गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. बाप्पाच्या येण्याआधीच महिनाभरापासून त्याच्या आगमनाची तयारी सुरु होते. बाप्पाची आरास, मखर, सजावट यासर्वांची सुरुवात होते. तसेच यात बाप्पाला दाखवणाऱ्या नैवेद्याचीही लगबग सुरु असतेच. बाप्पाला नैवेद्यासाठी उकडीचा मोदक दाखवण्याची परंपरा आहे. बाप्पाला मोदक फार प्रिय असल्याचे म्हटले जाते. राज्यातील विविध भागात उकडीचा मोदक बनवण्याची पाककृती वेगवेगळी असू शकते.
मुळातच मोदक हा पदार्थ बनवणे फार कठीण आहे. फार अलगद आणि मन लावून मोदक बनवावा लागतो. याच्या काळ्या, सारण, कणिक प्रत्येकच गोष्ट योग्य असणे फार गरजचे असते. यात लहानशी जरी चूक झाली तरी मोदक खराब होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी मोदक बनवण्यसाठीच्या काही सोप्या टिप्स घेऊन आलो आहोत.
मोदक बनवण्यासाठी महत्तवाचा पदार्थ असतो तो म्हणजे तांदळाचे पीठ. एवढेच काय तर, मोदक बनवताना तुम्ही कोणते तांदूळ वापरत आहात हेदेखील फार महत्त्वाचे ठरते. कारण अनेकदा तांदूळ योग्य न घेतल्यानेही मोदक बिघडण्याची शक्यता असते. अशावेळी मोदकासाठी तांदळाचे पीठ कसे तयार करावे ते जाणून घ्या.
हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: बाप्पासाठी बनवा मूगडाळीचे पौष्टिक मोदक, झटपट तयार होणारी रेसिपी
सध्या बाजारात मोदकाचा विकतचे पीठ मिळते. मात्र हे पीठ तुम्ही घरोदेखील अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तयार करू शकता. यासाठी तांदूळ निवडताना तुम्हाला विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, मोदकांसाठी तुम्ही तांदळामध्ये इंद्रायणी जुना वापरू शकता, मात्र या तांदळाचे मोदक थोडे चिकट बनतात. तसेच मोदकांसाठी आंबे मोहर हा तांदुळ सगळ्यात उत्तम आहे. या तांदळामुळे मोदक एकदम मऊ बनतात. तसेच याच्या वापराने मोदकांना चीरही पडत नाही. याचप्रमाणे, तुम्ही मोदकांसाठी सुवासिक बसमतीचादेखील वापर करू शकता. मात्र या तांदळाचे मोदक थोडेसे चिरण्याची शक्यता असते. कारण तो तांदुळ थोडा कोरडा असतो.
आता मोदकांसाठी जसे कोणता तांदूळ योग्य आहे ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे तितकेच हेदेखील जाणून घेणे गरजेचे आहे की कोणता तांदूळ कधीही वापरू नये. आम्ही तुम्हाला सांगतो की, कोलम किंवा नवा तांदूळ मोदकांसाठी कधीही वापरू नये.
हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: मंदिर उभारण्यासाठी बाप्पा स्वतः पृथ्वीवर अवतरले? गणेशाच्या अनोख्या मंदिराविषयी जाणून घ्या
मोदकाचे पीठ घरी तयार करताना सर्वप्रथम तुम्ही कोणता तांदूळ वापरणार आहात, ते निश्चित करा. तांदूळ शक्यतो जुना असावा. तांदूळ निश्चित केल्यांनतर तांदूळ स्वछ पाण्याने चांगला धुवा. तांदूळ धुतल्यानंतर 15-20 मिनिटे चाळणीतून निथळून काढा. त्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावर हे धुतलेले तांदूळ नीट एकसमान पसरावा आणि तांदळांना चांगले सुकू द्या. तांदूळ चांगला कडकडीत सुकवा. शक्यतो फॅनखाली तांदुळ सुकवून घ्या. उन्हात सुकवल्यास तो अधिक कोरडा होण्याची शक्यता असते. ज्यामुळं मोदक चिरण्याची शक्यता असते. तांदूळ नीट सुकल्यानंतर त्याला दळून आणा.