वात-पित्त-कफ दोषामुळे त्रस्त आहात? मग जाणून घ्या प्रकृतीनुसार कोणते डिटॉक्स ड्रिंक ठरतील आरोग्यासाठी प्रभावी
मानवी शरीरात तीन दोष आढळून येतात. मन आणि शरीरासोबतच संपूर्ण आरोग्याचे संतुलन राखण्यासाठी आयुर्वेदामध्ये वात, पित्त आणि कफ अशा तीन प्रकृतींना विशेष महत्व देण्यात आले आहे. शरीरातील या दोषांनुसार शरीराची प्रकृती निश्चित केली जाते. या दोषांच्या असंतुलनामुळे शरीरात अनेक वेगवेगळे आजार उद्भवू लागतात. आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. पण वारंवार दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. शरीर कायमच हेल्दी ठेवण्यासाठी शरीर डिटॉक्स करणे अतिशय महत्वाचे आहे. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे आरोग्याला हानी पोहचते. शरीर स्वच्छ करण्यासाठी आहारात वेगवेगळ्या डिटॉक्स पेयांचे सेवन केले जाते. पण अनेक लोक चुकीच्या डिटॉक्स पेयांचे सेवन करतात, ज्यामुळे प्रकृती आणखीनच बिघडते.(फोटो सौजन्य – istock)
चुकीच्या डिटॉक्स पेयांचे सेवन केल्यामुळे शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. काहीवेळा उलट्या होणे, मळमळ किंवा आरोग्यासंबंधित समस्या उद्भवून शरीराला हानी पोहचते. सकाळी उपाशी पोटी नियमित डिटॉक्स पेयांचे सेवन केल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात, ज्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते, ऊर्जा वाढते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वात, पित्त आणि कफ या प्रकृतीनुसार शरीरासाठी कोणती पेय प्रभावी ठरतील, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे शरीराची ऊर्जा वाढेल.
तुमच्या शरीरात जर वात दोष असेल तर आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात.सांधेसूखी, स्नायूंचे दुखणे, गॅस यांसारख्या समस्या वारंवार उद्भवतील. अशावेळी सुंठ, जिऱ्याची पावडर, चिमूटभर हिंग इत्यादी पदार्थांची आवश्यकता आहे. पेय तयार करताना पाण्यामध्ये जिरे, सुंठ पावडर, चिमूटभर हिंग टाकून पाणी उकळवून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर तयार केलेले पाणी गाळून सेवन करावे. यामुळे शरीरातील वात कमी होण्यास मदत होईल. शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी या डिटॉक्स ड्रिंकचे सेवन करावे.
पित्त दोष कमी करण्यासाठी नियमित डिटॉक्स पेयांचे सेवन करणे आवश्यक आहे. कारण यामुळे चिडचिडेपणा, ॲसिडिटी, पोटात जळजळ होणे, सतत घाम येणे इत्यादी अनेक लक्षण दिसून येतात. डिटॉक्स ड्रिंक तयार करण्यासाठी थंड पाण्यात धणे पावडर, पुदिन्याची पाने, मध घालून काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर तयार केलेले पाणी गाळून सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. यामुळे शरीरात वाढलेली उष्णता शांत होते.
कफ दोष झाल्यानंतर सतत थंडी वाजणे, कफ होणे, अळसपणा वाटणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. यासाठी एक बॉटल पाण्यात हळद, तुळशीची पाने, आल्याचा किस टाकून मिक्स करा. तयार केलेले डिटॉक्स ड्रिंक नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. शरीरात वाढलेला कफ हळदीच्या सेवनामुळे कमी होतो.
वात, पित्त आणि कफ दोष एकमेकांशी संबंधित आहेत:
तिन्ही दोष शरीरात समतोल असणे आवश्यक आहे. एका दोषातील असंतुलन इतर दोषांवरही परिणाम करू शकते.
वात, पित्त आणि कफ दोष कसे संतुलित करावे:
तुमच्या दोषाला अनुरूप असलेले पदार्थ खा. नियमित व्यायाम, पुरेशी विश्रांती, आणि तणावमुक्त जीवनशैली.आयुर्वेदातील उपचार पद्धतींचा अवलंब करा.