७ दिवसांमध्ये होईल आरशासारखी चमकदार त्वचा! नियमित 'या' पद्धतीने करा कोरफड जेलचा वापर
मागील अनेक वर्षांपासून कोरफडचा वापर त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी केला जात आहे. कोरफडमध्ये असलेले गुणधर्म त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतात. याशिवाय आयुर्वेदामध्ये कोरफडला विशेष महत्व आहे. दैनंदिन वापरात त्वचा आणि केसांच्या निरोगी आरोग्यासाठी कोरफडचा वापर केला जात आहे. कोरफड जेल आरोग्यासह त्वचा आणि केसांना अनेक फायदे होतात. त्वचेवर कोरफड लावल्यामुळे त्वचा हायड्रेड आणि उठावदार राहते. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, मुरूम आणि डाग घालवण्यासाठी कोरफड जेलचा वापर तुम्ही करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी कोरफड जेल त्वचेला लावल्यास त्वचा उजळदार होण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेरील उष्णता वाढल्यानंतर आरोग्यावर त्याचे परिणाम दिसून येतात. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे, मुरुम, धामोळ इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी रोजच्या वापरात कोरफड जेलचा वापर करावा. कोरफड जेल त्वचेसाठी अतिशय गुणकारी आहे. आज आम्ही तुम्हाला कोरफडचा वापर त्वचेसाठी कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे त्वचा अधिक सुंदर होईल.
उन्हाळ्यात शरीरात वाढलेले तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन केले जाते. तसेच त्वचा थंड राहण्यासाठी चेहऱ्यावर नियमित कोरफड जेल लावावे. यामध्ये असलेले गुणधर्म त्वचा हायड्रेट आणि चमकदार ठेवतात. यामध्ये असणारे अँटीसेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म त्वचेमध्ये होणारी जळजळ कमी करण्यासाठी मदत करतात. त्वचेसंबंधित संसर्गाचा धोका कमी होतो. चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग कमी करण्यासाठी कोरफड जेल हातांवर घेऊन नियमित चेहऱ्यावर मालिश करावी.
त्वचा तेलकट झाल्यानंतर वारंवार चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूम येऊ लागतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स त्वचा अधिक खराब आणि निस्तेज करून टाकतात. अशावेळी त्वचेमध्ये जळजळ कमी करण्यासाठी मुरुमांचे डाग घालवण्यासाठी कोरफड जेलमध्ये गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्यावर लावावे. यामुळे त्वचा उजळदार होते आणि त्वचेवर जमा होणारे अतिरिक्त तेल कमी होऊन त्वचा स्वच्छ दिसू लागते. कोरफड जेल त्वचेवरील छिद्र बंद होऊ न देत नाही. याशिवाय कोरफड जेल त्वचेवर नियमित लावल्यास त्वचेमध्ये ओलावा कायम टिकून राहतो.
उन्हामुळे शरीरावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, त्वचा होईल गोरीपान
नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून कोरफड जेलचा वापर चेहऱ्यासाठी केला जातो. यामध्ये असलेले गुणधर्म त्वचा अधिक सुंदर आणि स्वच्छ ठेवतात. यासाठी रात्री झोपण्याआधी वाटीमध्ये कोरफड जेल घेऊन त्यात मध मिक्स करा. तयार करून घेतलेले मिश्रण चेहऱ्यावर लावून रात्रभर तसेच ठेवा. त्यानंतर सकाळी उठून त्वचा स्वच्छ करून घ्या. यामुळे त्वचा हायड्रेट राहून त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहील.