Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rising Heat Problem: वाढत्या उन्हामुळे पुण्यात मुतखडा आणि मूत्रमार्गातील संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ

सध्या उन्हाळा म्हणजे सर्वात जास्त त्रासदायक झाला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ४० च्या वर पारा चढला आहे. याचाच परिणाम पुण्यात किडनी स्टोनच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे, जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 01, 2026 | 08:14 PM
उन्हाळ्यात किडनी स्टोनची समस्या का वाढतेय (फोटो सौजन्य - iStock)

उन्हाळ्यात किडनी स्टोनची समस्या का वाढतेय (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • उन्हामुळे पुण्यात मुतखड्याच्या आणि मुत्रमार्गातील संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ 
  • महाराष्ट्रात उन्हाच्या झळा 
  • काय सांगतात डॉक्टर 
उन्हाळ्यात तापमान झपाट्याने वाढत असताना, पुण्यात किडनीशी संबंधित आजारांमध्ये, विशेषतः किडनी स्टोन आणि मूत्रमार्गातील संसर्ग (UTI), यामध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, ही वाढ प्रामुख्याने शरीरातील पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन), जास्त घाम येणे आणि पुरेसे पाणी न पिणे यामुळे होत आहे.

उन्हाळ्यात शरीरातून घामाद्वारे अधिक प्रमाणात द्रव बाहेर जातो. ही कमतरता पुरेशा पाण्याने भरून न काढल्यास शरीर डिहायड्रेट होते आणि लघवीचा रंग दाटसर पिवळा दिसतो. यामुळे खनिजं आणि क्षारांचे स्फटिक स्वरुपात रुपांतर होते.यामुळे  किडनी स्टोन तयार होण्याची शक्यता वाढते. कमी पाणी पिणे आणि प्रायव्हेट भागाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका देखील वाढतो, विशेषतः महिलांमध्ये आणि वयोवृद्धांमध्ये या संसर्गाचे प्रमाण अधिक असते.

5 फूड जे किडनी स्टोनचा धोका वाढवतात…, तुमच्या आहारात यांचा समावेश तर नाही ना? वेळीच ताटातून वगळा ‘हे’ पदार्थ

काय आहे मुख्य कारण 

उन्हाळ्यात किडनी स्टोनच्या रुग्णांची संख्या वाढली असून यामागचे प्रमुख कारण म्हणजे जास्त घामामुळे होणारे डिहायड्रेशन ज्यामुळे मूतखडा तयार होतो. शरीरात पुरेसे पाणी नसल्यास लघवीतील खनिजे आणि क्षार स्फटिकरूप धारण करतात आणि त्यामुळे मूतखडा तयार होण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर, कमी पाणी पिण्यामुळे लघवीचे प्रमाण घटते, ज्यामुळे बॅक्टेरिया वाढण्यास अनुकूल वातावरण तयार होते आणि मूत्रमार्गातील संसर्ग वाढतो. 

सध्या किडनी स्टोन आणि मूत्रमार्गातील संसर्गाच्या रुग्णांमध्ये ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दर महिन्याला २५-५५ वयोगटातील १० रुग्णांपैकी सुमारे २ जणांना मूतखडा तर २-३ रुग्णांमध्ये मूत्रमार्गाचा संसर्ग आढळतो, अशी माहिती डॉ. पवन रहांदळे, युरोलॉजिस्ट, अपोलो स्पेक्ट्रा, पुणे यांनी दिली.

काय आहेत लक्षणे 

डॉ. पवन पुढे म्हणाले, रुग्णांमध्ये सामान्यतः कमरेच्या खालच्या भागात किंवा बाजूला तीव्र वेदना होतात , लघवी करताना जळजळ होते, वारंवार लघवी लागणे, ताप आणि अस्वस्थता अशी लक्षणे दिसतात. वेळीच उपचार न केल्यास किडनी स्टोनमुळे लघवीच्या मार्गात अडथळा येऊ शकतो किंवा संसर्ग होऊ शकतो, तर दुर्लक्ष केल्यास युटीआय संसर्ग किडनीपर्यंत पसरून गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. 

आजाराच्या तीव्रतेनुसार यावर उपचार ठरवले जातात; लहान स्टोन औषधोपचार आणि जास्त पाणी पिण्याने नैसर्गिकरित्या बाहेर पडू शकतात, तर मोठ्या स्टोनसाठी लेझर उपचार किंवा मिनिमली इन्वेसिव्ह शस्त्रक्रिया करावी लागू शकते. युटीआय संसर्ग हा साधारणतः अँटिबायोटिक्स, पुरेसे पाणी पिणे आणि ठराविक औषधाोपचारांनी बरा होतो.

उन्हाळ्यात का वाढतो किडनी स्टोनचा धोका? जाणून घ्या यामागील कारणे आणि स्टोन नष्ट करण्यासाठी घरगुती उपाय

काय आहे रुग्णांचा रेशो 

डॉ. प्रसाद कुलट, वरीष्ठ प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, अंकुरा हॉस्पिटल फॅार वुमन अँड चिल्ड्रन, पुणे यांनी सांगितले की, तापमानात झालेल्या तीव्र वाढीमुळे उन्हाळ्यात किडनी स्टोन आणि मूत्रमार्गातील संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. प्रत्यक्षात अशा रुग्णांमध्ये सुमारे २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दर महिन्याला २५ ते ५५ वयोगटातील १० पैकी १ रुग्ण किडनी स्टोनच्या समस्येने ओपीडीत दाखल होतो. तर जवळपास २ रुग्ण हे  मूत्रमार्गाच्या संसर्गाने ओपीडीत दाखल होतात. 

यामागील मुख्य कारण म्हणजे डिहायड्रेशन, जे जास्त घाम येणे आणि पुरेसे पाणी न पिणे यामुळे उद्भवते, ज्यामुळे स्टोन तयार होण्यास आणि बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते. अशा रुग्णांमध्ये कमरेच्या बाजूच्या भागात तीव्र वेदना, लघवी करताना जळजळ, वारंवार लघवी होणे आणि काहीवेळा ताप येणे अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे ओळखून त्यावर वेळीच उपचार केल्यास लवकर बरे होता येते.

Web Title: Rising heat leads to increase in kidney stone and urinary tract infection cases in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 08:14 PM

Topics:  

  • Health Tips
  • Kidney stones
  • summer care tips

संबंधित बातम्या

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
1

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Teeth Infection: अक्कल दाढेचा त्रास की हिरड्यांमधील इन्फेक्शन? चावताना वेदना होत असतील, वेळीच ओळखा संकेत
2

Teeth Infection: अक्कल दाढेचा त्रास की हिरड्यांमधील इन्फेक्शन? चावताना वेदना होत असतील, वेळीच ओळखा संकेत

Health Tips: Brown Rice की Quinoa, फायबरसाठी काय आहे उत्तम?
3

Health Tips: Brown Rice की Quinoa, फायबरसाठी काय आहे उत्तम?

HIV: काय आहे अँटीरिट्रोव्हायरल थेरपी? HIV सह अधिक काळ जगताना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज
4

HIV: काय आहे अँटीरिट्रोव्हायरल थेरपी? HIV सह अधिक काळ जगताना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.