Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिमाचल प्रदेशातील हे ठिकाण फक्त ६ महिने असते खुले, स्वर्गाहून सुंदर दृश्ये अन् पर्यटनासाठी अक्षरशः तडफडतात लोक

आज आम्ही तुम्हाला हिमाचल प्रदेशमधील अशा एका ठिकाणाविषयी माहिती सांगत आहोत जे वर्षातून फक्त ६ महिनेच खुले असते. बर्फाच्छादित पर्वतांनाही आणि बौद्ध मंदिरांनी वेधलेल्या या शांत आणि सुंदर ठिकाणी तुम्हाला स्वर्गाची अनुभूती मि

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 27, 2025 | 08:40 AM
हिमाचल प्रदेशातील हे ठिकाण फक्त ६ महिने असते खुले, स्वर्गाहून सुंदर दृश्ये अन् पर्यटनासाठी अक्षरशः तडफडतात लोक

हिमाचल प्रदेशातील हे ठिकाण फक्त ६ महिने असते खुले, स्वर्गाहून सुंदर दृश्ये अन् पर्यटनासाठी अक्षरशः तडफडतात लोक

Follow Us
Close
Follow Us:

हिमाचल प्रदेशातील लाहौल आणि स्पीती जिल्ह्यात वसलेली स्पीती घाटी ही भारतातील सर्वात सुंदर, शांत आणि रहस्यमय ठिकाणांपैकी एक मानली जाते. ही एक थंड, कोरडी पर्वतीय दरी आहे, जिला चारही बाजूंनी बर्फाच्छादित डोंगर, प्राचीन बौद्ध मठ आणि निळाशार आकाश वेढून टाकतं. ही दरी समुद्रसपाटीपासून सुमारे १२,५०० फूट उंचीवर आहे आणि तिची वेगळी भौगोलिक रचना आणि संस्कृती यामुळे ती भारताच्या पर्यटन नकाशावर एक वेगळी ओळख निर्माण करते.

या देशात २०० रुपयांहून स्वस्त आहेत हॉटेल्स; लग्झरी रूम अन् पर्यटनासाठी एक उत्तम ठिकाण

स्पीती दरीचं खास वैशिष्ट्य काय?

स्पीती दरीचं एक अनोखं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी सुमारे सहा महिने ही दरी भारताच्या इतर भागांपासून पूर्णपणे अलग राहते. विशेषतः नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीत येथे अत्यंत थंडी असते आणि मनालीहून स्पीतीकडे जाणारा कुंजुम पास रस्ता संपूर्ण बर्फाने झाकलेला असतो. त्यामुळे हा मार्ग बंद होतो आणि दळणवळण पूर्णपणे थांबते. अशा परिस्थितीत येथे पोहोचण्यासाठी केवळ हवाई मार्ग किंवा शिमला मार्गे पोहोचणे शक्य असते – तेही थोड्याशा धोकादायक व कठीण परिस्थितीत.

स्पीतीला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणता?

जर तुम्हाला स्पीती दरीचे सौंदर्य अनुभवायचे असेल, तर जून ते सप्टेंबर हा काळ सर्वोत्तम मानला जातो. या काळात बर्फ वितळलेला असतो, रस्ते खुले असतात आणि हवामान प्रवासासाठी अनुकूल असते. याच वेळी पर्यटक येथे बाइक ट्रिप, ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि बौद्ध मठांची सैर यांचा आनंद घेतात. तसेच, जुलै महिन्यात आयोजित होणारा लदारचा महोत्सव हे येथील पारंपरिक आणि सांस्कृतिक आकर्षण ठरते.

स्पीती दरी किती आकर्षक आहे?

स्पीती दरीला अनेकदा “मिनी तिबेट” असेही म्हटले जाते, कारण येथील संस्कृती, बांधकामशैली आणि जीवनशैली तिबेटी बौद्ध परंपरेशी खूप मिळती-जुळती आहे. की मठ, धंकर मठ, किब्बर गाव आणि चंद्रताल सरोवर ही ठिकाणं इतकी सुंदर आहेत की पोस्टकार्डवर छापावी अशी वाटतात. बर्फाच्छादित शिखरं, शांत नदी आणि निळसर आकाश हे दृश्य या ठिकाणी जादुई अनुभव निर्माण करतात. येथे प्रत्येक क्षण हा कॅमेऱ्यात कैद करण्यासारखा असतो.

उत्तराखंडमधील या ठिकाणाला म्हटले जाते भारतातील पहिले गाव, फक्त इथेच घडते सरस्वती नदीचे दर्शन

हवामान कसं असतं?

स्पीती दरीचं तापमान वर्षभर खूपच कमी असतं. मे ते ऑगस्ट या उन्हाळ्याच्या काळात दिवसा तापमान १५°C ते २०°C दरम्यान असतं, तर रात्री ०°C ते ५°C पर्यंत खाली येतं. थंडीच्या महिन्यांत म्हणजेच डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान तापमान -२०°C पर्यंत खाली घसरतं. त्यामुळे येथे येण्यापूर्वी गरम कपडे, औषधं आणि उंचीशी संबंधित तयारी करणे अत्यंत आवश्यक आहे.जर तुम्ही गर्दीपासून दूर, शांत आणि निसर्गरम्य हिमालयी सौंदर्य अनुभवायचं ठरवलं असेल, तर स्पीती दरी हे तुमच्यासाठी एक परिपूर्ण पर्यटनस्थळ ठरू शकतं.

Web Title: Spiti valley in himachal pradesh is open only for 6 months best place to visit travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 08:40 AM

Topics:  

  • Himachal Pradesh
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

भयानक! हिमाचल प्रदेशमध्ये मृत्यूचे तांडव; ५७ दिवसांमध्ये तब्बल…; सरकारच्या आकड्यांनी उडेल थरकाप
1

भयानक! हिमाचल प्रदेशमध्ये मृत्यूचे तांडव; ५७ दिवसांमध्ये तब्बल…; सरकारच्या आकड्यांनी उडेल थरकाप

Work From Anywhere : रिमोट वर्कसाठी भारतातील ‘ही’ 6 ऑफबीट ठिकाणे आहेत सर्वात Trending
2

Work From Anywhere : रिमोट वर्कसाठी भारतातील ‘ही’ 6 ऑफबीट ठिकाणे आहेत सर्वात Trending

300 करोड सोन्याने नटलंय वेल्लोरचं हे अद्भुत श्रीलक्ष्मी नारायणी मंदिर; इथे कसं जायचं? जाणून घ्या
3

300 करोड सोन्याने नटलंय वेल्लोरचं हे अद्भुत श्रीलक्ष्मी नारायणी मंदिर; इथे कसं जायचं? जाणून घ्या

Independence day 2025: एअर इंडिया एक्सप्रेसने सुरु केली ‘Freedom Sale’; फक्त 1,279 रुपयांमध्ये उपलब्ध होणार विमान तिकिटे
4

Independence day 2025: एअर इंडिया एक्सप्रेसने सुरु केली ‘Freedom Sale’; फक्त 1,279 रुपयांमध्ये उपलब्ध होणार विमान तिकिटे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.