Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Infection: त्वचेवर लालसरपणा आणि सूज दिसल्यास व्हा सावध! जाणून घ्या संसर्गाची गंभीर लक्षणे

Skin Infection: त्वचेचा संसर्ग झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने समस्या वाढतात आणि त्वचा खराब होऊन जाते. मधुमेह असलेल्या व्यक्ती, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या व्यक्ती तसेच शस्त्रक्रियेनंतर जखम भरून येण्याच्या प्रक्रियेत असलेल्या व्यक्तींना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असू शकते.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 27, 2026 | 02:00 PM
Skin Infection: त्वचेवर लालसरपणा आणि सूज दिसल्यास व्हा सावध! जाणून घ्या संसर्गाची गंभीर लक्षणे

Skin Infection: त्वचेवर लालसरपणा आणि सूज दिसल्यास व्हा सावध! जाणून घ्या संसर्गाची गंभीर लक्षणे

Follow Us
Follow Us:

Skin Infection: त्वचेवर लालसरपणा, सूज आणि वेदना या सामान्य समस्या आहेत. अनेकदा या समस्या त्वचेची जळजळ, ॲलर्जी किंवा दाह यांमुळे उद्भवतात. मात्र, ही लक्षणे अचानक दिसू लागली, तीव्र झाली किंवा वेगाने पसरू लागली, तर ती त्वचेच्या संसर्गाची चिन्हे असू शकतात. अशा वेळी या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. वेळेत उपचार केल्यास संसर्ग अधिक गंभीर होण्यापासून रोखता येऊ शकतो आणि योग्य उपचार मिळण्यास मदत होते.याविषयी डॉ. सौरभ शाह, सल्लागार त्वचाशास्त्रज्ञ, सैफी हॉस्पिटल, मुंबई यांनी सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)

Pigmentation: दिवाळीपर्यंत चेहऱ्यावरील काळे डाग होतील नाहीसे! महागड्या क्रीमचा वापर करण्याऐवजी करा ‘हे’ घरगुती उपाय

सेल्युलायटिस म्हणजे काय?

त्वचेच्या संसर्गाच्या सामान्य प्रकारांपैकी एक म्हणजे सेल्युलायटिस (Cellulitis). हा त्वचा आणि त्वचेखालील मऊ ऊतींवर परिणाम करणारा संसर्ग आहे. यामध्ये त्वचेचा बाधित भाग गरम होणे, सूज येणे आणि स्पर्श केल्यावर दुखणे अशी लक्षणे दिसतात. त्या भागाला हात लावल्यास वेदना होऊ शकतात. तसेच, त्वचेवरील लालसरपणा हळूहळू वाढू शकतो. काही वेळा या संसर्गासोबत ताप, थंडी वाजणे आणि हुडहुडी भरणे अशी लक्षणेही दिसतात. सेल्युलायटिसची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. उपचार न केल्यास हा संसर्ग शरीराच्या खोलवर असलेल्या ऊतींपर्यंत पसरू शकतो आणि काही प्रकरणांमध्ये रक्तातही पोहोचू शकतो.

नेक्रोटायझिंग सॉफ्ट टिश्यू इन्फेक्शन

त्वचेच्या संसर्गाचा आणखी एक गंभीर प्रकार म्हणजे नेक्रोटायझिंग सॉफ्ट टिश्यू इन्फेक्शन (Necrotising Soft Tissue Infection). हा संसर्ग दुर्मिळ असला, तरी जीवघेणा ठरू शकतो. तो वेगाने पसरतो आणि शरीरातील ऊतींचे नुकसान करतो. या संसर्गाची लक्षणे ओळखणे महत्त्वाचे आहे. सूज आणि वेदना वेगाने वाढणे, त्वचेवर फोड येणे, त्वचेच्या भागातील संवेदना कमी होणे किंवा त्वचेचा रंग जांभळा, गडद अथवा काळा पडणे ही त्याची संभाव्य लक्षणे आहेत. काही वेळा त्वचेवर दिसणाऱ्या बदलांच्या तुलनेत वेदना खूपच तीव्र असतात. अशी लक्षणे आढळल्यास तातडीने रुग्णालयातील आपत्कालीन विभागात जाणे आवश्यक आहे. वेळेत उपचार न मिळाल्यास हा संसर्ग जीवघेणा ठरू शकतो.

काही व्यक्तींना त्वचेच्या संसर्गाचा धोका अधिक असतो. मधुमेह असलेल्या व्यक्ती, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या व्यक्ती तसेच शस्त्रक्रियेनंतर जखम भरून येण्याच्या प्रक्रियेत असलेल्या व्यक्तींना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असू शकते. प्रतिजैविकांचा (Antibiotics) वारंवार वापर करणे किंवा त्यांचा चुकीच्या पद्धतीने वापर करणे यामुळेही काही संसर्गांवर उपचार करणे कठीण होऊ शकते. याचा अर्थ अशा प्रत्येक व्यक्तीला संसर्ग होईलच असे नाही. मात्र, त्वचेवरील कापलेली जखम, खरचटलेला भाग किंवा त्वचेवरील कोणतीही उघडी जखम यांमधून जीवाणू शरीरात प्रवेश करू शकतात. त्यामुळे जखम स्वच्छ ठेवणे आणि तिचे योग्य संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

त्वचेवरील प्रत्येक लालसर किंवा वेदनादायक भाग हा संसर्गामुळेच निर्माण झालेला असतो, असे नाही. ॲलर्जिक रिॲक्शन, कॉन्टॅक्ट डर्मटायटिस (त्वचेचा संपर्कामुळे होणारा दाह) आणि त्वचेच्या दाहाशी संबंधित इतर समस्यांमध्येही अशीच लक्षणे दिसू शकतात. मात्र, या प्रत्येक समस्येवरील उपचार वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे स्वतःच निदान करण्याचा प्रयत्न केल्यास योग्य उपचार मिळण्यास विलंब होऊ शकतो.

त्वचारोगतज्ज्ञांचा वेळीच सल्ला घेतल्यास त्वचेवरील बदल हे संसर्गामुळे झाले आहेत की अन्य कारणांमुळे, हे ओळखण्यास मदत होते. त्वचेवरील लालसरपणा वेगाने पसरत असेल, वेदना तीव्र असतील किंवा त्वचेवर दिसणाऱ्या बदलांच्या तुलनेत वेदना असह्य वाटत असतील, तसेच ताप येणे, फोड येणे, संवेदना कमी होणे किंवा त्वचेचा रंग गडद पडणे अशी लक्षणे दिसत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. ही गंभीर धोक्याची चिन्हे असू शकतात आणि अशा परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे. विशेषतः काही तासांत लक्षणे अधिक तीव्र होत असतील, तर विलंब करणे टाळावे.

महागड्या Makeup Remover चा वापर करण्याऐवजी ‘हे’ पदार्थ वापरून काढा चेहऱ्यावरील मेकअप, त्वचा होईल स्वच्छ

वेळेत निदान होणे आणि योग्य उपचार मिळणे यामुळे गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते. त्वचेच्या काही किरकोळ समस्या योग्य काळजी घेतल्यास आपोआप बऱ्या होऊ शकतात. मात्र, त्वचेवरील लालसरपणा, सूज आणि वेदना कधी गंभीर समस्येचे संकेत देतात, हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य वेळी वैद्यकीय मदत घेतल्यास काही प्रकरणांमध्ये रुग्णाचा जीवही वाचू शकतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: त्वचेवर लालसरपणा आणि सूज दिसणे हे कशाचे लक्षण असू शकते?

    Ans: त्वचेवर लालसरपणा आणि सूज दिसणे हे संसर्ग, ॲलर्जी, कीटक चावणे किंवा त्वचेतील दाह यांमुळे होऊ शकते.

  • Que: त्वचेच्या संसर्गाची सामान्य लक्षणे कोणती?

    Ans: त्वचेवर लालसरपणा, सूज, वेदना, स्पर्श केल्यावर गरम वाटणे, पुरळ किंवा पू येणे ही संभाव्य लक्षणे आहेत. संसर्गाच्या प्रकारानुसार लक्षणे वेगवेगळी असू शकतात.

  • Que: त्वचेच्या संसर्गापासून बचाव कसा करता येतो?

    Ans: त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी, जखम स्वच्छ करून झाकावी, टॉवेल किंवा वैयक्तिक वस्तू सामायिक करणे टाळावे आणि त्वचेवर खाज किंवा जखम झाल्यास ती वारंवार खाजवू नये.

Web Title: Skin infection be alert if you notice redness and swelling on your skin learn about the serious signs of an infection sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • skin care tips
  • Skin disease
  • skin problem

संबंधित बातम्या

महागड्या Makeup Remover चा वापर करण्याऐवजी ‘हे’ पदार्थ वापरून काढा चेहऱ्यावरील मेकअप, त्वचा होईल स्वच्छ
1

महागड्या Makeup Remover चा वापर करण्याऐवजी ‘हे’ पदार्थ वापरून काढा चेहऱ्यावरील मेकअप, त्वचा होईल स्वच्छ

Beauty Tips: दिवाळीआधी वजन होईल कमी, चेहरा दिसेल फ्रेश! ऋजुता दिवेकरानी सांगितलेले ‘हे’ उपाय शरीरासाठी ठरतील फायदेशीर
2

Beauty Tips: दिवाळीआधी वजन होईल कमी, चेहरा दिसेल फ्रेश! ऋजुता दिवेकरानी सांगितलेले ‘हे’ उपाय शरीरासाठी ठरतील फायदेशीर

Pigmentation: दिवाळीपर्यंत चेहऱ्यावरील काळे डाग होतील नाहीसे! महागड्या क्रीमचा वापर करण्याऐवजी करा ‘हे’ घरगुती उपाय
3

Pigmentation: दिवाळीपर्यंत चेहऱ्यावरील काळे डाग होतील नाहीसे! महागड्या क्रीमचा वापर करण्याऐवजी करा ‘हे’ घरगुती उपाय

Skin Care Tips: कोलेजन क्रीम अन् सप्लिमेंट्स खरंच काम करतात? की फक्त मार्केटिंगचा खेळ; तज्ज्ञांनी सांगितलं सत्य
4

Skin Care Tips: कोलेजन क्रीम अन् सप्लिमेंट्स खरंच काम करतात? की फक्त मार्केटिंगचा खेळ; तज्ज्ञांनी सांगितलं सत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.