मासिक पाळीतील वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते. अनेक महिलांना मासिक पाळीच्या 5 दिवसांमध्ये भयंकर वेदनांना सामोरे जावे लागते. पाठ दुखणे, कंबर दुखणे, मूड स्विंग होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. ओटीपोटात वेदना आणि क्रॅम्पची जाणवू लागल्यानंतर त्याचा परिणाम रोजच्या दैनंदिन कामावर होतो. अनेकदा काही महिला मासिक पाळीतील वेदनांकडे दुर्लक्ष करतात. पण या समस्यांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी महिलांसाठी मासिक पाळीतील वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगितले आहेत. हे उपाय करून तुम्ही पोटदुखी आणि इतर समस्यांपासून आराम मिळवू शकता.(फोटो सौजन्य-istock)
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पोट दुखी किंवा इतर समस्या जाणवू नये म्हणून शेंगदाणे खावेत. शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात गुणकारी घटक आढळून येतात, जे आरोग्यासाठी गुणकारी आहेत. शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला विटामिन B6,मिनरल्स, प्रोटीन, अँटिऑक्सिडंट्स इत्यादी घटक आढळून येतात. तसेच मासिक पाळीच्या दिवसांमध्ये चिप्स आणि इतर कुरकुरे, चटपटीत किंवा तळलेले पदार्थ खाणे टाळा.
हे देखील वाचा: 24 तास मऊ राहतील मोदक! कोणता तांदूळ वापरावा, अशाप्रकारे घरच्या घरी तयार करा पिठी
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये थंड पदार्थांचे सेवन करावे. थंड पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन शरीरात थंडावा निर्माण होतो. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पोटाचे चक्र पूर्णपणे बदलून जाते. या दिवसांमध्ये पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करून आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. पाळीच्या दिवसांमध्ये जुलाब होणे, अपचन होणे इत्यादी त्रास जाणवतो.
जास्त पोटात दुखु लागल्यास किंवा जेवण जेवण्याची इच्छा न झाल्यास बाजारात मिळणारी ताज्या आणि हंगामी फळांचे सेवन करावे. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये केळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. यामुळे वेदना कमी होऊन आराम मिळतो. तुम्हाला जर नुसतीच केळी खायला आवडत नसतील तर तुम्ही केळ्याचा शेक किंवा इतर पदार्थ बनवून खाऊ शकता.
हे देखील वाचा: नसांमध्ये जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी मदत करते ‘हे’ गुणकारी पेय, जाणून घ्या बनवण्याची पद्धत
विटामिन सी युक्त आवळा आणि लिंबाचा रस प्यायल्यामुळे पोट दुखीच्या वेदनांपासून आराम मिळतो. हे सरबत प्यायल्यामुळे पोटात दुखणे थांबते. तसेच या दिवसांमध्ये कोक, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड ज्यूस पिणे टाळले पाहिजे. इतर पेय न पिता तुम्ही फळांपासून बनवलेला ज्युस पिऊ शकता.