फोटो सौजन्य - Social Media
लता, दादरच्या इंद्रनगर भागात राहत होती. त्या रात्री पोटात आलेली कळ! खरंच साधारण होती का तिला बोलावण्याचे संकेत होते? याचा नेम आणखीन काय लागला नाही. पण त्यानंतरचे दोन रात्र तिच्यासाठी भयंकर होते. काही नाही, मध्य रात्रीच्या सुमारास लताच्या पोटात कळ मारते. तिला ही कळ सावरता येईना. घरामध्ये टॉयलेट नसल्याने ती चाळीच्या कॉमन टॉयलेटकडे जाते. बाहेर अंधाराचा शुकशुकाट असतो. आजूबाजूला कुणीही नसते. त्यांच्या चाळीच्या कॉमन टॉयलेटची परिस्थिती इतकी बेताची की साधी लाईटही आतमध्ये नसते. टॉयलेटच्या मागे एक विजेचा खांब आहे, त्याचा उजेड टॉयलेटमध्ये पडत असतो.
लता टॉयलेटमध्ये असताना. तिला अचानक खिडकीतून एका सावलीचा भास होतो. लता आत घाबरते. इतक्या रात्री कोण असेल बाहेर? अशा प्रश्नांच्या जाळ्यात अडकते. अखेर बाहेर आल्यावर तिला तेथे कुणीच दिसत नाही. त्या रात्रीच्या अंधाराच्या शुकशुकाटीत लता तिच्या घराकडे येते. सगळं काही सुरळीत असतं. पण सकाळ होताच, खरा प्रसंग सुरु होतो. लताला जागेवरून हलता येईना. तिचे शरीर सकाळपासून अगदी जाम झाले असते. हे गच्च शरीर सुटता सुटेना.
अशामध्ये तिला १०३ ताप भरलेला असतो. सकाळची रात्र होते पण लतामध्ये काहीच सुधार होत नाही. तिचे पाय उलट आणखीन घट्ट झालेले असतात. डॉक्टर घरत येऊन तपासून जातात. गोळ्या देतात पण काहीच फरक पडत नाही. त्या रात्री लता थरथर कापत असते. अगदी बत्तीच्या वेळीही अंगात कापरा भरतो. त्या रात्री तिचे वडील त्यांच्या आजोबांना कॉल करतात, जे स्वतः एक भगत असतात. ते हुबेहूब तो प्रसंग सांगतात जे तिच्यासोबत काल रात्री घडलेलं असतं. आजोबा तिच्या बाबांना उपाय सांगतात.
आजोबा म्हणतात “पोरीच्या, अंगावरना लिंबू आणि अंड ओवाळून काढा. जर काही असेल तर लिंबू लाल पडेल आणि अंड तीन तिठावर जाऊन फोडून या. जर काही असेल तर फुटलेल्या अंड्याच्या आतून लाल रंग बाहेर निघेल. लताचे बाबा तिच्या अंगावरून हे सगळं काढतात आणि शेवटी तेच घडतं, जे आजोबा म्हणतात. पण महत्वाचे म्हणजे ती लता जी कालपासून जागची हलली नाही. ती इथे तिथे फिरू लागते. तिच्या अंगामध्ये अचानक ताकद येते.
(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)