Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pigmentation: दिवाळीपर्यंत चेहऱ्यावरील काळे डाग होतील नाहीसे! महागड्या क्रीमचा वापर करण्याऐवजी करा ‘हे’ घरगुती उपाय

Pigmentation: चेहऱ्यावर आलेले काळे डाग घालवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे महिनाभरात त्वचा स्वच्छ होते आणि त्वचेच्या समस्या कमी होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 26, 2026 | 09:52 AM
दिवाळीपर्यंत चेहऱ्यावरील काळे डाग होतील नाहीसे! महागड्या क्रीमचा वापर करण्याऐवजी करा 'हे' घरगुती उपाय

दिवाळीपर्यंत चेहऱ्यावरील काळे डाग होतील नाहीसे! महागड्या क्रीमचा वापर करण्याऐवजी करा 'हे' घरगुती उपाय

Follow Us
Follow Us:

चेहऱ्यावर काळे डाग येण्याची कारणे?
त्वचा उजळदार करण्यासाठी उपाय?
पिंपल्स घालवण्यासाठी काय करावे?

Pigmentation: बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण आणि ताणतणावामुळे शरीरासोबतच त्वचेमध्ये सुद्धा अनेक बदल दिसून येतात. चेहऱ्यावर पिंपल्स येणे, काळे डाग, सुरकुत्या, पिगमेंटेशन इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. कालांतराने चेहरा पूर्णपणे खराब होऊन जाते. दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सणावारांच्या दिवसांमध्ये त्वचेवरील ग्लो वाढवण्यासाठी फेशिअल किंवा क्लीनअप करून घेतले जाते. पण यामुळे चेहऱ्यावर तात्पुरता ग्लो येतो आणि काही दिवसानानंतर त्वचा होती तशीच होऊन जाते. बाजारात मिळणाऱ्या महागड्या क्रिम्स, रासायनिक ट्रीटमेंट्स त्वचेसाठी कायमच गुणकारी ठरत नाही. त्यामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग घालवण्यासाठी हे घरगुती उपाय केल्यास दिवाळीपूर्वी चेहरा खूप फ्रेश आणि चमकदार दिसेल.(फोटो सौजन्य – istock)

Skin Care Tips: कोलेजन क्रीम अन् सप्लिमेंट्स खरंच काम करतात? की फक्त मार्केटिंगचा खेळ; तज्ज्ञांनी सांगितलं सत्य

चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय:

आयुर्वेदामध्ये ज्येष्ठमधाला खूप जास्त महत्व आहे. यामध्ये असलेले गुणकारी घटक चेहऱ्यावर वाढलेला टॅन कमी करण्यास मदत करतात. पिग्मेंटेशन कमी करण्यासाठी जेष्ठमधापासून बनवलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावावा. यासाठी वाटीमध्ये जेष्ठमध पावडर घेऊन त्यात दही मिक्स करावे. तयार केलेली पेस्ट मिक्स करून झाल्यानंतर ब्रशच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तशीच ठेवा. फेसपॅक पूर्णपणे सुकल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या. हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा चेहऱ्यावर लावल्यास टॅन कमी होण्यास मदत होईल.

काळी पडलेली त्वचा उजळदार करण्यासाठी तांदूळ, बटाटा आणि बीटचा वापर करावा. फेसपॅक बनवण्यासाठी तांदूळ, बटाटा, टोमॅटो आणि बीट एकत्र करून शिजवून घ्यावे. शिजवून घेतलेले मिश्रण मॅश करून कॉटनच्या कपड्यात बांधून कच्च्या दुधात बुडवून संपूर्ण चेहऱ्यावर लावावे. यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होण्यास मदत होते आणि त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते. त्वचेचा रंग उजळदार करण्यासाठी कायमच महागड्या प्रॉडक्टची आवश्यकता नसते तर स्वयंपाक घरात उपलब्ध असलेले पदार्थ सुद्धा टॅन आणि काळे डाग घालवण्यास मदत करतात.

Eyebrow Hair Care: ७ दिवसांमध्ये भुवया होतील दाट! आयब्रो सुंदर आणि उठावदार दिसण्यासाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

चेहऱ्यावर पिगमेंटेशन वाढवण्यासोबतच खाज सुटणे, जळजळ होणे इत्यादी समस्या सुद्धा वाढू लागतात. संवेदनशील त्वचेवर तुळशीच्या पानांचा रस लावणे गुणकारी ठरते. काचेच्या वाटीमध्ये २० तुळशीची पाने घेऊन पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर तयार केलेले पाणी कापसाच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. यामुळे काळे डाग कमी होण्यास मदत होईल आणि चेहरा स्वच्छ दिसेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: चेहऱ्यावरील काळे डाग कशामुळे निर्माण होतात?

    Ans: चेहऱ्यावर काळे डाग येण्यामागे सूर्यप्रकाश, हार्मोन्समधील बदल, मुरुमांनंतर राहणारे डाग, त्वचेची जळजळ आणि काही औषधांचा परिणाम अशी विविध कारणे असू शकतात.

  • Que: चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत?

    Ans: त्वचेची नियमित स्वच्छता, मॉइश्चरायझरचा वापर आणि दररोज ब्रॉड-स्पेक्ट्रम SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त सनस्क्रीन लावणे उपयुक्त ठरते. घरगुती उपायांपेक्षा डागांचे कारण ओळखून योग्य उपचार करणे महत्त्वाचे आहे.

  • Que: दिवाळीपर्यंत चेहऱ्यावरील काळे डाग पूर्णपणे नाहीसे होऊ शकतात का?

    Ans: हे डागांचे कारण, त्यांची खोली आणि त्वचेचा प्रकार यावर अवलंबून असते. काही डाग कमी होण्यास काही आठवडे किंवा महिने लागू शकतात.

Web Title: Pigmentation dark spots on your face will vanish by diwali instead of using expensive creams try these home remedies sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 09:52 AM

Topics:  

  • Diwali 2026
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Wai News : वाई तालुक्यात फटाक्यांच्या नियमांना हरताळ! प्रशासनाचा वचक नेमका कुठे? वाईकरांचा प्रशासनाला सवाल
1

Wai News : वाई तालुक्यात फटाक्यांच्या नियमांना हरताळ! प्रशासनाचा वचक नेमका कुठे? वाईकरांचा प्रशासनाला सवाल

Pratap Sarnaik : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी दिवाळीपूर्वी वेतन द्या! परिवहन मंत्र्यांचे एसटी प्रशासनाला निर्देश
2

Pratap Sarnaik : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी दिवाळीपूर्वी वेतन द्या! परिवहन मंत्र्यांचे एसटी प्रशासनाला निर्देश

Natural Black Hair: पांढरे केस मुळांपासून होतील काळेभोर! नॅचरल ब्लॅक लूकसाठी ‘या’ पद्धतीने केसांना लावा मेहंदी
3

Natural Black Hair: पांढरे केस मुळांपासून होतील काळेभोर! नॅचरल ब्लॅक लूकसाठी ‘या’ पद्धतीने केसांना लावा मेहंदी

Diwali Car Offers: फक्त 6 लाखात घरी आणा Maruti Suzuki Dzire; दमदार मायलेज आणि सुरक्षिततेमुळे ठरू शकते बेस्ट पर्याय
4

Diwali Car Offers: फक्त 6 लाखात घरी आणा Maruti Suzuki Dzire; दमदार मायलेज आणि सुरक्षिततेमुळे ठरू शकते बेस्ट पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.