(फोटो सौजन्य: istock)
आरोग्य तज्ञांच्या मते, किडनी स्टोन होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यात डिहायड्रेशन, शरीरातील खनिजांचे असंतुलन आणि काही विशिष्ट पदार्थांचे सेवन महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेकदा नकळत आपल्या आहारात असे काही पदार्थ येतात जे आपल्या आरोग्यासाठी चांगले ठरत नाहीत. आज आपण अशाच पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत.
Travel News : 6 ज्योतिर्लिंग आणि शिर्डीच्या साई बाबांचे दर्शन… IRCTC घेऊन आला 12 दिवसांचा टूर पॅकेज
पालक
लोहाचे उत्तम स्त्रोत मानले जाणारे पालक आरोग्यासाठी फायद्याचे ठरत असले तरी याचे अतिसेवन किडनी स्टोनच्या धोक्याला जन्म देऊ शकते. ज्या लोकांना आधीपासून किडनी स्टोनचा त्रास जाणवत आहे त्यांनी पालकाचे सेवन अजिबात करु नये. पालकामध्ये ऑक्झॅलेटचे प्रमाण जास्त असते, जे शरीरातील कॅल्शियमसोबत संयोग करून स्फटिक तयार करू शकते, ज्यामुळे अखेरीस खडे तयार होतात.
ड्रायफ्रुट्स आणि बिया
बदाम, काजू, शेंगदाणे आणि तीळ, सूर्यफुलाच्या बिया यांसारख्या घटकांमध्ये ऑक्झॅलेट असल्याने ते किडनी स्टोनचा त्रास वाढवू शकतात. हे आरोग्यासाठी पाैष्टीक असले तरी याच्या अतिसेवनामुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. विशेषत: ज्यांना आधीच किडनी स्टोनचा त्रास सतावत आहे त्यांनी तर चुकूनही याचे सेवन करु नये.
चॉकलेट आणि कोको उत्पादने
चॉकलेट आणि कोको उत्पादने चवीला चांगली असली तरी यातील ऑक्झॅलेटचे प्रमाण किडनी स्टोनच्या धोक्याला वाढवण्याची क्षमता ठेवते. किडनी स्टोनच्या धोक्यापासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर याचे मर्यादित प्रमाणात सेवन करा.
अति खारट अन्न
जास्त मीठाचे पदार्थ फक्त किडनी स्टोनची समस्याच नाही तर इतर समस्या वाढवण्यास देखील कारणीभूत ठरु शकते. जेव्हा आपण अति खारट पदार्थ खातो तेव्हा र लघवीद्वारे अधिक कॅल्शियम बाहेर टाकते, ज्यामुळे नंतर खडे तयार होऊ शकतात. पॅकेज फूड, वेफर्स, चिवडा अशा पदार्थांमध्ये मीठाचे प्रमाण भरपूर असते ज्यामुळे यांचे सेवन टाळायला हवे किंवा कमी प्रमाणात सेवन करणे योग्य ठरेल.
लाल मांस
रेड मीट जसं की, चिकन, मटन किंवा अंडी यांसारख्या प्राणिजन्य प्रथिनांमुळेही किडनी स्टोनचा धोका वाढतो. यांचे अतिसेवन शरीरातील युरिक ॲसिडची पातळी वाढू शकते. हे युरिक ॲसिड नंतर किडनीत जमा होऊ लागेत ज्यामुळे खडे तयार होण्याची प्रक्रिया वेगवान होते. संशोधनानुसार, प्रथिनांचे संतुलित सेवन महत्त्वाचे आहे, परंतु त्याचे अतिसेवन नक्कीच टाळणे गरजेचे ठरते. तुम्हाला आधीपासूनच किडनी स्टोनचा त्रास असेल तर याचे सेवन टाळा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






