अंघोळ केल्यानंतर सुद्धा अंगाला वास येतो? शरीरसंबंधित 'या' समस्यांमुळे वाढतो दुर्गंधीचा धोका, वेळीच करा उपचार
वर्षाच्या बाराही महिने शरीराला खूप जास्त घाम येतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत्या उष्णतेमुळे आणि पावसाळ्यात वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे शरीराला घाम येतो. घामावाटे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. पण बऱ्याचदा काहींच्या शरीराला अंघोळ केल्यानंतर सुद्धा खूप जास्त घाम येतो आणि अंग पूर्णपणे ओलं होऊन जात. घामाला कोणताही वास नसतो. पण त्वचेमध्ये वाढलेल्या इन्फेक्शनमुळे किंवा शरीरातील विषारी घटकांमुळे घामाला दुर्गंधी येते. गरमी, तणाव, एक्सरसाईज किंवा हार्मोनल बदल इत्यादी अनेक बदलांमुळे अंगाला घामाचा खूप जास्त वास येतो. काहीवेळा सतत येणाऱ्या घामाला अंगाला कुबट वास येतो, ज्यामुळे महिलांचा आत्मविश्वास कमी होण्याची जास्त शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला अंघोळ केल्यानंतर सुद्धा अंगाला घामाचा वास का येतो? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
भुवयांचे केस गळून पातळ झाले आहेत? मग नॅचरली आयब्रो आणि काळे करण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय
काखेच्या स्वच्छतेकडे व्यवस्थित लक्ष न दिल्यास घामाचा वास येण्याची जास्त शक्यता असते. कारण काखेतील घामाच्या ग्रंथी अधिक सक्रिय असतात, ज्यामुळे काखेत बॅक्टेरिया वेगाने वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पाण्याने अंघोळ करणे सुद्धा पुरेसे नसते. काखेची स्वच्छता ठेवणे फार आवश्यक आहे. अंघोळ करून झाल्यानंतर कोरड्या कपड्याने अंग स्वच्छ करावे. ओलावा तसाच राहिल्यामुळे बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता जास्त असते.
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी शरीरावर लगेच परिणाम करतात. दैनंदिन आहारात सतत तिखट, तेलकट किंवा अतिप्रमाणात आंबट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. जास्त मसालेदार पदार्थ, कांदा, लसूण, दारू किंवा पॅक बंद पदार्थ खाल्ल्यामुळे आरोग्य बिघडते. शरीराच्या पचनक्रियेवर परिणाम झाल्यानंतर शरीर व्यवस्थित डिटॉक्स होत नाही, ज्याचा परिणाम शरीरावर लगेच होतो.
कपड्यांवर जमा झालेले बॅक्टेरिया दुर्गंधीचे कारण ठरते. त्यामुळे अंगावर स्वच्छ आणि व्यवस्थित कोरडे केलेले कपडे घालावेत. याशिवाय घामाने भिजलेल्या कपड्यामुळे खूप जास्त दुर्गंधीचा वास येण्याची शक्यता असते. त्यामुळे घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी कायमच कोरडे आणि कॉटनचे कपडे परिधान करावेत. सिंथेटिक फॅब्रिक असलेले कपडे घाम आणि गंध जास्त पकडून ठेवतात. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये स्वच्छ आणि कोरडे कपडे घालावेत.






