Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

३० दिवस साखर खाणे पूर्णपणे करा बंद! शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमची मिळेल सुटका, त्वचा डागविरहित सुंदर

३० दिवस साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास मधुमेह नियंत्रणात राहण्यासोबतच वजन कमी होईल, त्वचा सुंदर होण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया साखरेचे अजिबात सेवन न केल्यास शरीराला होणारे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 05, 2026 | 05:30 AM
३० दिवस साखर खाणे पूर्णपणे करा बंद! शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमची मिळेल सुटका, त्वचा डागविरहित सुंदर

३० दिवस साखर खाणे पूर्णपणे करा बंद! शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमची मिळेल सुटका, त्वचा डागविरहित सुंदर

Follow Us
Follow Us:

साखर न खाण्याचे फायदे?
साखर खाण्याचे दुष्परिणाम?
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावे?

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं साखर खायला खूप जास्त आवडते. गोड चवीची साखर चहा बनवताना, जेवणातील विविध पदार्थ बनवताना वापरली जाते. साखरेशिवाय अनेकांना चहा गोड लागत नाही. पण आवडीने खाल्लेले जाणारे लहान आकाराचे बारीक दाणे शरीर आतून पोखरून टाकतात. साखरेचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते. साखर शरीरसंबंधित आजारांचे मूळ कारण आहे. यामुळे मधुमेह, लठ्ठपणा, हृदयरोग, फॅटी लिव्हर यांसारखे गंभीर आजार वाढून आरोग्य बिघडून जाते. अनेक लोक रक्तातील शुगर लेव्हल वाढेल या भीतीने कमीत कमी प्रमाणात सेवन करतात, पण याचा काही फायदा होत नाही. साखरेच्या अतिसेवनामुळे रक्तात साखरेचे प्रमाण वाढते आणि शरीरावर जखमा होण्यास सुरुवात होते. या जखमा लवकर बऱ्या न झाल्यामुळे काहीवेळा निकामी आणि संसर्ग झालेला अवयव काढून टाकावा लागतो.(फोटो सौजन्य – istock)

Recipe : कुरकुरीत नूडल्स, आंबट-गोड सॉस आणि भरपूर भाज्या; रेस्टाॅरंट स्टाईल ‘अमेरिकन चाॅप्सी’ची रेसिपी नोट करा

कोल्ड ड्रिंक, मिठाई, कँडी, कुकीज, गोड पेय, फ्लेवर दही, पॅकेज्ड ज्यूस आणि काही सॉस इत्यादी पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर साखरेचे वापर केला जातो. पण अनेक लोक हेल्दी पदार्थ समजून मोठ्या प्रमाणावर सेवन करतात. यामुळे कालांतराने आरोग्य बिघडते आणि शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे ३० दिवस साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास शरीरावर कोणते परिणाम होतात, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर. साखरेचे सेवन करणे पूर्णपणे बंद केल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

साखर खाणे पूर्णपणे का बंद करत आहेत लोक?

वजन वाढल्यानंतर किंवा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर अनेक लोक साखर खाणे पूर्णपणे बंद करून टाकतात. तर काही नो शुगर चॅलेंज स्वीकारून ते फॉलो सुद्धा करतात. चॅलेंज फॉलो करताना घरातील ताजी फळे, भाज्या, नैसर्गिक गोड पदार्थ इत्यादींचे सेवन करण्याऐवजी पॅक बंद पदार्थ आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन करण्यास जास्त प्राधान्य देतात.यामुळे वजन कमी होण्याऐवजी वजन आणखीनच वाढू लागते आणि शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास ताजी फळे आणि भाज्यांचे आवश्यक सेवन करावे.

३० दिवस अजिबात साखर न खाल्ल्यास का होईल?

साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास सुरुवातीच्या दिवसांमध्ये खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागेल. पण हळूहळू सवय झाल्यानंतर शरीराला भरमसाट फायदे होतात. सतत जास्त गोड खाल्ल्याने किंवा आर्टिफिशिअल शुगर खाल्ल्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढू लागते. यामुळे कालांतराने इन्सुलिन रेजिस्टेन्स आणि टाइप २ डायबिटीसचा धोका वाढतो. त्यामुळे अजिबात साखरेचे सेवन न केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

रात्रीच्या जेवणानंतर अजिबात करू नका ‘या’ चुका, अन्यथा उद्भवतील पचनाच्या समस्या, बद्धकोष्ठता वाढून शरीराचे होईल नुकसान

साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास वाढलेले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल. जास्त साखर असलेल्या पदार्थांमध्ये कॅलरी जास्त असते तर फायबर आणि प्रोटीन युक्त घटक फार कमी आढळून येतात. त्यामुळे कमीत कमी साखर खाल्ल्यास कॅलरीज कमी होतात आणि वजन कमी होण्यास मदत होते. आहारातून साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास त्वचेवर चमकदार ग्लो येईल आणि चेहरा फ्रेश आणि हेल्दी दिसेल. तोंडातील बॅक्टेरिया साखर तोडून ॲसिड तयार करतात, ज्याच्या परिणामामुळे दात खराब होऊन जातात. दात निरोगी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी अजिबात साखरेचे सेवन करू नये.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ३० दिवस साखर बंद केल्याने शरीरात कोणते बदल दिसू शकतात?

    Ans: साखरेचे सेवन कमी केल्याने ऊर्जा स्थिर राहण्यास, वजन नियंत्रणात ठेवण्यास, त्वचेचे आरोग्य सुधारण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. मात्र परिणाम प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळे असू शकतात.

  • Que: साखर पूर्णपणे बंद करणे सुरक्षित आहे का?

    Ans: नैसर्गिकरित्या फळे, दूध आणि काही अन्नपदार्थांमध्ये असलेली साखर शरीरासाठी उपयुक्त असते. प्रामुख्याने रिफाइंड किंवा अतिरिक्त (Added) साखर कमी करण्यावर भर द्यावा.

  • Que: साखर खाण्याची इच्छा कमी करण्यासाठी काय करावे?

    Ans: प्रथिने, फायबरयुक्त आहार, पुरेसे पाणी, नियमित झोप आणि फळांसारखे नैसर्गिक गोड पर्याय यांचा आहारात समावेश केल्यास गोड खाण्याची इच्छा कमी होण्यास मदत होऊ शकते.

Web Title: Stop consuming sugar completely for 30 days get permanent relief from serious health issues and achieve beautiful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • diabetes
  • side effect
  • Sugar

संबंधित बातम्या

Refined Sugar असते तरी काय? बाजारातील भाव कमी करण्यासाठी कंपन्या वाढवणार पुरवठा, नेमका प्लॅन काय?
1

Refined Sugar असते तरी काय? बाजारातील भाव कमी करण्यासाठी कंपन्या वाढवणार पुरवठा, नेमका प्लॅन काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.