Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cannes 2026: कान्समध्ये भारतीय संस्कृतीचा ठसा; सीमा सिंह यांचा ‘शिव-शक्ती’ प्रेरित लूक चर्चेत

Cannes Film Festival: कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर डिझायनर सीमा सिंह यांनी ‘शिव आणि शक्ती’च्या संकल्पनेवर आधारित खास लूक सादर करत भारतीय अध्यात्म, संस्कृती आणि स्त्रीशक्तीचा संदेश दिला.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 22, 2026 | 03:04 PM
कान्समध्ये भारतीय संस्कृतीचा ठसा; सीमा सिंह यांचा ‘शिव-शक्ती’ प्रेरित लूक चर्चेत

कान्समध्ये भारतीय संस्कृतीचा ठसा; सीमा सिंह यांचा ‘शिव-शक्ती’ प्रेरित लूक चर्चेत

Follow Us
Follow Us:
  • कान्समध्ये भारतीय संस्कृतीचा ठसा
  • सीमा सिंह यांचा ‘शिव-शक्ती’ प्रेरित लूक चर्चेत
  • कान्समध्ये सीमा सिंह यांच्या रुद्राक्ष-गोल्ड लूकची चर्चा
Cannes Film Festival: कान्स फिल्म फेस्टिव्हलचा रेड कार्पेट म्हटलं की, डोळ्यांत भरतील असे ग्लॅमरस लूक, आंतरराष्ट्रीय फॅशन आणि सेलिब्रिटींची चमक यांची चर्चा होते. मात्र यावेळी हा रेड कार्पेट केवळ फॅशनपुरता मर्यादित न राहता भारतीय अध्यात्म, संस्कृती आणि स्त्रीशक्तीचा संदेश देणारा ठरत आहे. डिझायनर सीमा सिंह यांनी त्यांच्या खास संकल्पनेतून ‘शिव आणि शक्ती’ या शाश्वत तत्त्वज्ञानाला आधुनिक फॅशनच्या माध्यमातून साकारण्याचा प्रयत्न केला आहे.

Cannes: कान्सच्या रेड कार्पेटवर सीमा सिंहची जादू, मुलगा श्रेयने वेधले चाहत्यांचे लक्ष; पाहून फिटेल डोळ्यांचे पारणे

सीमा सिंह या केवळ डिझायनर म्हणून नव्हे, तर भारतीय परंपरा आणि अध्यात्म यांची कथा सांगणाऱ्या कलाकार म्हणून या मंचावर दिसून आल्या. त्यांच्या पोशाखामध्ये शिव आणि शक्ती यांच्यातील संतुलन, स्थिरता आणि ऊर्जा, तसेच विश्व आणि पृथ्वी यांच्यातील नात्याचं प्रतीकात्मक दर्शन घडतं. सूर्य आणि चंद्र, मंदिर आणि ताऱ्यांचा संदर्भ, तसेच प्राचीन श्लोकांची प्रेरणा आधुनिक फॅशन सिल्हूटमध्ये गुंफण्यात आली आहे.

या लूकमधील सर्वात खास बाब म्हणजे रुद्राक्षाचा वापर. भक्तांच्या श्रद्धेचं प्रतीक असलेला रुद्राक्ष 24 कॅरेट सोन्याच्या अलंकारिक स्वरूपात एका स्ट्रक्चर्ड जॅकेटवर सजवण्यात आला आहे. भारतीय अध्यात्म आणि जागतिक फॅशन यांचा संगम घडवण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.

सीमा सिंह यांचा हा लूक केवळ वैयक्तिक स्टाइल स्टेटमेंट नसून, शांतपणे जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या, संघर्ष करत आयुष्य उभं करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला समर्पित असल्याचा संदेश देतो. ‘शक्ती’चं प्रतिनिधित्व करत त्या जगभरातील महिलांच्या सामर्थ्याला सलाम करत असल्याची भावना या संकल्पनेतून व्यक्त करण्यात आली आहे.

यामुळे यंदाच्या कान्स रेड कार्पेटवर केवळ ग्लॅमरच नव्हे, तर भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि स्त्रीशक्तीचं वैश्विक दर्शन घडण्याची चर्चा रंगली आहे. सीमा सिंह यांनी आपल्या या विशेष लूकमधून सिद्ध करून दाखवले की, जेव्हा फॅशनमागे एखादी सखोल विचारसरणी आणि समाजकल्याणाची भावना दडलेली असते, तेव्हा ती केवळ स्टाइल न राहता जागतिक पातळीवर इतिहास घडवणारी ठरते.

जलवा… Cannes मध्ये Jacqueline Fernandezs च्या फॅशनची जादू

Web Title: Seema singh shiv shakti inspired look at cannes red carpet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • Cannes 2026
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Mangalagaur 2026: मंगळागौरीच्या कार्यक्रमांची उखाण्यांनी वाढवा रंगत! विवाहित महिलांसाठी मजेशीर उखाणे
1

Mangalagaur 2026: मंगळागौरीच्या कार्यक्रमांची उखाण्यांनी वाढवा रंगत! विवाहित महिलांसाठी मजेशीर उखाणे

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित
2

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
3

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

सुंदर दिसणारी ही झाडे सापांना करतात आकर्षित, घराभोवती लावण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4

सुंदर दिसणारी ही झाडे सापांना करतात आकर्षित, घराभोवती लावण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.