परंपरेची चव आणि घरगुती स्वाद! दिवाळीतील फराळात बनवा 'हे' खास पदार्थ
फराळाच्या ताटातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे करंजी. वेगवेगळ्या पद्धतीने करंजी बनवली जाते. मावा करंजी, रवा करंजी, डाळीची करंजी इत्यादी पदार्थांचा वापर करून करंजी केली जाते.
तांदूळ, चणा डाळ आणि मसाल्यांचा वापर करून चकली भाजणी बनवली जाते. खुसखुशीत चकली फराळाच्या ताटाची शोभा वाढवते. चकली व्यवस्थित होण्यासाठी तेल खूप कडक किंवा थंड नसावे, मध्यम आचेवर पदार्थ तळावा.
बेसन लाडू, रव्याचे लाडू, बुंदीचे लाडू इत्यादी लाडूचे प्रकार दिवाळीच्या फराळात आवर्जून बनवले जातात. त्यातील सगळ्यांचा आवडीचा पदार्थ म्हणजे बेसन लाडू. बेसन लाडूची चव वाढवण्यासाठी त्यात रवा सुद्धा टाकला जातो.
शेंगदाणे, कढीपत्ता, पोहे आणि खंमग फोडणी देऊन बनवलेला पोह्यांचा चिवडा चवीला अतिशय सुंदर लागतो. पोह्यांचा चिवडा महिनाभर व्यवस्थित टिकून राहतो.
पांरपारिक पदार्थांच्या यादीमध्ये आवर्जून अनारसांचे नावे घेतले जाते. अनारसे बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. तांदळाच्या पिठापासून बनवलेले पारंपरिक आणि जाळीदार अनारसे हल्ली खूप कमी घरांमध्ये बनवले जातात.