
शरीराच्या ९० टक्के रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर दिसून येतात 'ही' भयानक लक्षणे
रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे का निर्माण होतात?
रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याची कारणे?
हार्ट अटॅक येण्याआधी दिसून येणारी लक्षणे?
मानवी शरीरात असंख्य रक्तवाहिन्या असतात. दीर्घकाळ जिवंत राहण्यासाठी शरीरातील प्रत्येक नस मोकळी असणे महत्वाचे आहे. रक्तवाहिन्यांमधून संपूर्ण शरीराला रक्तप्रवाह होतो. रक्तवाहिन्या म्हणजे शरीरातील अशा नलिका आहेत, ज्या धमन्या हृदयाकडून शरीराकडे ऑक्सिजनयुक्त रक्त पोहचवतात आणि शिरा शरीराकडून हृदयाकडे अशुद्ध रक्त परत आणतात. ही प्रक्रिया संपूर्ण शरीरात कायमच होत असते. रक्तप्रवाहाच्या क्रियेत अडथळे निर्माण झाल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. वाढलेले वय, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, शिरांवर पडलेल्या अतिरिक्त दबावामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. (फोटो सौजन्य – istock)
रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र कालातंराने शेवटच्या टप्प्यात धोकायदाक लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे वेळीच न ओळखल्यास हार्ट अटॅक, स्ट्रोक, व्हेरिकोज व्हेन्स, अॅन्यूरिझम इत्यादी आजार होण्याची शक्यता असते. रक्तवाहिन्यांसंबंधित झालेल्या गंभीर आजारांवर वेळीच उपचार न केल्यास कोणत्याही क्षणी मृत्यू होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात, याबद्दल जाणून घ्या सविस्तर माहिती.
हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो. याशिवाय शरीरात विचित्र थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. कोणतेही काम करण्याची इच्छा न होणे, सतत अंथरुणांवर झोपू राहावे असे वाटणे, थोडं चालल्यानंतर लगेच दम लागणे इत्यादी गंभीर लक्षणे दिसू लागतात. महिलांमध्ये ही लक्षणे अतिशय लवकर दिसू लागतात. रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यानंतर हृदय आणि स्नायूंना पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही.
अवरोधित रक्तवाहिन्यांमुळे शरीरात कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. पण छातीत दाब जाणवणे, जडपणा वाटणे किंवा काहीवेळा छातीवर कोणतीही जड वस्तू आणून ठेवली आहे, असे वाटू लागते. हृदयाला आवश्यक प्रमाणात रक्तपुरवठा न झाल्यामुळे छातीत दाब पडल्यासारखे वाटू लागते.
शरीराचा रक्तप्रवाह कमी झाल्यानंतर सगळ्यात आधी पायांमध्ये लक्षणे दिसू लागतात. पाय बर्फासारखे थंड पडणे, सुन्नपणा किंवा मुंग्या येणे, जखमा लवकर बऱ्या न होणे, पायावरील त्वचेचा रंग फिका पडणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात.
रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर केवळ छातीमध्येच नाहीतर जबडा, डावा हात, पाठ, खांदा आणि दातांमध्ये वेदना वाढू लागतात. कोणत्याही कारणांशिवाय विनाकारण हात किंवा जबड्यात वेदना होत असतील, तर हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण आहे. मज्जातंतू शरीराच्या इतर अवयवांना जोडलेला असल्यामुळे मेंदूला वेदनाची जागा व्यवस्थित ओळखता येत नाही, ज्याचा परिणाम शरीराच्या कोणत्याही अवयवांवर होतो.
रक्तवाहिन्यांमध्ये वाढलेले अडथळे टाळण्यासाठी दैनंदिन आहारात कमीत कमी मीठ आणि साखर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. यासोबतच नियमित ३० मिनिटं व्यायाम, तंबाखू आणि अल्कोहोलपासून दूर, साखरेवर नियंत्रण ठेवणे अतिशय महत्वाचे आहे.
Ans: पायाच्या सुजलेल्या, पिळलेल्या आणि त्वचेखाली दिसणाऱ्या शिरा आहेत, ज्यात रक्त जमा होते.
Ans: पायात निळ्या किंवा जांभळ्या रंगाच्या फुगलेल्या नसा दिसणे. पायात जडपणा, सूज, खाज सुटणे किंवा जळजळ होणे.
Ans: कोलेस्ट्रॉल, चरबी आणि कॅल्शियम हृदयाच्या धमन्यांमध्ये जमा होते, तेव्हा प्लेक (plaque) तयार होतो. यामुळे धमन्या अरुंद होतात आणि हृदयाकडे होणारा रक्तपुरवठा कमी होतो.