
Itchy Ears After Bathing (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
बऱ्याच जणांना आंघोळ झाल्यावर कानात खाज येते. कानात काहीतरी वळवळतंय असं वाटतं. बहुतेक लोक याकडे लक्षच देत नाहीत, साधं आहे म्हणून सोडून देतात. पण जर तुम्हाला रोजच आंघोळीनंतर कानात खाज येत असेल तर हे साधं नाही. यामागे काही कारण असू शकतं. अनेकांना सवय असते की, कानामध्ये एअरबर्ड किंवा काडी कानात घालण्याची सवय असते, परंतू त्यामुळे आतल्या कातडीला इजा होऊन इन्फेक्शन होण्याची शक्यता निर्माण होते. Itchy Ears After Bathing:
डॉक्टर सांगतात की, आंघोळीनंतर कानात खाज येणं हे कॉमन आहे, पण सारखं होत असेल तर कारण शोधलं पाहिजे. आपल्या कानाच्या बाहेरच्या नळीवर एक नैसर्गिक तेलाचा थर असतो जो मळ तयार होतो. तो पण आपल्या कानाचं रक्षण करतो. तो धूळ, पाणी आणि बाहेरची घाण आत जाऊ देत नाही. पण जेव्हा सारखं सारखं कानात पाणी जातं किंवा कानात ओलावा राहतो, तेव्हा हा संरक्षणाचा थर खराब होतो. त्यामुळे खाज यायला लागते.
2021 मध्ये एका मेडिकल जर्नलमध्ये यावर एक अभ्यास झाला होता. त्यात सांगितलं होतं की कानाच्या नळीत पाणी साचून राहिल्याने खाज येते. जास्त वेळ ओलावा राहिला तर बुरशी म्हणजे फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. आंघोळ करताना पाणी गेल्यावर आतला मळ फुगतो. ज्यांना कापसाच्या काडी, इअरबड्सचा अधिक वापर करतात, त्यांच्यात्यांच्या कानातलं नैसर्गिक तेल निघून जाते तसेच त्वचा कोरडी पडून खाज सुटते.
डॉक्टर म्हणतात की, कानात सतत ओलावा राहिला तर तिथे बॅक्टेरिया आणि बुरशी वाढायला लागते. यामुळे होणाऱ्या आजाराला ‘ओटायटिस एक्सटर्ना’ म्हणतात. यालाच ‘स्विमर्स इअर’ पण म्हणतात, कारण पोहणाऱ्यांना हा जास्त होतो. याची सुरुवात खाज येण्यापासूनच होते. सुरुवातीला साधं वाटतं, पण नंतर कान दुखायला लागतो, आत लाल होतं, सूज येते, कानातून पाणी येतं आणि नीट ऐकू पण येत नाही.खाज येण्याची अजून काही कारणंफक्त पाणीच नाही तर अजून काही कारणांमुळे पण कानात खाज येऊ शकते.
एक्झिमा – हा त्वचेचा आजार आहे. यामुळे कानाच्या कातडीला खाज येते, त्वचा कोरडी पडते आणि जळजळ होते.
ऍलर्जी – काही वेळा कानात वापरलेल्या शाम्पू, साबण किंवा कानातले यामुळे ऍलर्जी होऊ शकते आणि खाज येते.
कानातला मळ कमी होणं – कानातला मळ हा वाईट नसतो, तो कानाचं रक्षण करतो. तो जास्त साफ केल्याने आतली त्वचा कोरडी पडते आणि खाज सुटते.
इअरफोनचा जास्त वापर – दिवसभर इअरफोन किंवा इअरबड्स लावल्याने कानाच्या कातडीला घासलं जातं. त्यामुळे पण खाज येऊ शकते.
खाज आली की बहुतेक लोक कापसाची काडी, बोट किंवा पेन, किल्ली असं काहीतरी कानात घालतात. असं अजिबात करू नका. यामुळे कानाच्या नाजूक कातडीला जखम होते. जळजळ अजून वाढते आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो. काडीने मळ आतच ढकलला जातो आणि मग जास्त त्रास होतो.
1. बाहेरचा भाग कोरडा करा – आंघोळीनंतर स्वच्छ टॉवेलने कानाचा बाहेरचा भाग हलकेच पुसून घ्या.
2. डोकं तिरकं करा – जर कानात पाणी गेल्यासारखं वाटलं तर डोकं एका बाजूला झुकवा, पाणी आपोआप बाहेर येईल. कान फडफडवू नका.
3. काहीही आत घालू नका – कानात काडी, बोट किंवा कोणतीही टोकदार वस्तू घालू नका.
4. सारखी खाज येत असेल तर डॉक्टरांना भेटा – जर आठवड्यातून 2-3 वेळा खाज येत असेल, दुखत असेल किंवा कानातून काही येत असेल तर स्वतः काही करू नका.
कानाच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.थोडक्यात, आंघोळीनंतर कानात खाज येणं हे वरवर साधं वाटतं पण त्याकडे दुर्लक्ष केलं तर मोठं इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे वेळीच काळजी घ्या.
Ans: कानाच्या नळीत पाणी किंवा ओलावा राहणे, नैसर्गिक तेलाचा थर कमी होणे किंवा त्वचा कोरडी पडणे यामुळे खाज येऊ शकते.
Ans: वारंवार खाज येणे हे ‘ओटायटिस एक्सटर्ना’ या बाह्य कानाच्या संसर्गाचे लक्षण असू शकते. एक्झिमा किंवा अॅलर्जीमुळेही खाज येऊ शकते.
Ans: कानाच्या नळीमध्ये कापसाची काडी घालणे टाळावे. त्यामुळे त्वचेला इजा होऊ शकते, नैसर्गिक मळ निघून जाऊ शकतो किंवा मळ आणखी आत ढकलला जाऊ शकतो.