Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गर्भवती महिलांमध्ये वाढतोय संसर्गाचा धोका, आहार-स्वच्छतेच्या काळजीचा तज्ज्ञांचा सल्ला

गर्भवती महिलांना पावसाळ्यात सर्वाधिक धोका असतो. संसर्ग नक्की कशाचा होतो आणि आरोग्य आणि स्वच्छतेची कशा पद्धतीने काळजी घ्यावी याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेऊया

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 29, 2025 | 10:38 AM
गरोदरपणात घ्यायची काळजी

गरोदरपणात घ्यायची काळजी

Follow Us
Close
Follow Us:
  • गर्भधारणेत महिलांनी काय काळजी घ्यावी
  • संसर्गाचा धोका वाढत आहे
  • तज्ज्ञांचा योग्य सल्ला

इतर ऋतूंच्या तुलनेत पावसाळ्यात संसर्गाचा धोका अधिक वाढतो. गर्भवती महिलांना याचा सर्वाधीक धोका असतो. गर्भवती महिलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्यांना मूत्रमार्गाचे संक्रमण (यूटीआय), विषाणूजन्य ताप, योनीमार्गात संसर्ग, डेंग्यू, मलेरिया, पोटाचे संसर्ग आणि कावीळ यासारखे आजार बळावण्याचा धोका जास्त असतो. गर्भवती महिलांनी त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

पावसाळा हा मोठ्या संख्येने गर्भवती महिलांसाठी चिंतेचा विषय ठरतो. या दिवसात वातावरणातील आर्द्रता आणि दमटपणामुळे सर्दी आणि फ्लू सारख्या श्वसनाच्या समस्यांमध्ये वाढ होते. यामुळे खोकला, शिंका येणे आणि अंगदुखी अशी लक्षणे दिसून येतात. मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे, वाफ घेणे, विविध स्वरुपातील द्रवपदार्थांचे सेवन आणि पुरेशी विश्रांती करणे गरजेचे आहे. उघड्यावरील अन्न पदार्थांचे सेवन टाळणे तसेच दुषित पाण्यामुळे देखील   पोटाच्या संसर्गाचा धोका वाढतो ज्यामुळे उलट्या, अतिसार आणि निर्जलीकरण होते. या दिवसात स्ट्रीट फुड टाळणे, योग्यरित्या शिजवलेले आणि ताज्या, गरम अन्नाचे सेवन करणे, गाळून, उकळून थंड केलेले पाणी पिणे गरजेचे आहे असे पुण्यातील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रनच्या प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ तसेच वंध्यत्व निवार तज्ज्ञ डॉ. अश्विनी राठोड यांनी स्पष्ट केले .

Sri Sri Ravi Shankar यांनी गरोदर महिलांना दिला सल्ला, सहज पार कराल गरोदरपणाचा 9 महिन्यांचा प्रवास

काय सांगतात तज्ज्ञ

डॉ. अश्विनी राठोड पुढे सांगतात की, डेंग्यू आणि मलेरियासारख्या डासांमुळे होणारे आजार गर्भवती महिलांनाकरिता त्रासदायक ठरू शकतात. यासाठी डास प्रतिबंधक उपायांचा वापर करणे, संपूर्ण अंग झाकणारे पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे आणि सांडपाण्याचा निचरा करणे यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करणे योग्य राहिल. 

डेंग्यूच्या लक्षणांमध्ये तीव्र ताप, डोकेदुखी, उलट्या आणि सांधेदुखी यांचा समावेश आहे तर मलेरियामुळे ताप , थंडी वाजून येणे आणि थकवा येणे अशी लक्षणे आढळतात. टायफॉइड हा दूषित अन्न आणि पाण्याद्वारे पसरू शकतो आणि त्यामुळे अशक्तपणा आणि भूक न लागणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात, व्हायरल हेपेटायटीसमुळे होणाऱ्या कावीळमुळे त्वचा आणि डोळे पिवळे होऊ शकतात. 

UTI सामान्य समस्या 

गर्भधारणेदरम्यान मूत्रमार्गाचे संसर्ग (यूटीआय) ही एक सामान्य घटना आहे आणि ती अस्वच्छता किंवा जास्त ओलावा असल्यास आणखी वाढू शकते. याकरिता श्वास घेण्यायोग्य सुती कपड्यांचा वापर करणे, भरपूर द्रव पदार्थांचे सेवन करणे आणि स्वच्छता राखणे गरजेचे आहे.

गर्भधारणा हा एक महत्त्वाचा टप्पा असून हंगामी संसर्गामुळे तो आव्हानात्मक ठरु शकतो. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार एका महिन्यात २५-३७ वयोगटातील १० पैकी ५ गर्भवती महिलांना डेंग्यू, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शन किंवा यूटीआयची समस्या आढळून येते. या आजाराचे कारण आणि लक्षणे निश्चित केल्यानंतर उपचारांची पद्धत ठरवली जाते. 

मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवल्यास महिला गरोदर राहू शकतात का? काय सांगतात तज्ज्ञ

स्वतःच्या मर्जीने औषध घेणे टाळा

रुग्णांना स्वतः.च्या मर्जीने औषधोपचार न करण्याचा सल्ला दिला जातो, कारण ते धोकादायक ठरु शकते. महिलांनी ताजे अन्न, स्वच्छ पाणी, डास प्रतिबंधात्मक उपाय तसेच वैयक्तिक स्वच्छतेवर भर दिला पाहिजे. संध्याकाळी घराबाहेर पडणे टाळा आणि घराजवळील कुंड्यांमध्ये, टायरमध्येकिंवा भांड्यांमध्ये पावसाचे पाणी साचणार नाही याची खात्री करा. कोणतीही असामान्य लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या असा सल्ला डॉ. मधुलिका सिंग, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन, पुणे यांनी दिला.

Web Title: Risk of infection increasing among pregnant women experts advise on diet and hygiene

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 10:38 AM

Topics:  

  • Health Tips
  • pregnancy tips
  • Pregnant woman

संबंधित बातम्या

IVF साठी होणाऱ्या खर्चात फरक का होतो? काय आहे कारण
1

IVF साठी होणाऱ्या खर्चात फरक का होतो? काय आहे कारण

लठ्ठ मुलांना प्रौढावस्थेत गंभीर आरोग्य समस्यांचा धोका, तज्ज्ञांचा इशारा
2

लठ्ठ मुलांना प्रौढावस्थेत गंभीर आरोग्य समस्यांचा धोका, तज्ज्ञांचा इशारा

भविष्यात माणसाचे केसांसह 4 अवयव होणार नष्ट; असं नक्की का घडणार, कारण वाचून हादराल
3

भविष्यात माणसाचे केसांसह 4 अवयव होणार नष्ट; असं नक्की का घडणार, कारण वाचून हादराल

‘ही’ हिरव्या रंगाची चटणी नसांना चिकटलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल गाळून काढेल बाहेर, कशी बनवाल
4

‘ही’ हिरव्या रंगाची चटणी नसांना चिकटलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल गाळून काढेल बाहेर, कशी बनवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.