर केला जातो. केसांना मजबूत बनवण्यासाठी, केसांची वाढ करण्यासाठी आणि त्यांना नैसर्गिक चमक मिळवून देण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर केला जाऊ शकतो. यातील व्हिटॅमिन बी, सी, ई आणि अमिनो ॲसिड केसांच्या मुळांचे पोषण करून त्यांना आतून मजबूत करतात. चला योग्य प्रकारे केसांवर तांदळाच्या पाण्याचा वापर कसा करावा ते जाणून घेऊया.

केसांवर कसा करायचा तांदळाच्या पाण्याचा वापर?

साधं तांदळाचं पाणी

यासाठी एक कप तांदूळ पाण्याने धुवून मग त्यांना २-३ कप पाण्यात ३० मिनिटे भिजवून ठेवा. आता या पाण्याला गाळून घ्या. तुम्हाला हे तांदळाचे पाणी फेकायचे नाही आहे तर याचा आपल्या केसांवर वापर करायचा आहे. शॅम्पू लावल्यानंतर, हे पाणी टाळूवर लावून केसांना हलक्या हाताने मसाज करा. ५-१० मिनिटांनंतर साध्या पाण्याने केस धुवा.

आंबवलेले तांदळाचे पाणी

यासाठी तांदळांना किमान २४ तास पाण्यात भिजवून ठेवा, जेव्हा यातून हलका आंबट सुगंध येऊ लागेल तेव्हा समजून जा की तुमचे तांदळाचे पाणी तयार आहे. आता या पाण्याला फ्रिजमध्ये साठवून ठेवा. आंबवलेल्या पाण्यात अँटीऑक्सीडंट्स जास्त असतात, जे केसांच्या मुळांना मजबूत करण्यास मदत करतात.

तांदळाच्या पाण्याचा हेअर पॅक

यासाठी तांदळाच्या पाण्यात एक चमचा कोरफड जेल आणि नारळाचे तेल मिसळा. आता हे पाणी केसांच्या मुळांवर लावून हळूहळू व्यवस्थित मसाज करा. केसगळती थांबण्यासाठी, केसांची वाढ होण्यासाठी आणि डॅमेज केसांना दुरुस्त करण्यासाठी याची मदत होते.

या ठिकाणी झाली विक्रांत मेस्सीच्या ‘मुसाफिर कॅफे’ चित्रपटाची शुटिंग, ठिकाणाची सुंदरता अनेकांना करते मोहित

तांदळाच्या पाण्याचा स्प्रे

हा स्प्रे केसांवर लावून १० मिनिटे तसाच राहू द्या आणि मग शॅम्पूने केसांना धुवून काढा. स्प्रे तयार करण्यासाठी तांदळाच्या पाण्याला स्प्रे बाटलीत भरुन स्टोर करा आणि मग हवं तेव्हा त्याचा वापर करा.

Web Title: Rice water for hair growth how to use rice water to reduce hair fall naturally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • hair care
  • lifestyle news
  • rice water

संबंधित बातम्या

बुटांमधून येणाऱ्या दुर्गंधीने वैतागलायत? ‘या’ ३ सोप्या टिप्स वापरा आणि कायमची सुटका मिळवा
1

बुटांमधून येणाऱ्या दुर्गंधीने वैतागलायत? ‘या’ ३ सोप्या टिप्स वापरा आणि कायमची सुटका मिळवा

रूम फ्रेशनरचा वापर करताय? ‘या’ गंभीर आजारांचा वाढतोय धोका; जाणून घ्या आरोग्यासाठी किती आहे घातक!
2

रूम फ्रेशनरचा वापर करताय? ‘या’ गंभीर आजारांचा वाढतोय धोका; जाणून घ्या आरोग्यासाठी किती आहे घातक!

Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा ‘हा’ देशी फॉर्म्युला करेल कमाल!
3

Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा ‘हा’ देशी फॉर्म्युला करेल कमाल!

Parelcha Raja: भव्यदिव्य मूर्ती आणि समाजकल्याणकारी उपक्रम, परेलचा राजा इतिहास
4

Parelcha Raja: भव्यदिव्य मूर्ती आणि समाजकल्याणकारी उपक्रम, परेलचा राजा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.