(फोटो सौजन्य: Pinterest)
फिरण्यासाठी कोणता वेळ काळ बघितली जात नाही. मनाला इच्छा झाली की आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून फिरले पाहिजे. फिरण्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे आहेत. यामुळे मानसिक ताणतणावातून मुक्ती होते आणि आपले मनही आनंदी होते. आता फिरायला जायचे म्हटले की, सर्वात पहिले आपल्या मनात विचार येतो तो म्हणजे तेथे राहण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा… कुठेही फिरायचे असेल कि आधीच तिथल्या हॉटेल्समध्ये आपल्या राहण्याची सोय करून ठेवावी लागते ज्यासाठी बराच खर्च येतो. आपल्या सोई-सुविधांनुसार हॉटेल्सच्या किमती वाढत जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा हॉटेलविषयी माहिती सांगणार आहोत जिथलं भाडं एका बिर्याणीहून कमी आहे आणि मुख्य म्हणजे, यात तुम्हाला चांगल्या सोई-सुविधाही पुरवल्या जातील. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
उत्तराखंडमधील या ठिकाणाला म्हटले जाते भारतातील पहिले गाव, फक्त इथेच घडते सरस्वती नदीचे दर्शन
सोशल मीडियावर एका व्यक्तीने या स्वस्त हॉटेलची माहिती शेअर केली आहे. हे हॉटेल व्हिएतनाममध्ये आहे, जे फिरण्यासाठी एक उत्तम ठिकाण मानले जाते. आम्ही तुम्हाला सांगतो की, इथल्या हॉटेलची किंमत फक्त १६० रुपये आहे! होय, तुम्ही बरोबर ऐकले… एक भारतीय प्रवासी व्हिएतनामच्या सहलीला गेला होता. त्याने सोशल मीडियावर त्याचा अनुभव शेअर केला आणि सांगितले की त्याने तिथे कमी किमतीत रात्र कशी घालवली.
भारतीय प्रवाशाने व्हिडिओमध्ये त्याच्या हॉटेलचे आतील दृश्य देखील दाखवले, यात खोली फारशी मोठी नसली तरी मूलभूत सोई-सुविधा नक्कीच होत्या. जसे की स्वच्छ बेड, पंखा, चार्जिंग पॉइंट आणि वाय-फाय सुविधा. यासोबतच खोलीत व्हेंटिलेशन होते. त्याने असेही सांगितले की तिथले वातावरण खूप चांगले होते आणि हॉटेल कर्मचारीही खूप चांगले बोलत होते. भारतात झपाट्याने महागाई वाढत असताना हॉटेलची ही किंमत सामान्यांसाठी दिलासादायक आहे. तुम्हीही विदेशी पर्यटनाचा विचार करत असाल तर व्हिएतनाम तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल.
ईटीच्या वृत्तानुसार, प्रवाशाने व्हिएतनाममधील लीफ हॉटेल फु क्वोक येथे एक सुपीरियर डबल किंवा ट्विन रूम बुक केली होती. या रूममध्ये मोफत वाय-फाय, पार्किंग, २४ तास चेक-इन आणि क्वीन बेडचा पर्याय देखील होता. रूमची मूळ किंमत ५७८.२४ रुपये होती, परंतु ती तब्बल ७५% सूट देण्यात आली, ज्यामुळे मूळ किंमत फक्त १४४.५६ रुपये झाली. कर आणि शुल्कांमध्ये आणखी १४.४६ रुपये जोडले गेले, ज्यामुळे एकूण बिल १५९.०२ रुपये झाले.
5000 वर्षे जुनं ठिकाण, जिथे पांडवांनी केला होता निवास! भीमकुंडात स्नान करताच दूर होतात सर्व आजार
किंमत इतकी कमी का?
आता अनेकांना प्रश्न पडला असेल की हॉटेलची किंमत इतकी कमी का ठेवली? तर याचे एक मोठे कारण म्हणजे व्हिएतनामचे चलन आणि त्याचे कमी किमतीचे पर्यटन धोरण. व्हिएतनाममध्ये भारतीय चलनाची किंमत फार जास्त आहे आणि तेथील जीवनशैली देखील भारतापेक्षा फार स्वस्त आहे. इथे खास करून लहान ठिकाणी आणि ऑफबीट डेस्टिनेशन्सला हॉटेल्स फारच स्वस्त आहेत.