Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2026: मातीच्या किल्ल्यांची जादू कायम, रेडिमेडचा नवा ट्रेंडही लोकप्रिय! पुण्यात दिवाळीचा उत्साह

Diwali 2026: रेडिमेड किल्ल्यांची उपलब्धता आणि स्वतः किल्ले बनविण्याची परंपरा या दोन्ही गोष्टी दिवाळीत कायम आहेत. जागेची उपलब्धता, वेळ आणि मुलांची आवड यानुसार पालक पर्याय निवडत असले, तरी स्पर्धांमुळे पारंपरिक किल्लेनिर्मितीची संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 04, 2026 | 02:35 AM
स्पर्धांमुळे पारंपरिक किल्लेनिर्मितीला पुन्हा प्रोत्साहन

स्पर्धांमुळे पारंपरिक किल्लेनिर्मितीला पुन्हा प्रोत्साहन

Follow Us
Follow Us:
  • स्पर्धांमुळे पारंपरिक किल्लेनिर्मितीला पुन्हा प्रोत्साहन
  • जागेच्या अभावामुळे काही मुलांचा रेडिमेड किल्ल्यांकडे कल
  • मात्र स्पर्धांमुळे वाढतेय स्वतः किल्ले बनविण्याची आवड
गायत्री पवळे/Diwali 2026: दिवाळी म्हटले की लहान मुलांमध्ये किल्ले बनविण्याचा उत्साह पाहायला मिळतो. बदलत्या काळानुसार बाजारात रेडिमेड किल्ल्यांचे विविध पर्याय उपलब्ध झाले असून त्यांनाही चांगली मागणी आहे. मात्र, किल्ले बनविण्याच्या स्पर्धांचे वाढते आकर्षण आणि त्यातून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे पारंपरिक पद्धतीने स्वतः किल्ले तयार करण्याची आवड पुन्हा वाढताना दिसत आहे. दुसरीकडे, शहरातील घरांमध्ये जागेची कमतरता असल्याने अनेक मुलांना (pune) इच्छा असूनही स्वतः किल्ला उभारणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी रेडिमेड किल्ल्यांना पसंती दिली जात आहे.

पूर्वी दिवाळीच्या सुट्यांमध्ये मुले मित्रमंडळींसोबत माती, दगड, विटा, लाकडी फळ्या आणि विविध साहित्य गोळा करून किल्ले तयार करीत असत. किल्ल्याचा बुरुज, तटबंदी, प्रवेशद्वार, दरवाजे यांसह त्यावर मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती मांडण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट मुले स्वतःच्या कल्पकतेने साकारत. आता बाजारात तयार किल्ल्यांचे अनेक आकार आणि प्रकार उपलब्ध असल्याने वेळेची बचत करण्यासाठी पालकांकडूनही त्यांची खरेदी केली जाते.

Nagpur News : भगवान भरोसे बाजारपेठा; वाहतूक कोंडीने हिरावला दिवाळीच्या खरेदीचा आनंद

मात्र, विविध मंडळे, सोसायट्या आणि सार्वजनिक संस्थांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या किल्ले बनविण्याच्या स्पर्धांमुळे मुलांमध्ये नव्याने उत्साह निर्माण झाला आहे. ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारताना मुलांना गड-किल्ल्यांचा इतिहास, त्यांची रचना आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती मिळते. त्यामुळे केवळ सजावटीपुरता मर्यादित न राहता किल्लेनिर्मिती हा शिकण्याचा आणि सर्जनशीलतेला वाव देणारा उपक्रम ठरत आहे.

रेडिमेड किल्ल्यांची उपलब्धता आणि स्वतः किल्ले बनविण्याची परंपरा या दोन्ही गोष्टी दिवाळीत कायम आहेत. जागेची उपलब्धता, वेळ आणि मुलांची आवड यानुसार पालक पर्याय निवडत असले, तरी स्पर्धांमुळे पारंपरिक किल्लेनिर्मितीची संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे.

रेडिमेड किल्ल्यांचे दर ४०० ते १२०० रुपये

दिवाळीनिमित्त बाजारात रेडिमेड किल्ल्यांचे विविध आकार आणि प्रकार उपलब्ध झाले आहेत. साधारण ४०० रुपयांपासून ते १२०० रुपयांपर्यंत या किल्ल्यांच्या किमती आहेत. आकार, बांधणी, सजावट आणि त्यासोबत उपलब्ध असलेल्या मावळ्यांच्या मूर्ती यानुसार किमतीत फरक पडतो. कमी जागेत सहज बसविता येणाऱ्या छोट्या किल्ल्यांपासून ते मोठ्या आकाराच्या आकर्षक किल्ल्यांपर्यंत विविध पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. वेळेची बचत आणि घरातील जागेची मर्यादा लक्षात घेऊन अनेक पालक रेडिमेड किल्ल्यांना पसंती देत आहेत.

Eye Safety During Diwali: सावध राहा, सुरक्षित साजरा करा दिवाळी! फटके फोडताना डोळ्यांना इजा होऊ नये म्हणून ‘या’ पद्धतीने घ्या काळजी

💡

Frequently Asked Questions

  • Que: रेडिमेड किल्ल्यांचे दर काय आहेत?

    Ans: पुण्यात रेडिमेड किल्ल्यांचे दर हे ४०० रुपयांपासून ते १२०० रुपयांपर्यंत आहेत.

  • Que: नागरिकांची सर्वात जास्त पसंती कोणाला मिळत आहे?

    Ans: वेळेची बचत आणि घरातील जागेची मर्यादा लक्षात घेऊन अनेक पालक रेडिमेड किल्ल्यांना पसंती देत आहेत.

Web Title: Readymade fort and childrens make soil fort in diwali 2026 festival trend pune tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Diwali 2026
  • fort
  • pune news

संबंधित बातम्या

Pimpri Chinchwad News : गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना आवाहन
1

Pimpri Chinchwad News : गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना आवाहन

Cricket News: पुण्यातील १९ वर्षांखालील क्रिकेटचा थरार! ‘या’ संघांची सेमीफायनलमध्ये शानदार धडक
2

Cricket News: पुण्यातील १९ वर्षांखालील क्रिकेटचा थरार! ‘या’ संघांची सेमीफायनलमध्ये शानदार धडक

दिवाळी प्रवासासाठी एसटी सज्ज, पुणे विभागाकडून 900 जादा बसचे नियोजन; ‘या’ मार्गांना सर्वाधिक प्रतिसाद
3

दिवाळी प्रवासासाठी एसटी सज्ज, पुणे विभागाकडून 900 जादा बसचे नियोजन; ‘या’ मार्गांना सर्वाधिक प्रतिसाद

Laxmi Pujan 2026: दिवाळीसाठी नारळाचा अचूक उपाय, घरावर होणार लक्ष्मीची कृपा
4

Laxmi Pujan 2026: दिवाळीसाठी नारळाचा अचूक उपाय, घरावर होणार लक्ष्मीची कृपा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.