Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Care Tips: पिंपल्स सुरकुत्या कायमच्या होतील गायब! कच्च्या दुधात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, दिवाळीआधी त्वचा दिसेल देखणी

Skin Care Tips: त्वचेची काळजी घेताना कायमच महागड्या स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. कच्च्या दुधात केशर मिक्स करून लावल्यास महिनाभरात चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्यास मदत होईल आणि चेहरा उजळदार दिसेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 29, 2026 | 09:56 AM
पिंपल्स सुरकुत्या कायमच्या होतील गायब! कच्च्या दुधात मिक्स करा 'हा' पदार्थ, दिवाळीआधी त्वचा दिसेल देखणी

पिंपल्स सुरकुत्या कायमच्या होतील गायब! कच्च्या दुधात मिक्स करा 'हा' पदार्थ, दिवाळीआधी त्वचा दिसेल देखणी

Follow Us
Follow Us:

Skin Care Tips: दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. दिवाळीच्या आधी चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन फेशिअल, क्लीनअप तर महागडे फेस सीरम, फेसपॅक त्वचेवर लावले जातात. यामुळे त्वचा काही काळापुरती अतिशय सुंदर आणि चमकदार दिसते. पण काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते. वातावरणात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता आणि सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. याशिवाय वारंवार केमिकल प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचा सैल पडते आणि त्वचेच्या समस्या वाढू लागतात. चेहऱ्यावर पिंपल्स, बारीक रेषा दिसू लागल्यानंतर महागड्या अँटी- एजिंग क्रीम्सचा वापर करण्यावर हजारो रुपये खर्च केले जातात. पण त्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेले पदार्थ त्वचेसाठी वापरावेत.(फोटो सौजन्य – istock)

Skin Infection: त्वचेवर लालसरपणा आणि सूज दिसल्यास व्हा सावध! जाणून घ्या संसर्गाची गंभीर लक्षणे

साहित्य:

  • कच्चे दूध
  • केशर
  • कापूस

कृती:

वाटीमध्ये कच्चे दूध घेऊन त्यात केशर काड्या घाला आणि १० ते १५ मिनिटं तसेच ठेवून द्या. केशराचा रंग दुधात उतरल्यानंतर कापूस किंवा ब्रशच्या मदतीने चेहऱ्यावर लावून घ्या. त्यानंतर २० मिनिटं चेहऱ्यावर तसेच ठेवून द्या. यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. आठवड्यातून तीनदा किंवा चारदा केशर आणि दुधाचे मिश्रण त्वचेवर लावल्यास त्वचा आतून स्वच्छ होण्यास मदत होईल. तरुण, सुंदर आणि डागविरहित त्वचेसाठी घरगुती पदार्थ सुद्धा प्रभावी ठरतात कच्च्या दुधात केशर मिक्स करून लावल्यास चेहऱ्यावर चमकदार ग्लो येईल आणि त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होईल.केशर आणि दुधाचे मिश्रण लावल्यानंतर हलक्या हाताने त्वचेवर मसाज करा. यामुळे रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होईल.

महागड्या Makeup Remover चा वापर करण्याऐवजी ‘हे’ पदार्थ वापरून काढा चेहऱ्यावरील मेकअप, त्वचा होईल स्वच्छ

केशर आणि कच्चे दूध त्वचेसाठी खूप जास्त प्रभावी ठरते. कच्च्या दुधात असलेल्या लॅटिक ऍसिडमुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग नष्ट होण्यास मदत होतात. त्वचेसाठी वारंवार महागड्या स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावे. घरगुती उपाय केल्यानंतर लगेच फरक दिसून येत नाही. पण नियमित वापर केल्यास महिनाभरात त्वचा चमकदार होते. त्वचेची काळजी घेताना केवळ वरून स्किन केअर न करता आहारात फायबरचे सेवन, भरपूर पाणी आणि शारीरिक हालचाली करणे सुद्धा आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला काय फायदे होतात?

    Ans: दुधामध्ये फॅट्स आणि प्रथिने असतात. मात्र, कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स किंवा सुरकुत्या कमी होतात.

  • Que: सुरकुत्या कमी करण्यासाठी कोणते उपाय प्रभावी आहेत?

    Ans: दररोज SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेले ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरणे, त्वचा मॉइश्चराइज ठेवणे आणि पुरेशी झोप घेणे उपयुक्त ठरते. काही व्यक्तींना त्वचारोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने रेटिनॉइड्सचा फायदा होऊ शकतो.

  • Que: दिवाळीपूर्वी त्वचा चमकदार दिसण्यासाठी काय करावे?

    Ans: त्वचा नियमित स्वच्छ करणे, योग्य मॉइश्चरायझर वापरणे, सनस्क्रीन लावणे आणि पुरेसे पाणी पिणे यावर भर द्यावा. दिवाळीपूर्वी नवीन किंवा तीव्र रासायनिक उत्पादने वापरणे टाळावे, कारण त्यामुळे त्वचेवर जळजळ किंवा पुरळ येऊ शकतात.

Web Title: Skin care tips get rid of pimples and wrinkles for good mix this ingredient into raw milk sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 09:56 AM

Topics:  

  • Diwali 2026
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Dhanteras 2026: धनत्रयोदशीला मीठापासून तेलापर्यंत या गोष्टींची देवाणघेवाण करणे टाळा, जाणून घ्या परंपरा
1

Dhanteras 2026: धनत्रयोदशीला मीठापासून तेलापर्यंत या गोष्टींची देवाणघेवाण करणे टाळा, जाणून घ्या परंपरा

Diwali 2026: परंपरेची चव आणि घरगुती स्वाद! दिवाळीतील फराळात बनवा ‘हे’ खास पदार्थ
2

Diwali 2026: परंपरेची चव आणि घरगुती स्वाद! दिवाळीतील फराळात बनवा ‘हे’ खास पदार्थ

Food Safety: सणासुदीच्या दिवसांमध्ये मिठाईवर लावला जाणारा चांदीचा वर्क शरीरासाठी ठरेल विष! उद्भवू शकतात किडनीच्या समस्या
3

Food Safety: सणासुदीच्या दिवसांमध्ये मिठाईवर लावला जाणारा चांदीचा वर्क शरीरासाठी ठरेल विष! उद्भवू शकतात किडनीच्या समस्या

Skin Infection: त्वचेवर लालसरपणा आणि सूज दिसल्यास व्हा सावध! जाणून घ्या संसर्गाची गंभीर लक्षणे
4

Skin Infection: त्वचेवर लालसरपणा आणि सूज दिसल्यास व्हा सावध! जाणून घ्या संसर्गाची गंभीर लक्षणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.