(फोटो सौजन्य: istock)
कर्करोग हा भयानक आजार आहे ज्यात व्यक्तीचा जीव देखील जाऊ शकतो. पूर्वी क्वचित आढळून येणार हा आजार आता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्येच सामान्य झाला आहे. कर्करोग अनेक प्रकारचा असू शकतो ज्यात रक्त कर्करोग म्हणजेच ब्लड कॅन्सरचा समावेश आहे. यात म्हणजे शरीरातील रक्त पेशींचे असंतुलन होऊन असामान्य पेशींची वाढ होते आणि त्या सामान्य रक्त पेशींच्या निर्मितीमध्ये अडथळा आणतात. हा अस्थिमज्जामध्ये (बोन मॅरो) सुरू होतो, जिथे रक्त तयार होते. रक्ताचा कर्करोग हा ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मल्टिपल मायलोमा यांसारख्या विविध प्रकारांमध्ये येतो.
कर्करोग केंद्राच्या मते, सर्व प्रकारचे ब्लड कॅन्सर डीएनएमधील गोंधळ किंवा उत्परिवर्तनांमुळे होतात. हे बदल का होतात याचे नेमके कारण माहित नाही. असे म्हणता येईल की मानवांचे त्यावर नियंत्रण नाही. लक्षात ठेवा की रक्त कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकारच्या रक्त कर्करोगासाठी हे जोखीम घटक वेगवेगळे असू शकतात. तथापि संशोधनात काही जोखीम घटक आढळले आहेत जे रक्त कर्करोगाचा धोका वाढवू शकतात. आज आम्ही तुम्हाला आपल्या रोजच्या जीवनातील काही अशा सवयींविषयी माहिती सांगत आहोत ज्या ब्लड कॅन्सरचा धोका वाढवण्याची घातक ठरू शकतात. या सवयींना वेळीच रोखलं नाही तर तुम्ही तुमचे आरोग्य संकटात टाकू शकता.
धूम्रपानाचे सेवन
धूम्रपान आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही, ते डीएनएचे नुकसान करते ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे शरीराला रोगांशी लढण्यात अडथळा निर्माण होतो. म्हणजेच तुमची ही समस्या कर्करोगाच्या समस्येला रोखण्यास समस्या निर्माण करते. हे ध्यानात घेणे गरजेचे आहे की दीर्घकाळ धूम्रपान करण्याची सवय ब्लड कॅन्सरचा धोका झपाट्याने वाढवत असते.
अल्कोहोलचे अतिसेवन
धुम्रपानाबरोबरच आणखीन एक वाईट सवय जोडली जाते ती म्हणजे मद्यपान करण्याची सवय. मद्यपानाचे जास्ती सेवन हाडांच्या आत असलेल्या अस्थिमज्जा नष्ट होतात. ही अशी जागा आहे जिथे रक्तपेशी तयार होतात. जेव्हा जास्त प्रमाणात मद्यपान केले जाते तेव्हा नवीन रक्तपेशी तयार होण्याची प्रक्रिया मंदावते किंवा थांबते. यामुळे रक्त कर्करोगाचा धोका हळूहळू वाढत जातो.
रसायनांचा संपर्क
बेंझिन सारखी काही धोकादायक रसायने शरीरात दीर्घकाळ राहिल्यास रक्ताचा कर्करोग होऊ शकतात. सिगारेटचा धूर, पेट्रोल आणि काही प्लास्टिक उत्पादनांमध्ये बेंझिन आढळते. या रसायनांच्या सतत संपर्कात राहिल्याने डीएनए खराब होतो आणि कर्करोगाचा धोका वाढतो.
रेडिएशन
जर एखाद्या व्यक्तीला जास्त काळ हाय रेडिएशनच्या संपर्कात ठेवले तर ते त्याच्या पेशींच्या डीएनएमध्ये बदल घडवू शकते. डीएनएला होणारे हे नुकसान हळूहळू रक्ताच्या कर्करोगाचे रूप धारण करू शकते. सामान्य जीवनात हा धोका कमी असतो. जे लोक हाय रेडिएशनच्या संपर्कात दररोज काम करत आहेत त्यांना ब्लड कॅन्सर होण्याचा धोका जास्त आहे.
लठ्ठपणा
लठ्ठपणा हा सातत्याने वाढत चाललेली आरोग्य समस्या आहे ज्यामुळे अनेक आजारांना खुले आमंत्रण मिळते. लठ्ठपणा हे केवळ एकाच नव्हे तर अनेक प्रकारच्या कर्करोगाचे मूळ कारण आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की निरोगी वजन राखल्याने काही रक्त कर्करोग, विशेषतः ल्युकेमिया, टाळता येतात. निरोगी आहार आणि व्यायाम करून वाढलेले वजन कमी करता येऊ शकते.
कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी काय करावे?
चांगला आहार आणि व्यायाम करून तुम्ही ब्लड कॅन्सरचा धोका टाळू शकता.
ब्लड कॅन्सरची लक्षणे
थकवा आणि अशक्तपणा, वारंवार होणारे संसर्ग, सहजपणे जखमा होणे किंवा रक्तस्त्राव होणे, हाडे किंवा सांध्यांमध्ये वेदना होणे.