Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel News : भारतातील सर्वात रहस्यमय किल्ला ज्याच्या भिंतींमधून होतो रक्तस्त्राव, रात्री कानावर पडतात भयानक किंकाळ्या

Mysterious Fort : भारताच्या बिहार राज्याच त्रेता युगाशी जोडलेला एक अत्यंत रहस्यमय आणि गूढ किल्ला आहे. किल्ल्याची कथा आजही लोकांमध्ये प्रचलित असून याच्या भिंतींमधून रक्त पाझरत असल्याचे सांगितले जाते. रात्रीच्या वेळी ऐकू येणाऱ्या किंकाळ्यांमुळे स्थानिक संध्याकाळनंतर या परिसरात जायला घाबरतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 17, 2026 | 08:31 AM
Travel News : भारतातील सर्वात रहस्यमय किल्ला ज्याच्या भिंतींमधून होतो रक्तस्त्राव, रात्री कानावर पडतात भयानक किंकाळ्या

Travel News : भारतातील सर्वात रहस्यमय किल्ला ज्याच्या भिंतींमधून होतो रक्तस्त्राव, रात्री कानावर पडतात भयानक किंकाळ्या

Follow Us
Follow Us:
  • बिहारमधील एका प्राचीन किल्ल्याभोवती आजही अनेक रहस्यमय कथा सांगितल्या जातात.
  • या ऐतिहासिक वास्तूचा संबंध प्राचीन राजवंश आणि पौराणिक इतिहासाशी जोडला जातो.
  • स्थानिकांमध्ये प्रचलित असलेल्या काही घटनांमुळे संध्याकाळनंतर या परिसरात जाणे टाळले जाते.
भारतात अनेक प्राचीन किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू आहेत. हे किल्ले गतकाळातील इतिहासाची कथा व्यक्त करतात. देशात अनेक वास्तू या तिथल्या साैंदर्यामुळे किंवा त्या जागेच्या भव्यतेमुळेच नाही तर तेथील काही भयानक कथांमुळेही चर्चित आहेत. आज आम्ही तुम्हाला देशातील अशाच एका प्राचीन आणि रहस्यमय किल्ल्याची माहिती सांगत आहोत ज्याची कथा आजही लोकांचा थरकाप उडवते. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Travel News : सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रातील हे 5 शहर, बजेट ट्रिपसाठी परफेक्ट पर्याय

बिहारमध्ये आहे रहस्यमय किल्ला

आम्ही सांगत असलेला हा किल्ला बिहारच्या रोहतास जिल्ह्यात वसलेला आहे. याचे नाव आहे रोहतासगढ़, हा किल्ला देशातील ऐतिहासिक आणि प्राचीन ठिकाणांपैकी एक आहे. किल्ल्याची भव्यताच नाही तर याच्या गूढ कथा देखील लोकांना नेहमीच थक्क करतात. सांगितलं जातं की, एकेकाळी या किल्ल्याच्या भिंतींमधून रक्तस्त्राव होत होता. इतकंच नाही तर रात्रीच्या वेळी किल्ल्यातून भयानक आवाज आणि किंकाळ्या देखील ऐकायला येत असे.

त्रेता युगाशी जोडलेला आहे इतिहास

रोहतासगढ़ किल्ल्याचा इतिहास फार जुना असून तो मनोरंजक देखील आहे. काही दाव्यांनुसार, किल्ल्याची निर्मिती त्रेता युगावेळी केली असून ती अयोध्येचे सूर्यवंशी राजा त्रिशंकू यांचा नातू आणि राजा हरिश्चंद्र यांचा मुलगा रोहिताश्वने केली. त्याच्या नावावरुन या किल्ल्याला रोहतासगढ़ असे नाव पडले. पर्वतांमध्ये उंच ठिकाणी बांधलेला हा भव्य किल्ला त्याच्या मजबुती आणि भव्य वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. आजही अनेक पर्यटक हा प्राचीन किल्ला पाहण्यासाठी रोहतासला भेट देतात. इथे तुम्हाला किल्ल्याचा आतमध्ये अनेक प्राचीन दरवाजे, मंदिरे, राजवाडे आणि ऐतिहासिक वास्तू पाहता येतील. यासोबतच कैमूर टेकड्यांंमधून निघून पुढे सोन नदीला मिळणारे धबधबे देखील फार लोकप्रिय आहेत.

Travel : भारताच्या या शहराला म्हटलं जात ‘‘पॅरिस ऑफ इंडिया’, इथे पाहायला मिळतो आर्ट आणि कल्चरचा उत्तम संगम

भिंतींमधून रक्त टिपकण्याची कथा

रोहतागढ किल्ल्यासंबंधित एक रहस्यमय कथा खूप चर्चित आहे. स्थानिकांचे मते, अनेक वर्षांपूर्वी किल्ल्यांच्या दगडी भिंतीमधून लाल रंगाचे द्रव पाझरत होते, ज्याला रक्त मानले जात होते. साधारण २०० वर्षांपूर्वी फ्रांस इतिहासकार बुकानन याने आपल्या भारत दाैऱ्यादरम्यान या घटनेची नोंद आपल्या दस्तऐवजामध्ये केली होती. त्यांनी यात लिहिले होते की किल्ल्यांच्या भिंतीमधून लाल रंगाचा पदार्थ निघताना त्यांना दिसला. स्थानिकांचा असाही दावा आहे की, रात्रीच्या वेळी या किल्ल्यामधून रडण्याचे आणि किंकाळीचे आवाज कानावर पडतात. हेच कारण आहे की संध्याकाळनंतर कुणीही या किल्ल्याच्या परिसरात जात नाही. लोक आजही रात्री या परिसरात जायला घाबरतात. तथापि, या गोष्टींची वैज्ञानिक पुष्टी करण्यात आलेली नाही. ही कथा आणि रडण्याचे ते आवाज आजही लोकांसाठी एक रहस्यमय गूढ बनून राहिले आहे.

 

Web Title: Rohtasgarh fort mystery bihar haunted fort blood on walls travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 08:31 AM

Topics:  

  • bihar
  • fort
  • travel news

संबंधित बातम्या

Travel News : सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रातील हे 5 शहर, बजेट ट्रिपसाठी परफेक्ट पर्याय
1

Travel News : सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रातील हे 5 शहर, बजेट ट्रिपसाठी परफेक्ट पर्याय

बिहारमध्ये मित्राची आत्महत्या, गुजरातमध्ये दोन तरुणांनी संपवले आयुष्य; स्टेटसवर लिहिलं ‘लवकरच तुझ्याजवळ येतोय’
2

बिहारमध्ये मित्राची आत्महत्या, गुजरातमध्ये दोन तरुणांनी संपवले आयुष्य; स्टेटसवर लिहिलं ‘लवकरच तुझ्याजवळ येतोय’

प्लॅन झाला फ्लाॅप! चेहऱ्यावर मास्क अन् हातात पेपर स्प्रे घेऊन पापाच्या परी गेल्या दुकान लुटायला, मालकाने दुकानातच केलं कैद
3

प्लॅन झाला फ्लाॅप! चेहऱ्यावर मास्क अन् हातात पेपर स्प्रे घेऊन पापाच्या परी गेल्या दुकान लुटायला, मालकाने दुकानातच केलं कैद

पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील ही ठिकाणे आहेत परफेक्ट, मुंबईहून काही अंतरावर दूर… इथे निसर्गाचा लुटता येईल आनंद
4

पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील ही ठिकाणे आहेत परफेक्ट, मुंबईहून काही अंतरावर दूर… इथे निसर्गाचा लुटता येईल आनंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.