थंडीत पायांना पडलेल्या भेगांमधून सतत रक्त येतं? मग स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा आवर्जून करा वापर
थंडीच्या दिवसांमध्ये शरीरासोबतच त्वचा आणि केसांची खूप जास्त काळजी घ्यावी. कारण थंड वातावरणाचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर लगेच दिसून येतो. या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडणे, चेहऱ्यावर पांढरे डाग येणे, त्वचा लाल होणे इत्यादी समस्यांसोबतच पायांमध्ये भेगा सुद्धा पडतात. पायांमध्ये भेगा पडल्यानंतर त्वचा कोरडी होणे, पायांच्या भेगांमधून रक्त येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. थंड वातावरणामुळे पायांच्या भेगा अतिशय कोरड्या पडून जातात. टाचा फुटल्यानंतर पायांचे सौंदर्य कमी होऊन जाते. याशिवाय रोजच्या रुटीनमध्ये अनेक बदल दिसून येतात. पायांना पडलेल्या भेगा कोरड्या झाल्यानंतर चप्पल घालणे सुद्धा कठीण होऊन जाते. अशावेळी वेगवेगळे लोशन किंवा क्रीम लावून पायांची काळजी घेतली जाते. मात्र याचा फारसा परिणाम दिसून येतव नाही. म्हणून आज आम्ही तुम्हाला पायांना पडलेल्या भेगा कमी करण्यासाठी कोणत्या घरगुती पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – istock)
जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी बटाट्याचा वापर केला जातो. यामध्ये असलेले घटक शरीरासोबतच त्वचेसाठी सुद्धा प्रभावी ठरतात. बटाट्याच्या रसाचा वापर केल्यामुळे त्वचेचे रक्षण होते आणि त्वचा मऊ मुलायम दिसते. यासाठी बटाट्याचे दोन तुकडे करून त्यावर हळद, टूथपेस्ट आणि खोबरेल तेल घालून मिक्स करा. त्यानंतर पायांच्या टाचांवर हलक्या हाताने मसाज करा. काहीवेळ मसाज केल्यानंतर पाय तसेच ठेवून द्या. नंतर कोमट पाण्याने पाय स्वच्छ धुवा. हा उपाय नियमित केल्यास पायांना पडलेल्या भेगा कमी होण्यासोबतच डेड स्किन पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. बटाट्यामध्ये असलेल्या नैसर्गिक घटकांमुळे पाय स्वच्छ दिसतात.
त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी कायमच गुलाब पाण्याचा वापर केला जातो. गुलाब पाणी त्वचा कायमच फ्रेश ठेवण्यासाठी मदत करते. त्याप्रमाणे त्वचेच्या फाटलेल्या भेगा भरून काढण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर करावा. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी वाटीमध्ये गुलाब पाणी घेऊन त्यात ग्लिसरीन मिक्स करा. तयार केलेले मिश्रण पायांच्या फाटलेल्या भेगांवर लावून रात्रभर तसेच ठेवावे. यामुळे त्वचा हायड्रेट राहील आणि त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारेल.
मुंबईतील 50% कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना सतावतेय त्वचेची समस्या, कारणं वाचून डोक्याला लावाल हात
त्वचेच्या अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी लिंबू मधाचा वापर केला जातो. मध त्वचा उजळदार करण्यास मदत करते तर लिंबाच्या वापरामुळे त्वचेवर पडलेल्या भेगा आणि डेड स्किन नष्ट होण्यास मदत होते. वाटीमध्ये लिंबाचा रस आणि मध मिक्स करून मिश्रण तयार करा. तयार केलेल्या मिश्रण कापसाच्या सहाय्याने पायांवर लावून काहीवेळ ठेवा. त्यानंतर लिंबाच्या सालीचा वापर करून पायांवर हलक्या हाताने मसाज करा. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास पायांना पडलेल्या भेगा कमी होतील आणि पाय मुलायम मऊ दिसतील.






