Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महागड्या Makeup Remover चा वापर करण्याऐवजी ‘हे’ पदार्थ वापरून काढा चेहऱ्यावरील मेकअप, त्वचा होईल स्वच्छ

Makeup Remover: चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी केमिकल युक्त स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते आणि त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेली घाण नष्ट होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 27, 2026 | 10:05 AM
महागड्या Makeup Remover चा वापर करण्याऐवजी 'हे' पदार्थ वापरून काढा चेहऱ्यावरील मेकअप, त्वचा होईल स्वच्छ

महागड्या Makeup Remover चा वापर करण्याऐवजी 'हे' पदार्थ वापरून काढा चेहऱ्यावरील मेकअप, त्वचा होईल स्वच्छ

Follow Us
Follow Us:

Makeup Remover: लग्न समारंभ, सणवार आणि घरातील कार्यक्रमांच्या वेळी स्त्रिया सुंदर मेकअप, हेअर स्टाईल करून तयार होतात. तसेच कामानिमित्त बाहेर जाताना चेहऱ्यावर हलकासा मेकअप कायमच केला जातो. बऱ्याच स्त्रिया मेकअप केल्याशिवाय घरातून बाहेर जात नाहीत. मेकअप केल्यानंतर सौंदर्यात भर पडते आणि आत्मविश्वास वाढण्यासोबतच चेहरा आकर्षक दिसतो. संपूर्ण दिवसभर मेकअप ठेवल्यानंतर तो रात्रीच्या वेळी स्वच्छ करणे फार आवश्यक आहे. अन्यथा छिद्रांमध्ये घाण जमा होऊन पिंपल्स, ऍक्ने किंवा चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येऊ शकतात. पण बऱ्याचदा कामाच्या धावपळीमध्ये स्त्रिया मेकअप काढणे विसरून जातात. यामुळे त्वचेचे खूप जास्त नुकसान होते.(फोटो सौजन्य – istock)

Pigmentation: दिवाळीपर्यंत चेहऱ्यावरील काळे डाग होतील नाहीसे! महागड्या क्रीमचा वापर करण्याऐवजी करा ‘हे’ घरगुती उपाय

चेहऱ्यावरील मेकअप रात्री झोपण्याआधी न काढल्यास मेकअपचे बारीक कण आणि रासायनिक घटक त्वचेच्या रोमछिद्रामध्ये अडकून बसतात, ज्याच्या परिणामामुळे ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो आणि चेहऱ्यावर पिंपल्स, मुरुम, व्हाईटहेड्स, ब्लॅकहेड्स येऊन त्वचा निस्तेज होऊन जाते. त्यामुळे चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी कायमच महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेले पदार्थ वापरावेत. यामुळे मेकअप सहज निघतो आणि त्वचेचे कोणतेही नुकसान होत नाही.

मेकअप काढण्यासाठी ‘या’ घरगुती पदार्थांचा करा वापर:

घट्ट फाऊंडेशन, वॉटरप्रूफ मस्करा, लिपस्टिक आणि आयलाइनर काढण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करावा. खोबरेल तेलात असलेले नैसर्गिक घटक त्वचेवरील मेकअप सहज काढतात. याशिवाय बेबी ऑईलचा सुद्धा वापर करू शकता. एका स्वच्छ कॉटन पॅडवर तेल घेऊन संपूर्ण चेहऱ्यावर हलक्या हाताने फिरवावे. हलक्या हाताने चेहऱ्यावरील मेकअप काढल्यास तो सहज निघतो. तेल केवळ मेकअप काढत नाहीतर त्वचेवर जमा झालेली घाण सुद्धा स्वच्छ करण्यास मदत करतो. मेकअप काढल्यानंतर केवळ तेलावर अवलंबून न राहता फेसवॉश करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.

कोरफड त्वचेसाठी वरदान मानली जाते. कोरफड जेल त्वचेच्या असंख्य समस्या कमी करण्यास मदत करते. त्वचा थंड आणि कायमच फ्रेश ठेवण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा. हातांवर कोरफड जेल घेऊन संपूर्ण चेहऱ्यावर लावावे आणि हलक्या हाताने मसाज करा. यामुळे काही सेकंदांमध्ये मेकअप वितळून जाईल. त्यानंतर टिश्यू पेपरने किंवा कॉटन पॅडने चेहरा स्वच्छ करून घ्या. यामुळे त्वचा कायमच फ्रेश दिसेल. कोरफड जेलच्या वापरामुळे त्वचेवर कोणत्याही प्रकारची जळजळ होत नाही.

Skin Care Tips: कोलेजन क्रीम अन् सप्लिमेंट्स खरंच काम करतात? की फक्त मार्केटिंगचा खेळ; तज्ज्ञांनी सांगितलं सत्य

मेकअप काढताना त्वचेची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. मेकअप काढण्यासाठी त्वचा जोरजोरात घासू नये. चेहऱ्यावर वाढलेला तेलकटपणा कमी करण्यासाठी मेकअप काढल्यानंतर त्वचा फेशवॉश करणे फारच आवश्यक आहे. त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर कोरडी करून घ्यावी. यामुळे त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये उरलीसुरलेली घाण किंवा केमिकल्स पूर्णपणे नष्ट होण्यास मदत होते आणि चेहरा फ्रेश दिसतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: महागड्या मेकअप रिमूव्हरऐवजी कोणते पदार्थ वापरून मेकअप काढता येतो?

    Ans: मेकअप काढण्यासाठी त्वचेला अनुकूल असलेले नारळाचे तेल, मिनरल ऑइल किंवा सुगंधरहित क्लिन्झिंग ऑइल वापरता येते. मात्र, प्रत्येक पदार्थ प्रत्येकाच्या त्वचेला सूट होईलच असे नाही.

  • Que: नारळाच्या तेलाने चेहऱ्यावरील मेकअप काढता येतो का?

    Ans: होय, नारळाचे तेल काही प्रकारचा मेकअप विरघळवण्यास मदत करू शकते. मात्र, तेलकट किंवा मुरुमांची समस्या असलेल्या त्वचेला ते सूट न होण्याची शक्यता असते.

  • Que: मेकअप काढण्यासाठी एलोवेरा जेल वापरणे योग्य आहे का?

    Ans: एलोवेरा जेल त्वचेला ओलावा देण्यास मदत करू शकते; परंतु ते सर्व प्रकारचा मेकअप, विशेषतः वॉटरप्रूफ मेकअप, पूर्णपणे काढण्यासाठी पुरेसे नसते. त्याऐवजी योग्य क्लिन्झर वापरणे चांगले.

Web Title: Instead of using expensive makeup removers use these substances to remove makeup from your face sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 10:05 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Beauty Tips: दिवाळीआधी वजन होईल कमी, चेहरा दिसेल फ्रेश! ऋजुता दिवेकरानी सांगितलेले ‘हे’ उपाय शरीरासाठी ठरतील फायदेशीर
1

Beauty Tips: दिवाळीआधी वजन होईल कमी, चेहरा दिसेल फ्रेश! ऋजुता दिवेकरानी सांगितलेले ‘हे’ उपाय शरीरासाठी ठरतील फायदेशीर

Pigmentation: दिवाळीपर्यंत चेहऱ्यावरील काळे डाग होतील नाहीसे! महागड्या क्रीमचा वापर करण्याऐवजी करा ‘हे’ घरगुती उपाय
2

Pigmentation: दिवाळीपर्यंत चेहऱ्यावरील काळे डाग होतील नाहीसे! महागड्या क्रीमचा वापर करण्याऐवजी करा ‘हे’ घरगुती उपाय

Natural Black Hair: पांढरे केस मुळांपासून होतील काळेभोर! नॅचरल ब्लॅक लूकसाठी ‘या’ पद्धतीने केसांना लावा मेहंदी
3

Natural Black Hair: पांढरे केस मुळांपासून होतील काळेभोर! नॅचरल ब्लॅक लूकसाठी ‘या’ पद्धतीने केसांना लावा मेहंदी

Skin Care Tips: कोलेजन क्रीम अन् सप्लिमेंट्स खरंच काम करतात? की फक्त मार्केटिंगचा खेळ; तज्ज्ञांनी सांगितलं सत्य
4

Skin Care Tips: कोलेजन क्रीम अन् सप्लिमेंट्स खरंच काम करतात? की फक्त मार्केटिंगचा खेळ; तज्ज्ञांनी सांगितलं सत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.