
सणासुदीच्या दिवसांमध्ये मिठाईवर लावला जाणारा चांदीचा वर्क शरीरासाठी ठरेल विष! उद्भवू शकतात किडनीच्या समस्या
मिठाई खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
चांदीच्या नावाखाली ॲल्युमिनियमची भेसळ?
नकली चांदीचा वर्क कसा ओळखावा?
Food Safety: राज्यासह संपूर्ण देशभरात दिवाळी सणाचा मोठा उत्साह आहे. अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आल्यामुळे घरातील फराळासोबतच बाजरात वेगवेगळ्या मिठाईसुद्धा आल्या आहेत. काजू कतली, केशर पेढा किंवा इतर वेगवेगळ्या पदार्थांवर चांदीचा किंवा सोन्याचा वर्क लावला जातो. चांदीचा वर्क लावल्यामुळे मिठाई अधिक सुंदर आणि आकर्षक दिसते. चमकदार मिठाई पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. पण मिठाईवर लावलेला चांदीचा वर्क खरंच शरीरासाठी फायदेशीर असतो का? असे अनेक प्रश्न तुमच्या देखील मनात येत असतील.(फोटो सौजन्य – istock)
सणासुदीच्या दिवसांमध्ये बाजारातील मिठाई आणि इतर गोड पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. पदार्थांच्या किमतीं वाढवून सुद्धा भेसळ युक्त पदार्थ दिले जातात. मिठाईंवर अस्सल चांदीचा वर्क लावण्याऐवजी भेसळयुक्त आणि नकली वर्क लावून मिठाई विकली जाते. भेसळ युक्त चांदीचा वर्क शरीरासाठी विषासमान मानला जातो. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये मिठाई खरेदी करताना योग्य ती काळजी घेणे फार आवश्यक आहे, अन्यथा फसवणूक होऊ शकते. चला तर जाणून घेऊया चांदीचा वर्क शरीरासाठी का आहे घातक, याबद्दल सविस्तर.
सणावारांच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर मिठाई आणि गोड पदार्थांची खरेदी केली जाते. जास्त नफा कमवण्याच्या नादात चांदीऐवजी ॲल्युमिनियम किंवा इतर स्वस्त व घातक धातूंचा वापर करून बनवलेला चांदीचा वर्क लावला जातो. भेसळयुक्त वर्कचे सेवन केल्याने शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर गंभीर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. किडनी आणि लिव्हरच्या आरोग्यावर परिणाम होऊन शरीरात अनेक बदल दिसून येतात. शरीरात दीर्घकाळ ॲल्युमिनियम किंवा भेसळयुक्त धातू टिकून राहिल्यास पोटाचे आजार, मज्जासंस्थेचे विकार आणि शरीरात विषारी घटक साचून राहतात. त्यामुळे कोणताही गोड पदार्थ घेताना योग्य ती काळजी घेणे फार आवश्यक आहे.
मिठाईवरील वर्क बोटाने हलकासा घासून पाहावा. अस्सल चांदीचा असेल, तर तो लगेच पावडरसारखा बोटाला चिकटून राहील. पण ॲल्युमिनियम किंवा इतर धातूचा असेल तर मोडणार सुद्धा आणि खडबडीत लागेल. वर्कचा एक छोटा तुकडा काढून जाळून पाहावा. अस्सल चांदीचा वर्क असेल तर तो जळून आकुंचन पावतो आणि लहान गोळा तयार होतो. ॲल्युमिनियम किंवा भेसळयुक्त वर्क जळाल्यानंतर काळी किंवा तपकिरी राख पडते. मिठाईवरील नकली वर्क पांढरा आणि डोळ्यांना सुईसारखा टोचणारा असतो तर अस्सल चांदीचा वर्क थोडा सौम्य असतो. त्यामुळे बाजारात गेल्यानंतर कोणत्याही मिठाईची खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यावी.
Ans: वर्खामध्ये शिसे किंवा इतर हानिकारक धातूंची भेसळ असल्यास त्यांचे शरीरात जाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. काही जड धातूंच्या संपर्कामुळे किडनीसह इतर अवयवांवरही परिणाम होऊ शकतो.
Ans: केवळ रंग, चमक किंवा स्पर्शावरून वर्खाची शुद्धता खात्रीने ओळखता येत नाही. त्यामुळे परवानाधारक आणि विश्वासार्ह विक्रेत्याकडून मिठाई खरेदी करावी.
Ans: मिठाई सजवण्यासाठी पिस्ता, बदामाचे काप, केशर किंवा इतर खाद्यपदार्थांसाठी सुरक्षित सजावटीचे घटक वापरता येतात. वापरले जाणारे घटक खाद्यपदार्थांसाठी योग्य आणि सुरक्षित असल्याची खात्री करावी.