
सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग 'या' पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो
Skin Care: गणपती बाप्पाच्या आगमनानंतर लवकरच नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे. नऊ दिवस सगळीकडे देवीचे आगमन करून संध्याकाळच्या वेळी दांडियांचे आयोजन केले जाते. सणवारांच्या दिवसांमध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी महिला बाहेर पडतात. उन्हात तासनतास फिरत राहिल्यामुळे त्वचा काळवंडून जाते. चेहऱ्यावर वाढलेल्या डेड स्किनमुळे त्वचेची गुणवत्ता काहीशी खराब होऊन जाते आणि त्वचेवर काळे डाग दिसू लागतात. सध्या सगळीकडे ऑक्टोबर हिट चालू असल्यामुळे गर्मी वाढली आहे. वाढत्या गर्मीत त्वचेचे रक्षण करणे फार आवश्यक आहे. अन्यथा त्वचेच्या समस्या वाढून काळे डाग, पिंपल्स आणि टॅन वाढतो.(फोटो सौजन्य – AI)
त्वचा काळी पडल्यानंतर कायमच क्लीनअप, फेशिअल तर काहीवेळा महागड्या स्किन ट्रीटमेंट सुद्धा करून घेतल्या जातात. त्वचेवरील ग्लो वाढवण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रॉडक्ट, सिरम वापरून स्किन केअर केले जाते. पण वारंवार महागड्या स्किन केअरचा वापर चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे त्वचा सुंदर दिसण्याऐवजी आणखीनच खराब होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेवर वाढलेला टॅन कमी करण्यासाठी चिंच कोळचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
चिंचेचा वापर जेवणातील विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. आंबट चवीची चिंच केवळ जेवणाची चव वाढवत नाहीतर त्वचेवरील हरवलेली चमक पुन्हा परत मिळ्वण्यास मदत करतात. चिंचमध्ये असलेले नैसर्गिक गुणकारी घटक त्वचेवर वाढलेला टॅन कमी करतात आणि चेहऱ्यावरील ग्लो वाढवतात. चिंचेचा छोटा तुकडा घेऊन पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर चिंचेचा गर काढून त्यात कोरफड जेल आणि १ चमचा दही घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कोरडा करून त्वचेवर तयार केलेले मिश्रण लावा. १० मिनिटं चेहऱ्यावर लेप तसाच ठेवून द्या.
लेप कोरडा झाल्यानंतर हातांना पाणी लावून हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. मसाज केल्यामुळे त्वचेवर जमा झालेल्या मृत पेशी नष्ट होण्यास मदत होईल. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि काळे डाग कमी करण्यासाठी आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा चिंचेचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचेच्या समस्या कमी होतील आणि चेहरा उजळदार दिसेल. चिंचेच्या मिश्रणात तुम्ही मध, बेसन मिक्स करून सुद्धा फेसपॅक तयार करू शकता. या फेसपॅकच्या वापरामुळे त्वचेवर जमा होणारे अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होईल. टॅनिंग कमी करण्यासाठी चिंच खूप फायदेशीर ठरते.