Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साध्या चवीत दडलाय आनंद; बिर्याणीच दुसरं व्हर्जन ‘कुस्का राईस’ कधी खाल्ला आहे का? जाणून घ्या रेसिपी

Kuska Rice Recipe : कुस्का राईस दक्षिण भारताचा एक लोकप्रिय पदार्थ आहे. ना भाज्या ना मांस... बासमती तांदूळ आणि मसाल्यांचा वापर करून याला तयार केले जाते. याची चव तुम्हाला वेगळा अनुभव देऊन जाईल.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 21, 2025 | 03:00 PM
साध्या चवीत दडलाय आनंद; बिर्याणीच दुसरं व्हर्जन 'कुस्का राईस' कधी खाल्ला आहे का? जाणून घ्या रेसिपी

साध्या चवीत दडलाय आनंद; बिर्याणीच दुसरं व्हर्जन 'कुस्का राईस' कधी खाल्ला आहे का? जाणून घ्या रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:
  • कुस्का राईस हा दक्षिण भारतातील एक लोकप्रिय भाताचा प्रकार आहे
  • यात मांस वापरले जात नाही
  • मसाले आणि बासमती तांदळाचा वापर करून हा भात तयार केला जातो
दक्षिण भारतातील अनेक खानावळींमध्ये एक असा पदार्थ असतो ज्याचा सुगंध दूरवरूनही आपल्याला आकर्षित करतो तो म्हणजे कुस्का राइस. दिसायला साधा, पण चवीने आश्चर्यकारकपणे संतुलित; मसाल्यांचे सुगंध, तुपाचा सौम्य स्पर्श आणि बासमती तांदळाचे दाणेदार पोत हे सगळे एकत्र आले की या पदार्थाची स्वतःची ओळख तयार होते.

रक्ताची कमतरता बिट भरून काढेल… घरी बनवा गुलाबी बीटाची चपाती; दिसायला आकर्षित अन् चवीला मजेदार

कुस्का राइसची खरी गंमत म्हणजे त्याचे साधेपण. यात मांस नसते, तरीही हा भात बिर्याणीच्या सुगंधाची आठवण करून देतो. जिथे बिर्याणी भारी, मसालेदार आणि समृद्ध असते, तिथे कुस्का मात्र हलका, सुटसुटीत आणि रोजच्या जेवणातही सहज लागू शकणारा आहे. दक्षिण भारतात तो बहुतेकदा चटणी, कोरमा किंवा साध्या रायत्यासोबत खाल्ला जातो. पण त्याची ही साधी, मसाल्यांनी भारलेली चव याला खास बनवते.

कुस्का राईसची उत्पत्ती खानावळी संस्कृतीतून झाली असे म्हटले जाते. मोठ्या बिर्याणीच्या हांडीमधून सुटलेली मसाल्यांची वाफ आणि तेल वापरून साधा भात बनवणे, अशी त्याची सुरुवात मानली जाते. मात्र आज कुस्का राइस हा स्वतंत्र, आवडीने बनवला जाणारा पदार्थ आहे. हलका, सुगंधी आणि तांदळाचे प्रत्येक दाणे मोकळे ठेवण्याची कला यात आवश्यक असते. कमी साहित्य, कमी वेळ आणि तरीही उत्तम चव हीच त्याची खासियत आहे. चला जाणून घेऊया याची सोपी रेसिपी.

साहित्य

  • बासमती तांदूळ – 1 कप
  • तूप – 2 टेबलस्पून
  • कांदा – 1 मोठा (बारीक पातळ चिरलेला)
  • आलं-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
  • हिरवी मिरची – 2 (चिरलेली)
  • तमालपत्र – 1
  • दालचिनी – 1 छोटा तुकडा
  • लवंगा – 3
  • वेलची – 2
  • जिरे – ½ टीस्पून
  • पुदिना – 1 मूठ
  • कोथिंबीर – 1 मूठ
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – 1.75 ते 2 कप
Winter Recipe : हिवाळ्याच्या गारव्यापासून शरीराला सुरक्षित करा, घरी बनवा स्वादिष्ट आणि गरमा गरम ‘चिकन सूप’

कृती

  • यासाठी सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून 20 मिनिटे भिजत ठेवणे,यामुळे भात सुटसुटीत आणि दाणेदार तयार होतो.
  • कढईत तूप गरम करून सुगंधी मसाले तमालपत्र, लवंगा, वेलची, दालचिनी आणि जिरे घालून सौम्य सुगंध येईपर्यंत परता.
  • आता यात पातळ चिरलेले कांदे टाकून सोनेरी आणि किंचित करकरीत होईपर्यंत परता. ही पायरी कुस्क्याची खोली आणि रंग ठरवते.
  • मग यात आलं-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घाला.
  • साहित्य छान शिजल्यानंतर भिजवलेला तांदूळ घालून 1–2 मिनिटे हलक्या हाताने परता.
  • तांदळाच्या दाण्यांवर तुपाचा आणि मसाल्यांचा हलका थर बसतो.
  • आता यात पाणी आणि चवीनुसार मीठ घाला. वरून पुदिना आणि कोथिंबीर टाका. यामुळे भाताला ताजा पदार्थाला ताजा सुगंध मिळतो.
  • मंद आचेवर 15-20 मिनिटे भात वाफेवर शिजवून घ्या.
  • शेवटी गॅस बंद करून 5 मिनिटांनी भात खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • हा कुस्का राइस साध्या रायत्यासोबत किंवा कोरमासोबत अप्रतिम लागतो. त्याच्या हलक्या चवीमुळे तो कोणत्याही ग्रेव्ही, चिकन, पनीर किंवा अंड्याच्या पदार्थासोबत मस्त जुळून येतो.

Web Title: South indian famous dish taste like biryani but little different have you ever try kuska rice note down the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • marathi recipe
  • south Indian dish
  • tasty food

संबंधित बातम्या

Winter Recipe : हिवाळ्याच्या गारव्यापासून शरीराला सुरक्षित करा, घरी बनवा स्वादिष्ट आणि गरमा गरम ‘चिकन सूप’
1

Winter Recipe : हिवाळ्याच्या गारव्यापासून शरीराला सुरक्षित करा, घरी बनवा स्वादिष्ट आणि गरमा गरम ‘चिकन सूप’

रक्ताची कमतरता बिट भरून काढेल… घरी बनवा गुलाबी बीटाची चपाती; दिसायला आकर्षित अन् चवीला मजेदार
2

रक्ताची कमतरता बिट भरून काढेल… घरी बनवा गुलाबी बीटाची चपाती; दिसायला आकर्षित अन् चवीला मजेदार

सकाळच्या नाश्ता करा पौष्टिक आणि चविष्ट, यंदा घरी बनवून खा ‘पालक चिला’; अवघ्या 10 मिनिटांची रेसिपी
3

सकाळच्या नाश्ता करा पौष्टिक आणि चविष्ट, यंदा घरी बनवून खा ‘पालक चिला’; अवघ्या 10 मिनिटांची रेसिपी

सकाळची सुरुवात चहाने करताय? मग थंडीच्या या दिवसांत घरी बनवून पहा गरमा गरम ‘काश्मिरी काहवा’
4

सकाळची सुरुवात चहाने करताय? मग थंडीच्या या दिवसांत घरी बनवून पहा गरमा गरम ‘काश्मिरी काहवा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.