बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी नियमित करा 'या' फळाचे सेवन
राज्यासह देशभरात सगळीकडे आवळा फळ मिळते. आवळ्याचे सेवन केल्यामुळे शरीर सुधारते. यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, ज्यामुळे शरीरासह त्वचेला अनेक फायदे होतात. नियमित आवळ्याचे किंवा आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे पचनसंस्था कायम निरोगी राहील. आवळ्यामध्ये विटामिन सी, विटामीन ए, फायबर इत्यादी अनेक घटक आढळून येतात. शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित एक आवळा खावा. यामुळे पोटात आणि आतड्यांमध्ये साचून घाण स्वच्छ होईल. आज आम्ही तुम्हाला आवळ्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
दैनंदिन आहारात नियमित आवळ्याचे सेवन केल्यामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारते. याशिवाय यामध्ये असलेले फायबर आतड्यांचे कार्य सुरळीत करण्यासाठी मदत करतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे घरच्या घरी तुम्ही पद्धतीमध्ये आवळ्याचे सेवन किंवा आवळ्याचा रस तयार करू शकता. आवळ्याचा रस तयार करण्यासाठी मिक्सच्या भांड्यात आवळा, आल्याचा तुकडामी पुदिन्याची पाने आणि चवीनुसार मीठ टाकून बारीक वाटून त्यातील रस तुम्ही पिऊ शकता. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतील.
आवळ्याचे सेवन केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. साथीच्या आजारामुळे शरीरात सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. अशावेळी नियमित आवळ्याचा रस प्यावा. आवळ्याचा रस प्यायल्यामुळे थकवा कमी होऊन रोगप्रतिकारशक्ती सुधारते. कच्चा आवळा खाणे अनेकांना आवडत नाही, अशावेळी तुम्ही आवळ्याचा वापर करून ज्युस, मुरंबा किंवा गोड आवळा बनवू शकता.
त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी आवळ्याचा रस प्यावा. आवळ्यामध्ये असलेले विटामिन सी त्वचेवर आलेले पिंपल्स, काळे डाग, मुरूम किंवा सुरकुत्या कायमच्या कमी करण्यासाठी मदत करतो. धूळ, माती इत्यादी हानिकारक घटक त्वचेच्या ओपन पोर्समध्ये साचून राहतात. अशावेळी त्वचेमधील घाण स्वच्छ करण्यासाठी आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यास त्वचा आतून स्वच्छ होते.
जगभरात मधुमेहाच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आरोग्यासह शरीरातील इतर अवयवांना हानी पोहचते. त्यामुळे रक्तातील वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आवळ्याच्या रसाचे सेवन करावे. आवळ्याचा रस साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतो. याशिवाय या रसाचे सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. ज्यामुळे हृदयाचे कार्य सुधारते.