Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल…! आषाढी एकादशीनिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा

राज्यासह संपूर्ण देशभरात आषाढी एकादशी मोठ्या आनांदात आणि भक्तिभावाने साजरा केली जाते. ही केवळ एक यात्रा नसून भक्ती, समता, सेवा, शिस्त, संयम आणि सामाजिक ऐक्याचा सोहळा आहे. त्यामुळे आषाढी एकादशीनिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 25, 2026 | 05:30 AM
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल...! आषाढी एकादशीनिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल...! आषाढी एकादशीनिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरेमध्ये आषाढी एकादशीला विशेष महत्व आहे. दरवर्षी आषाढ शुक्ल एकादशीच्या दिवशी लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी प्रस्थान करतात. ही केवळ एक यात्रा नसून भक्ती, समता, सेवा, शिस्त, संयम आणि सामाजिक ऐक्याचा सोहळा आहे. अंभग, टाळ मृदूंगाच्या गजरात गव्या पताकांचे डोलणे आणि “ज्ञानोबा-तुकाराम”चा अखंड जयघोष करत वारी आषाढी वारी साजरा केली जाते. दरवर्षीं आषाढी एकादशीला लाखो वारकरी आणि विठ्ठलाचे सेवक पंढरपूरमध्ये दर्शनासाठी दाखल होतात. त्यामुळे आषाढी एकादशीचा उत्साह वाढवण्यासाठी नातेवाईक आणि प्रियजनांना मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता. तुम्ही दिलेल्या शुभेच्छा वाचून सगळ्यांचं खूप जास्त आनंद होईल.(फोटो सौजन्य – pinterest)

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीची हजारो वर्षांच्या गौरवशाली परंपरेची कशी झाली सुरुवात, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

चंद्रभागेच्या तीरी उभा तो विठ्ठल,
त्याच्या प्रेमाने भिजून जावो तुमचे हे अंतरंग
आषाढी एकादशी निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

रूप पाहतां लोचनीं,
सुख जालें वो साजिणी…
आषाढी एकादशीच्या मंगल प्रसंगी
विठुरायाची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो
हार्दिक शुभेच्छा!

तालात मृदुंग, हातात वीणा,
ओठी विठ्ठलाचे नाव…
आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना
आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!
जय हरी विठ्ठल!

विठ्ठलाच्या नामाचा गजर
आणि भक्तीचा रंग,
तुमच्या आयुष्यात सदैव राहो
आनंदाची तरंग
आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा!

भक्तीच्या वाटेवर चालूया,
विठ्ठलाच्या चरणी मस्तक टेकवूया…
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत
हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना
शुभ आषाढी एकादशी!

नेत्र विसावले विटेवर,
मन झाले नामात दंग,
तुझ्या चरणी लीन व्हावे,
हेच ध्येय पांडुरंग
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

अवघा रंग एक झाला,
रंग संगा पांडुरंग,
पंढरीच्या वारीत दंग झाले
आज सारे वारकरी!
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा!

घई घेई माझे वाचे,
गोड नाम विठोबाचे,
तुम्ही घ्यारे डोळे सुख,
पाहा विठोबाचे मुख…
विठूमाऊलीच्या आशीर्वादाने
तुमचा आजचा दिवस मंगलमय होवो.

चंद्रभागेच्या तीरी उभा विटेवरी,
कर कटावरी ठेवूनिया…
भक्तांच्या आर्त साद घाली,
पांडुरंग माऊली!
सर्व वारकरी बंधू-भगिनींना
आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

ज्ञानोबा-तुकारामांचा गजर,
आणि विठ्ठलाची भक्ती,
या पवित्र दिवशी मिळो
तुम्हाला अपार सुख आणि शांती
|| जय हरी विठ्ठल ||

घेई घेई माझे वाचे,
गोड नाम विठोबाचे!
विठुरायाच्या नामातच
सर्व सुख सामावले
तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा!

विठ्ठलाच्या पायी वाहिली फुले,
भक्तांच्या हृदयात भक्तीचे दीप उजळले
आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

सुख, समृद्धी, समाधान आणि आरोग्य,
विठुराया तुमच्या आयुष्यात सदैव ठेवो
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

विठू माऊलीची कृपा तुमच्यावर सदैव राहो,
तुमचे घर नेहमी आनंद आणि शांतीने भरलेले राहो
शुभ आषाढी एकादशी!

टाळ-मृदुंगाचा गजर अन् वारकऱ्यांचा ध्यास,
विठुरायाची भेट हाच आमचा खरा श्वास
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

अथांग भक्तीचा महासागर
आणि विठुरायाचे ध्यान,
तुमच्या आयुष्यात येवो
सुख, समृद्धी आणि सन्मान
आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा!

माऊलीच्या चरणी अर्पिले हे मन,
पांडुरंगाच्या दर्शनाने धन्य झाले जीवन
आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

विठोबाची सावळी मूर्ती, मनात साठवावी,
त्याच्या भक्तीचा हा सोहळा, आनंदाने साजरी करावी
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

विठुरायाची कृपा हीच खरी संपत्ती,
तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होवोत हीच प्रार्थना
शुभ आषाढी एकादशी!

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम

भक्तांच्या हाकेला धावणारा तो एकच पांडुरंग,
त्याच्या नामात रंगून जावो तुमचा प्रत्येक रंग
आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

माऊलीच्या चरणी नतमस्तक होऊन,
मागूया सर्वांच्या आरोग्याचे अन् आनंदाचे वाण
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

दिंडी चाले पंढरपुरा, मनात विठ्ठलाचा ध्यास,
तुम्हा सर्वांच्या आयुष्यात येवो आनंदाचा प्रकाश
शुभ आषाढी एकादशी!

विठ्ठल नाम हे सकळ पापांचे हरण करणारे,
आणि आयुष्याला योग्य दिशा देणारे आहे
आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

रथाच्या चाकासारखे फिरते हे जग,
पण विठ्ठलाच्या चरणी मिळते खरी शांतता
आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!

काया, वाचा, मनाने स्मरण करा पांडुरंगाचे,
उजळून निघेल भविष्य अन् दार उघडेल आनंदाचे
आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा!

 

Web Title: Send traditional devotional marathi greetings to relatives and loved ones on the occasion of ashadhi ekadashi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • Ashadhi Wari 2026
  • Festival News

संबंधित बातम्या

Festive Home Decor: बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खरेदी करा ‘या’ खास डिझाइन्स
1

Festive Home Decor: बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खरेदी करा ‘या’ खास डिझाइन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.