Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचे पाणी त्वचेसाठी ठरेल प्रभावी, ग्लोइंग त्वचेसाठी करून पहा सोपा घरगुती उपाय

तांदळाचे पाणी त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहे. या पाण्याचा वापर कोरियन स्किन केअरमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे पिंपल्स किंवा मुरुमांची समस्या उद्भवू लागल्यानंतर तांदळाच्या पाण्याचा वापर करून त्वचा स्वच्छ करावी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 08, 2025 | 09:43 AM
स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचे पाणी त्वचेसाठी ठरेल प्रभावी

स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचे पाणी त्वचेसाठी ठरेल प्रभावी

Follow Us
Close
Follow Us:

रोजच्या आहारात भाताचे सेवन सगळेच करतात. जेवणात जर भात नसेल तर जेवण जेवल्यासारखे वाटत नाही. त्यामुळे दैनंदिन आहारात भाताचे नियमित सेवन केले जाते. भात खाल्यानंतर पोटही लवकर भरते. जेवणात वापरल्या जाणाऱ्या तांदळाचा वापर केवळ खाण्यासाठीच नाहीतर आरोग्य आणि त्वचेसाठी सुद्धा केला जातो. तांदळाच्या पाण्याचा वापर करून त्वचेवर पिंपल्स, मुरूम घालवले जातात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक महिला डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करतात. मात्र काहीवेळा चुकीचे स्किन केअर रुटीन फॉलो केल्यामुळे त्वचेची मोठ्या प्रमाणात नुकसान होते.(फोटो सौजन्य – iStock)

वाढत्या उष्णतेमुळे तळपायांची आग होते? ‘या’ पद्धतीने करा कापूरचा तेलाचा वापर, त्वचा राहील कायम थंड

त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या केमिकल प्रॉडक्टचा वापर करतात, तर काही महिला वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट करून घेतात. यामुळे जास्त काळ त्वचा सुंदर दिसत नाही. त्वचेमध्ये होणाऱ्या बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्वचा सुधारण्यासाठी वेगवेगळ्या क्रीम लावण्याऐवजी आहारात विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तांदळाच्या पाण्याचा वापर कशा प्रकारे त्वचेसाठी करावा?यामुळे स्किनला काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

तांदळाचे पाणी तयार करण्याची कृती:

त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करावा. तांदळाच्या पाण्यात असलेले गुणधर्म त्वचा सुधारण्यासाठी मदत करतात. तांदळाचे पाणी तयार करण्यासाठी सर्वप्रथम अर्धा वाटी तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून मोठ्या वाटीभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर ५ ते ६ तास पाण्यात तांदूळ भिजल्यानंतर टोपात पाणी ओतून काहीवेळ उकळवून घ्या. त्यानंतर तयार केलेले पाणी थंड करून नियमित चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.

तांदळाच्या पाण्याचे त्वचेला होणारे फायदे:

तांदळाच्या पाण्याचा वापर त्वचेसाठी केल्यामुळे चेहरा अधिक सुंदर आणि उजळदार दिसतो. त्वचेसंबंधित सर्व समस्या दूर होतात. या पाण्यात विटामिन बी, सी आणि ई इत्यादी अनेक घटक आढळून येतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स किंवा मुरुमांचे काळे डाग घालवण्यासाठी तांदळाचे पाणी अतिशय प्रभावी ठरते. या पाण्यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे त्वचेमध्ये होणारी जळजळ कमी होते आणि चेहरा फ्रेश सुंदर दिसू लागतो. उन्हाळ्यात त्वचेमध्ये वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करावा. यामुळे त्वचेवरील रॅश आणि रेडनेस कमी होईल.

७ दिवसांमध्ये होईल आरशासारखी चमकदार त्वचा! नियमित ‘या’ पद्धतीने करा कोरफड जेलचा वापर, त्वचा होईल मऊ

तांदळाच्या पाणी त्वचा हायड्रेट ठेवते. याशिवाय त्वचा मॉइश्चराइज ठेवण्याचे काम तांदळाचे पाणी करते. त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करावा. त्वचा मुलायम आणि मऊ ठेवण्यासाठी तांदळाचे पाणी वापरावे. वाढत्या वयात त्वचेमध्ये सुरकुत्या वाढू लागतात, या सुरकुत्या कमी करण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Rice water from the kitchen will be effective for the skin try this simple home remedy for glowing skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 09:43 AM

Topics:  

  • rice water
  • skin care tips
  • summer heat

संबंधित बातम्या

७ दिवसात कमी होतील चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स आणि काळे डाग! कडुलिंबाच्या पानांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल स्वच्छ
1

७ दिवसात कमी होतील चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स आणि काळे डाग! कडुलिंबाच्या पानांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल स्वच्छ

चेहऱ्यावर आलेले काळे डाग- वांग होतील कायमचे गायब! ‘या’ पद्धतीने करा जायफळाचा वापर, आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपाय
2

चेहऱ्यावर आलेले काळे डाग- वांग होतील कायमचे गायब! ‘या’ पद्धतीने करा जायफळाचा वापर, आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपाय

महागड्या आय-क्रीम लावणे कायमचे जाल विसरून! १० रुपयांच्या खोबरेल तेलाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, चेहरा दिसेल फ्रेश
3

महागड्या आय-क्रीम लावणे कायमचे जाल विसरून! १० रुपयांच्या खोबरेल तेलाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, चेहरा दिसेल फ्रेश

१० दिवसांमध्ये चेहऱ्यावर दिसून येईल सोन्यासारखी चमक! ‘या’ घरगुती तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचा राहील तरुण
4

१० दिवसांमध्ये चेहऱ्यावर दिसून येईल सोन्यासारखी चमक! ‘या’ घरगुती तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचा राहील तरुण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.