Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट! गुढीपाडव्यानिमित्त मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना पाठवा मराठमोळ्या हटके शुभेच्छा

संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडवा सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी गुढीची पूजा करून पारंपरिक पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे या मंगलदिनी नातेवाईकांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 19, 2026 | 08:03 AM
सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट! गुढीपाडव्यानिमित्त मित्रमैत्रिणीं, नातेवाईकांना पाठवा मराठमोळ्या हटके शुभेच्छा

सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट! गुढीपाडव्यानिमित्त मित्रमैत्रिणीं, नातेवाईकांना पाठवा मराठमोळ्या हटके शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

हिंदू नवीन वर्ष गुढी पाडवा सणापासून सुरुवात होते. त्यामुळे हिंदू धर्मात येणाऱ्या प्रत्येक सणाला विशेष महत्व आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी साजरा केल्या जाणाऱ्या गुढीपाडवा सणामुळे घरात आनंद आणि चैतन्य येते. गुढीपाडव्याच्या दिवशी घरात गुढी उभारला जातो. त्यानंतर विधिवत पूजा करून पारंपरिक पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. घरात गुढी उभारणे म्हणजे विजय, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक आहे. त्यामुळे नात्यांमधील वीण आणखीनच घट्ट करण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी नातेवाईकांना आणि प्रियजनांना या मराठमोळ्या शुभेच्छा नक्की पाठवा. या शुभेच्छा वाचून सगळ्यांचं आनंद होईल.(फोटो सौजन्य – istock)

गुढीपाडव्याला द्या AI चा खास टच! Google Gemini च्या मदतीने तयार करा तुमचे पारंपारिक फोटो, हे आहेत व्हायरल प्रॉम्प्ट्स

उभारून आनंदाची गुढी,
सुख-समृद्धी येवो तुमच्या घरी.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नक्षीदार काठी, त्यावर रेशमी वस्त्र,
साखरेची गाठी आणि कडुनिंबाचे शास्त्र…
गुढीपाडवा म्हणजे विजयाचे अस्त्र!
शुभ गुढीपाडवा!

सोनूपावली आले नववर्ष,
आनंद घेऊन आली नवी हर्ष…
तुम्हाला व कुटूंबियांना,
गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
नवीन स्वप्ने, नवीन आशा,
नवी दिशा, नवा भरवसा…
गुढीपाडव्याच्या निमित्ताने,
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा!

जुन्या आठवणींना मागे सोडूया,
नवीन स्वप्नांना उभारी देऊया…
हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या
मनःपूर्वक शुभेच्छा!

अखंड सुख, शांतता आणि समृद्धीचा,
हा सण उत्साहाचा, मराठी मनाचा…
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा…

सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…
दिवस सोनेरी
नव्या वर्षाची सुरुवात…
गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!

समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या शुभेच्छा…

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी…
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी…
तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे…
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे…
सर्वांना गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…

आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी…
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगात न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…

चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा…
साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा…
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा…

जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…

तुम्हाला व कुटूंबियांना,
गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा…
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी…
नवे नवे वर्ष आले
घेऊन गुळासाखरेची गोडी…
गुडीपाडव्याच्या शुभेच्छा…

नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन…
नूतनवर्षाभिनंदन !!

सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष,
येणारा नवीन दिवस करेल
नव्या विचारांना स्पर्श,
हिंदू नव वर्षाच्या आणि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गायी मंजुळ गाणी,
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी.
गुढी पाडव्याच्या आणि नूतन
वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर
खरी सुरवात…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवातीसोबत,
चैत्र “पाडवा” दारी आला…
नूतन वर्षाभिनंदन!

श्रीखंड पूरी,
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नव वर्ष जाओ छान.
नूतन वर्षाभिनंदन!

वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती!
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू,
स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभदिनी…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !

Gudi Padwa 2026: ‘पुरणपोळी’ गोड होणार; चणाडाळ, साखरेच्या दरात घट, मात्र इंधन….

दिवस उगवतो दिवस मावळतो
वर्ष येतं वर्ष जातं पण प्रेमाचे बंध कायम रहातात,
आपलं नातं असं दरवर्षी वृद्धिंगत व्हावं हीच सदिच्छा,
सर्वांना मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

Web Title: Send best wishes to your friends and relatives on the occasion of gudi padwa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Festive Season
  • Gudi Padwa
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीला विठ्ठल मंदिरांमध्ये उत्साह; पंढरपूरसह या ठिकाणी केले जाते विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन
1

Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीला विठ्ठल मंदिरांमध्ये उत्साह; पंढरपूरसह या ठिकाणी केले जाते विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन

Bhaubeej 2026: सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊराया..! भाऊबीजेनिमित्त लाडक्या भावाला द्या ‘या’ खास शुभेच्छा
2

Bhaubeej 2026: सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊराया..! भाऊबीजेनिमित्त लाडक्या भावाला द्या ‘या’ खास शुभेच्छा

Diwali Padwa 2026: पती-पत्नीच्या नात्यासाठी खास असतो दिवाळी पाडवा; जाणून घ्या औक्षण करण्यामागचे कारण आणि महत्त्व
3

Diwali Padwa 2026: पती-पत्नीच्या नात्यासाठी खास असतो दिवाळी पाडवा; जाणून घ्या औक्षण करण्यामागचे कारण आणि महत्त्व

Diwali 2026 : सुख, समृद्धी आणि भरभराटीची नवी सुरुवात! दिवाळी पाडाव्यानिमित्त बायकोला द्या मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यात वाढेल प्रेम
4

Diwali 2026 : सुख, समृद्धी आणि भरभराटीची नवी सुरुवात! दिवाळी पाडाव्यानिमित्त बायकोला द्या मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यात वाढेल प्रेम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.