Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मान- काखेत काळेपणा वाढला आहे? टॅनिंग नसून आरोग्यासंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या नैसर्गिक उपाय

मानेवर किंवा काखेत वाढलेल्या काळेपणाकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. अन्यथा शरीरसंबंधित आजारांचा धोका वाढून आरोग्य पूर्णपणे बिघडू शकते. चला तर जाणून घेऊया काखेत किंवा मानेवर काळेपणा कशामुळे वाढतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 04, 2026 | 08:00 AM
मान- काखेत काळेपणा वाढला आहे? टॅनिंग नसून आरोग्यासंबंधित असू शकतो 'या' गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या नैसर्गिक उपाय

मान- काखेत काळेपणा वाढला आहे? टॅनिंग नसून आरोग्यासंबंधित असू शकतो 'या' गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या नैसर्गिक उपाय

Follow Us
Follow Us:

महिला कायमच चेहऱ्याची खूप जास्त काळजी घेतात, पण मान, काख किंवा जांघेतील त्वचेकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. मान, काख किंवा जांघेतील त्वचा जाड आणि काळी पडल्यानंतर टॅनिंग समजून साबण बदलून त्वचा स्वच्छ केली जाते. पण हे केवळ टॅनिंग नसून शरीरसंबंधित गंभीर आजाराची लक्षणे आहेत. चेहऱ्यावर वाढलेल्या टॅनिंगकडे कायमच दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. शरीरात वाढलेली साखर, थायरॉईड किंवा Type 2 Diabetes, PCOS, लठ्ठपणा यांसारख्या गंभीर आजाराची लक्षणे आहेत. त्वचेवर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी महिला घरगुती उपाय करतात, पण याचा फारसा परिणाम काळ्या पडलेल्या त्वचेवर दिसून येत नाही.(फोटो सौजन्य – istock)

Facial Icing: चेहऱ्यावर बर्फ लावणे खरोखर फायदेशीर की फक्त ट्रेंड? जाणून घ्या फायदे आणि तोटे

काख, मान किंवा जांघेतील त्वचा काळी पडल्यानंतर कोणतेही उपचार करण्याऐवजी ही समस्या कोणत्या कारणांमुळे उद्भवते, याकडे लक्ष देणे फार आवश्यक आहे. रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण शरीरासाठी गंभीर धोका निर्माण करते. त्यामुळे वेळीच उपचार करून शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला काख, मान किंवा जांघेतील त्वचा कोणत्या आजारांमुळे काळी पडते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हाला सुद्धा लक्षणे दिसू लागल्यास वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे.

त्वचा काळी पडण्या मागील कारणे:

शरीरातील पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देणे बंद तेव्हा स्वादुपिंड अधिक इन्सुलिन तयार करते. रक्तातील अतिरिक्त इन्सुलिन त्वचेच्या पेशींना उत्तेजित करते, ज्याच्या परिणामामुळे मान, काख आणि गुडघ्यांची त्वचा काळवंडून जाते. Type 2 Diabetes झाल्यानंतर दिसून येणारे हे प्रमुख लक्षण आहे. याशिवाय महिलांच्या शरीरात सतत हार्मोनल बदल होत असतात. या बदलांमुळे काहीवेळा मानेवरील त्वचा पूर्णपणे काळी होऊन जाते. हायपोथायरॉईडीझममुळे मेटाबॉलिजम मंदावते आणि त्वचेचा रंग पूर्णपणे बदलून जातो. शरीरात वाढलेला लठ्ठपणा किंवा त्वचेच्या घर्षणामुळे त्वचा काळी पडण्याची जास्त शक्यता असते. स्टिरॉइड्स किंवा गर्भनिरोधक गोळ्यांचे अतिसेवन केल्यामुळे त्वचेवर त्याचे परिणाम दिसून येतात.

काळेपणा नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी उपाय:

चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि काळेपणा कमी करण्यासाठी महिला वारंवार काहींना काही करत असतात. कधी घरगुती उपाय तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून त्वचेवरील टॅनिंग घालवले जाते. यासाठी लिंबू आणि मध एकत्र करून मानेवर हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करा. लिंबाच्या रसात असलेले ब्लिचिंग एजंट काळेपणा दूर करण्यास मदत करते. बेसनाचा लेप त्वचेवर लावल्यास मृत त्वचा नष्ट होऊन जाते.

Monsoon Skin Care: पावसाळ्यातही सनस्क्रीन का लावावे? जाणून घ्या महत्त्वाची कारणे

वाटीमध्ये बेसन आणि दही एकत्र करून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण मानेवर किंवा काळ्या पडलेल्या अवयवांवर लावून काहीवेळ तसेच ठेवा आणि त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. दह्यात असलेल्या लॅक्टिक ॲसिडमुळे मृत त्वचा नष्ट होण्यासोबतच चेहरा हायड्रेट राहतो आणि टॅनिंग कमी होऊन त्वचा स्वच्छ होते. बटाट्यामध्ये ‘कॅटेकोलेज’ नावाचे एन्झाईम असते, ज्यामुळे त्वचेचा रंग उजळदार होण्यास मदत होते. कोरफडीमधील अलोइन त्वचेवर वाढलेला काळेपणा कमी करून त्वचा हायड्रेट करते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मान आणि काखेत काळेपणा का येतो?

    Ans: सततचा घर्षण, जास्त घाम, लठ्ठपणा, इन्सुलिन रेझिस्टन्स, हार्मोनल असंतुलन, PCOS, मधुमेहाची सुरुवात किंवा Acanthosis Nigricans सारख्या त्वचेच्या समस्यांमुळे मान आणि काखेत काळेपणा येऊ शकतो.

  • Que: नैसर्गिक उपायांनी काळेपणा कमी होऊ शकतो का?

    Ans: होय. कोरफड जेल, दही, बेसन, हळद, ओट्स स्क्रब आणि त्वचेची नियमित स्वच्छता यामुळे सौम्य काळेपणा कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र मूळ कारणावर उपचार करणेही आवश्यक आहे.

  • Que: कोणत्या सवयींमुळे मान आणि काखेतील काळेपणा वाढतो?

    Ans: घट्ट कपडे घालणे, जास्त घर्षण, जास्त वजन, त्वचेची योग्य स्वच्छता न ठेवणे, वारंवार शेव्हिंग किंवा चुकीची कॉस्मेटिक उत्पादने वापरणे यामुळे काळेपणा वाढू शकतो.

Web Title: Dark neck and underarms it may not be tanning but a sign of serious health conditions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • diabetes
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Rakshabandhan: Glowing Skin मिळविण्यासाठी हजारो रुपयांची गरज नाही, घरीच करा नैसर्गिक फेशियल
1

Rakshabandhan: Glowing Skin मिळविण्यासाठी हजारो रुपयांची गरज नाही, घरीच करा नैसर्गिक फेशियल

केस खूप जास्त कोरडे झाले आहेत? मग दह्याचा वापर करून घरीच तयार करा हेअर मास्क, केस दिसतील सुंदर
2

केस खूप जास्त कोरडे झाले आहेत? मग दह्याचा वापर करून घरीच तयार करा हेअर मास्क, केस दिसतील सुंदर

पावसाळ्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर कसा करावा? तज्ञांकडून जाणून घ्या योग्य पद्धत
3

पावसाळ्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर कसा करावा? तज्ञांकडून जाणून घ्या योग्य पद्धत

ब्राऊन केसांसाठी कायमच हेअर कलरचा वापर करता? मग मेहेंदी भिजवताना मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांना येईल नॅचरल शेड
4

ब्राऊन केसांसाठी कायमच हेअर कलरचा वापर करता? मग मेहेंदी भिजवताना मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांना येईल नॅचरल शेड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.