भारतातील पहिले गाव
भारतात फिरण्यासाठीची अनेक ठिकाणे आहेत जी नेहमीच अनेक पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात. देशात अनेक राज्ये वसले आहेत आणि प्रत्येक राज्याची आपली अशी काही खासियत आहे. असेच एक राज्य म्हणजे भारतातील उत्तराखंड! देवभूमी म्हणून या ठिकाणाची ओळख आहे. आपल्या धार्मिक महत्त्वासाठी आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी उत्तर प्रदेश नेहमीच फार चर्चेत असते. अशातच आज आम्ही तुम्हाला भारताच्या पहिल्या गावाबद्दल माहिती सांगणार आहोत जे उत्तर प्रदेशमध्ये वसले आहे.
5000 वर्षे जुनं ठिकाण, जिथे पांडवांनी केला होता निवास! भीमकुंडात स्नान करताच दूर होतात सर्व आजार
गावाचे नाव माणा गाव असे असून, ते केवळ आपल्या सुंदरतेसाठीच नाही तर आपल्या ऐतिहासिक महत्त्वासाठीही ओळखले जाते. कामाच्या व्यस्त जीवनातून वेळ काढून कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. चला या गावाची खासियत काय आहे ते जाणून घेऊया.
माणा गाव खास का आहे?
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात माणा गाव वसले आहे. हे गाव भारत-तिबेट सीमेजवळ आहे. बद्रीनाथ धामपासून हे ठिकाण फक्त ३ किलोमीटर अंतरावर आहे. इतिहास आणि संस्कृतीसाठी हे गाव म्हणजे एक खजिनाच आहे. या गावाची खासियत म्हणजे हे गाव भारतातील एकमेव असे गाव आहे जिथे सरस्वती नदीचे दर्शन घडते. यासोबतच, या ठिकाणाबद्दल असेही म्हटले जाते की हे गाव स्वर्गात जाण्याचा मार्ग आहे.
माणा गावाला हे नाव कसे पडले?
या गावाचे नाव मणिभद्र देवाच्या नावावरून माणा ठेवण्यात आले आहे. पृथ्वीवरील हे एकमेव ठिकाण मानले जाते जे चार धामांपेक्षा पवित्र मानले जाते. हे गाव शाप आणि पापांपासून मुक्त मानले जाते. इतकेच नाही तर येथे अशीही एक श्रद्धा आहे की जेव्हा पांडव स्वर्गाकडे जात होते तेव्हा ते या गावातून गेले. येथे एक भीम पूल देखील आहे, ज्याबद्दल असे मानले जाते की भीमाने वाटेत धबधबा ओलांडण्यासाठी दगड फेकून पूल बनवला होता.
कैलास पर्वताचे 5 रहस्य जे तुम्हाला आश्चर्यचकित करतील; का आजवर कुणीही यावर चढू शकलं नाही?
माणा गाव म्हणजे सौंदर्याचे भांडार
धार्मिक आणि पौराणिक श्रद्धांव्यतिरिक्त, हे ठिकाण त्याच्या सौंदर्यासाठी देखील ओळखले जाते. हिमालयीन पर्वतांनी वेढलेले हे गाव त्याच्या नैसर्गिक सौंदर्याने भरलेले आहे. येथे तुम्हाला अनेक सुंदर ठिकाणे आणि दृश्ये पाहता येतील. यामध्ये वसुंधरा धबधबा, व्यास गुहा, तप्त कुंड, सरस्वती नदी इत्यादींचा समावेश आहे.