पायांवर पाय ठेवून बसल्यामुळे आरोग्यावर होणारे परिणाम
आपल्यातील अनेकांना सतत पाय हलवण्याची किंवा पायांवर ठेवून बसण्याची सवय असते. कुठल्याही ठिकाणी उभं राहिल्यानंतर किंवा बेडवर बसल्यानंतर सतत काहींना पाय हलवल्याशिवाय करमतच नाही. मात्र पायांवर पाय ठेवणे ही अतिशय चुकीची सवय आहे. पायांवर पाय ठेवून बसल्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. पायांवर पाय ठेवून बसल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात. त्यामुळे तुम्हाला देखील पायांवर पाय ठेवण्याची सवय असेल तर वेळीच बदल करून आरोग्याची काळजी घ्यावी. दैनंदिन जीवनातील छोट्या मोठ्या चुकीच्या सवयी आरोग्य बिघडण्यामागचे कारण असू शकतात.(फोटो सौजन्य – iStock)
खुर्ची किंवा टेबलवर बसल्यानंतर अनेकांना पायांवर पाय टाकून आरामदायी बसण्याची सवय असते. याशिवाय पायांवर पाय ठेवून बसल्यामुळे काहींनचा आत्मविश्वास वाढतो. मात्र तुम्ही हीच चुकीची सवय आरोग्य बिघडण्याचे कारण असू शकते. यामुळे शारीरिक समस्यांसोबतच मानसिक समस्या देखील उद्भवू शकतात. त्यामुळे बाहेर बसल्यानंतर किंवा खुर्चीवर बसल्यानंतर पायांवर पाय ठेवून बसू नये.
नेहमी नेहमी पायांवर पाय ठेवून बसल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे व्हेरिकोज व्हेन्स हा गंभीर आजार होऊ शकतो. त्यामुळे पायांवर चुकूनही पाय ठेवून बसू नये. शरीराच्या रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. गर्भवती महिलांसाठी ही सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते. कारण गर्भधारणेदरम्यान शरीरातील रक्तप्रवाह कमी होतो आणि आरोग्य लगेच बिघडते. याशिवाय गर्भाच्या स्थितीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी नियमित करा ‘या’ फळाचे सेवन, चवीसोबत आरोग्याला होतील अनेक फायदे
गर्भवती महिला बसल्यानंतर पायांवर पाय ठेवून बसल्यास प्रसूती काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. किंवा प्रसूती गुंतागुंतीची होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे गर्भवती महिलांनी चुकूनही पायांवर पाय ठेवून बसू नये. पायांवर पाय ठेवून बसल्यामुळे शरीरातील रक्तदाब 8 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असते. तसेच रक्तवाहिन्यांवर दाब येण्याची येण्याची शक्यता असते. पायांवर पाय टाकून बसल्यामुळे पाठदुखी, मान आणि खांदे दुखीची समस्या उद्भवण्याची शक्यता असते.त्यामुळे पायांवर पाय टाकून बसण्याऐवजी 30 मिनिटांनी उठून बसून काहींना काही हालचाल करावी. शरीरात शारीरिक हालचालींचा अभाव निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित समस्या उद्भवतात.