ओठ कायमच कोरडे आणि निस्तेज दिसतात? मग 'हे' घरगुती उपाय करून मिळवा गुलाबी ओठ
सुंदर आणि चारचौघांमध्ये उठावदार दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. चेहऱ्याची खूप जास्त काळजी घेतली जाते. पण ओठांकडे अजिबात पहिले जात नाही. मेकअप केल्यामुळे आणखीनच सुंदर दिसण्यासाठी आणि सौंदर्यात भर घालण्यासाठी नेहमीच लिपस्टिक लावली जाते. पण सतत लिपस्टिक लावल्यामुळे ओठांना हानी पोहचते. याशिवाय सिगारेट किंवा धूम्रपान केल्यामुळे ओठांचे आरोग्य काहीसे बिघडून जाते. ओठ काळे झाल्यानंतर ते पुन्हा एकदा गुलाबी आणि सुंदर करण्यासाठी वेगवेगळे उपाय आणि केमिकल ट्रीटमेंट केल्या जातात. याशिवाय लिपबाम आणि बाजारात उपलब्ध असलेले लीप मास्क लावले जातात. ओठ काळे झाल्यानंतर काहीवेळा महिलांना लाजिरवण्यासारखे वाटते.(फोटो सौजन्य – istock)
डोळ्यांखाली काळी झालेली त्वचा उजळदार करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय ठरतील प्रभावी, त्वचा होईल चमकदार
ओठ काळे होण्यामागे अनेक कारण आहेत. त्यातील महत्वाचे कारण म्हणजे शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता. पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीर काळे पडू लागते. शरीरासोबतच ओठ सुद्धा अतिशय काळे होतात. रासायनिक लिपस्टिकचा अतिरेक, झोपेची कमतरता, सूर्यप्रकाशात जास्त वेळ राहिल्यामुळे चेहऱ्यासोबतच ओठांचे सौंदर्य कमी होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काळवंडलेले ओठ पुन्हा एकदा गुलाबी आणि चमकदार करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे ओठ गुलाबी दिसतील.
सुंदर आणि गुलाबी ओठांसाठी नियमित भरपूर पाणी प्यावे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळे दिवसभरात आठ ते दाह ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. तसेच ओठांमधील ओलावा कायमच टिकून राहतो. पण शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानंतर ओठ काळे पडून जातात.
नैसर्गिक रित्या ओठ चमकदार आणि सुंदर ठेवण्यासाठी वाटीमध्ये गुलाब पाणी घेऊन त्यात मध मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण हलक्या हाताने ओठांवर लावून काहीवेळ तसेच ठेवून द्या. यामुळे ओठ चमकदार होण्यास मदत होईल. ओठांचा काळवंडलेला रंग सुधारण्यासाठी मधाचा वापर करावा. मधाच्या वापरामुळे काळे ओठ चमकदार होतात.
टाळूवरील कोंड्यामुळे सतत खाज येते? मग ‘हा’ घरगुती उपाय ठरेल प्रभावी, केस होतील मुळांपासून स्वच्छ
रात्री झोपण्याआधी खोबरेल तेलाने हलक्या हाताने मसाज करून घ्यावा. यामुळे ओठांवरील मऊपणा कायम टिकून राहतो. याशिवाय ओठांवर जमा झालेली डेड स्किन काढून टाकण्यासाठी साखर आणि मध मिक्स करून तयार केलेला स्क्रब ओठांवर लावून हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे ओठांवर जमा झालेली डेड स्किन कमी होईल. याशिवाय गुलाब पाण्यामुळे ओठ हायड्रेट राहतील.