Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Tips: जेवणानंतर चहा पिण्याची सवय आहे का? आरोग्यासाठी ठरू शकते घातक; ‘हे’ परिणाम एकदा वाचाच

Side Effects of Drinking Tea After Lunch and dinner: अनेकांना जेवणानंतर चहा पिण्याची सवय असते. मात्र, तज्ज्ञांच्या मते ही सवय दीर्घकाळ पचनक्रिया आणि पोषक घटकांच्या शोषणावर नकारात्मक परिणाम करू शकते.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 03, 2026 | 07:59 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • जेवणानंतर चहा पिण्याची सवय?
  • आरोग्यासाठी ठरेल घातक
  • हे परिणाम नक्की वाचाच
भारतीय घरांमध्ये सकाळच्या चहाबरोबरच अनेकांना दुपारचे किंवा रात्रीचे जेवण झाल्यानंतरही चहा पिण्याची सवय असते. जेवणानंतर गरमागरम चहा घेतल्याने ताजेतवाने वाटते, अशी अनेकांची धारणा आहे. मात्र, आरोग्य तज्ज्ञांच्या मते ही सवय दीर्घकाळ कायम राहिल्यास शरीरावर त्याचे काही नकारात्मक परिणाम होऊ शकतात. विशेषतः पचनक्रिया आणि पोषक घटकांच्या शोषणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते.

Health Tips: डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वत: हून घेताय ‘ही’ औषधे? जीवावर बेतेल; जाणून घ्या दुष्परिणाम

आयरनचे शोषण कमी होऊ शकते

चहामध्ये टॅनिन्स आणि पॉलीफेनॉल्ससारखी संयुगे असतात. ही संयुगे अन्नातील आयरनच्या शोषणात अडथळा निर्माण करू शकतात. त्यामुळे वारंवार जेवणानंतर लगेच चहा पिणाऱ्यांमध्ये कालांतराने आयरनची कमतरता निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो. विशेषतः महिला आणि अॅनिमियाचा धोका असलेल्या व्यक्तींनी याबाबत अधिक काळजी घ्यावी.

पचनक्रियेवर होऊ शकतो परिणाम

जेवणानंतर लगेच चहा घेतल्यास काही व्यक्तींमध्ये अपचन, पोट फुगणे, गॅस किंवा जडपणा जाणवू शकतो. प्रत्येक व्यक्तीची पचनशक्ती वेगळी असली तरी वारंवार आरोग्याच्या अशा  समस्या जाणवत असल्यास ही सवय बदलणे गरजेचे आहे.

अॅसिडिटी आणि छातीत जळजळ वाढू शकते

चहामधील कॅफीन काही लोकांमध्ये अॅसिडिटीची समस्या वाढवू शकते. विशेषतः मसालेदार किंवा जड जेवणानंतर लगेच चहा घेतल्यास छातीत जळजळ, आंबट ढेकर किंवा अस्वस्थता जाणवू शकते.

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती?

तज्ज्ञांच्या मते, जेवणानंतर लगेच चहा पिण्याऐवजी किमान 45 मिनिटे ते 1 तासाचे अंतर ठेवणे अधिक योग्य ठरते. यामुळे शरीराला अन्नातील पोषक घटक शोषून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि पचनक्रियेलाही मदत होते.

या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी

अॅनिमिया, अॅसिडिटी, पचनाच्या तक्रारी किंवा आयरनच्या कमतरतेने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी जेवणानंतर चहा पिणे टाळावे. गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनीही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चहाचे प्रमाण निश्चित करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Monsoon Hair Care: पावसात भिजल्यानंतर केसांची काळजी कशी घ्यावी? ‘या’ सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

Web Title: Health tips tea after meal side effects digestion iron absorption acidity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 07:59 PM

Topics:  

  • food
  • health awareness
  • healthy tea
  • side effect
  • tea side effects

संबंधित बातम्या

Eating Chicken Daily: ३० दिवस नियमित चिकन खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ परिणाम, वजनापासून पचनक्रियेपर्यंत दिसून येतील बदल
1

Eating Chicken Daily: ३० दिवस नियमित चिकन खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ परिणाम, वजनापासून पचनक्रियेपर्यंत दिसून येतील बदल

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम
2

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.