'या' पद्धतीने करा कापूरचा तेलाचा वापर
वाढत्या उष्णतेचा परिणाम आरोग्यासह त्वचेवरसुद्धा लगेच दिसून येतो. वाढलेल्या उष्णतेमुळे तळपायांची आग होते, हाताची साल जाणं इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. मात्र असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. योग्य ते स्किन केअर रुटीन आणि हेल्थ केअर रुटीन फॉलो करणे आवश्यक आहे. शरीरात वाढलेली उष्णता कोणत्या ना कोणत्या प्रकारे शरीरातून बाहेर पडते. डिहायड्रेशनची समस्या वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होऊन आरोग्य सुधारते.(फोटो सौजन्य – iStock)
७ दिवसांमध्ये होईल आरशासारखी चमकदार त्वचा! नियमित ‘या’ पद्धतीने करा कोरफड जेलचा वापर, त्वचा होईल मऊ
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तळपायांची वाढलेली आग कमी करण्यासाठी कापूरचा वापर करावा. धार्मिक गोष्टींसाठी कापूरचा वापर केला जातो. यामध्ये असलेले घटक आरोग्यासह त्वचेसाठी सुद्धा अतिशय प्रभावी आहेत. उन्हाळ्यात अनेकांना सनबर्नचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी कापूरचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला कापूरचा तेलाचा वापर कशा प्रकारे करावा? यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात?याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
कापूर तेलाचा वापर केल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते आणि आराम मिळतो. यामध्ये असलेले अँटीबॅक्टरीयल गुणधर्म आणि अँटीफंगल गुणधर्म शरीरात वाढलेली उष्णता कमी करतात. याशिवाय शरीरातील दाह कमी करण्यासाठी कापूर तेलाचा वापर करावा. त्वचेमध्ये वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कापूरचे तेल तळपायांना लावावे. कापूरचा वापर ॲण्टी रिंकल कंपोनंट आणि कॉस्मेटिक्स तयार करण्यासाठी सुद्धा केला जातो. शरीरात उन्हामुळे वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कापूरच्या तेलाचा वापर करावा.
कापूर तेल तयार करण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये खोबऱ्याचे तेल घेऊन त्यात कापूर पावडर किंवा कापूरची वडी टाकून रात्रभर तशीच ठेवून घ्या. ८ तास झाल्यानंतर तेलाचा वापर तुम्ही करू शकता. तयार केलेले कापूर तेल तुम्ही चेहऱ्याला, कोरड्या पडलेल्या तळहातांना, तळपायांना लावून मसाज करू शकता. यामुळे त्वचेमधील उष्णता कमी होईल आणि शरीरात थंडावा वाढेल. वाढलेल्या उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी कापूर तेल अतिशय प्रभावी आहे.
कापूर फेसपॅक तयार करण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये कापूर पावडर घेऊन त्यात दही आणि मध मिक्स करून पेस्ट तयार करा. तयार करून घेतलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. मात्र कापूर फेसपॅक त्वचेला लावण्याआधी पॅच टेस्ट नक्की करून पहावी.