सोशल मीडियाचा मनावर काय होतोय परिणाम
सोशल मीडिया २००० च्या दशकाच्या सुरुवातीला फ्रेंडस्टर, मायस्पेस, लिंक्डइन या प्लॅटफॉर्म्सच्या उदयानंतर महत्त्व प्राप्त करू लागला आणि आजच्या घडीला, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट आणि एक्स (पूर्वी ट्विटर) सारख्या प्लॅटफॉर्म्सनी त्याची जागा घेतली आहे. एका सर्वेक्षणानुसार, भारतात १८-२५ वयोगटातील लोक सोशल मीडिया वापरणाऱ्यांमध्ये आघाडीवर आहेत, त्यापैकी ३१% लोकं सहा ते नऊ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर करतात.
आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रोहन जहागीरदार म्हणाले, सोशल मीडिया हे नवीन लोकांशी संवाद साधण्यासाठी, आपले प्रियजनांशी संपर्कात राहण्यासाठी, विविध मुद्द्यांवर जागरूकता पसरवण्यासाठी आणि सर्जनशील कल्पना मांडण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ आहे. मात्र, सोशल मीडियाच्या या सकारात्मक बाजूसोबत त्याची एक नकारात्मक बाजूही आहे, विशेषतः तरुणांमध्ये. तरुण वर्गामध्ये सोशल मीडियाच्या वापराचे नकारात्मक परिणाम हे सकारात्मक परिणामांपेक्षा खूप जास्त आहेत.
काय आहेत कारणं

मानसिक आरोग्य बिघडण्यामागील कारणं
या सगळ्यात मोठं कारण म्हणजे FOMO (एफओएमओ) – म्हणजेच “फीअर ऑफ मिसिंग आउट” (काहीतरी चुकतंय अशी भीती). हा शब्द २००४ साली पहिल्यांदा वापरला गेला होता, आणि आजही सोशल मीडियावर खूप सामान्य आहे. तरुण लोक सतत ऑनलाइन राहतात कारण त्यांना काहीतरी चुकतंय असं वाटू नये. इंस्टाग्रामवर नवीन पोस्ट्स पाहणं, ट्रेंडिंग रील्स चेक करणं, स्नॅपचॅट streak ठेवणं, या सगळ्या गोष्टींमध्ये ते गुंतलेले असतात. हे सगळं सुरुवातीला मजेदार वाटू शकतं, पण जसजसा वेळ जातो, तसतसं हे सतत फोन चेक करणं आणि तासन् तास स्क्रीनवर राहणं मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतं.
असुरक्षितता होते निर्माण

दुसऱ्याबाबत जास्त विचार
दररोज प्रभावशाली व्यक्तींचे किंवा आपल्याच ओळखीच्या लोकांचे सुंदर फोटो पाहत राहणं, ज्यांना अनेकदा फिल्टर्स वापरून किंवा फोटोशॉपच्या मदतीने संपादित केलेलं असतं, यामुळे तरुणांमध्ये शरीराच्या प्रतिमेबद्दल (बॉडी इमेज) असुरक्षितता निर्माण होऊ शकते. आणि ह्याचमुळे खाण्याचे विकार किंवा आत्मसन्मान कमी होण्यासारखे गंभीर परिणाम देखील होऊ शकतात.
दुसऱ्यांशी सतत तुलना करणे, मित्रांचं प्रमोशन, त्यांच्या सुट्ट्यांचे फोटो पाहून असूया वाटणे, हे सर्व आपला आत्मविश्वास आणि प्रेरणाशक्ती कमी करू शकतात. आणि अशा प्रकारे हे सर्व मानसिक आरोग्याच्या गंभीर समस्यांना जन्म देऊ शकतात, जसं की नैराश्य किंवा चिंता विकार.
हेदेखील वाचा – मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी ‘या’ कला ठरतील प्रभावी, मेंदूत होईल सुधारणा
काय उपाय करावे

कोणते उपाय करणं ठरेल फायदेशीर
पालकांनी आपल्या मुलांना सोशल मीडियाच्या नकारात्मक परिणामांपासून वाचवण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. म्हणूनच, काही साधे उपाय केले जाऊ शकतात:






