Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मणक्याच्या यशस्वी शस्त्रक्रियेने मिळालं नवे आयुष्य! पक्षाघातग्रस्त २१ वर्षीय तरुण पुन्हा राहिला स्वतःच्या पायावर उभा

भारतात वाढत्या मणक्याच्या दुखापतींचा सामना करण्यासाठी पुनर्वसन व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज आहे.विशेषतः दुचाकी अपघातांचे प्रमाण वाढत आहे. हर्ष आता पुन्हा वैद्यकीय शिक्षण सुरू करण्यास उत्सुक असून, स्वतःच्या अनुभवातून प्रेरणा घेऊन भविष्यात स्पाईन सर्जरीमध्ये विशेष प्राविण्य मिळविण्याचा त्याचा निर्धार आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 29, 2026 | 01:55 PM
मणक्याच्या यशस्वी शस्त्रक्रियेने मिळालं नवे आयुष्य! पक्षाघातग्रस्त २१ वर्षीय तरुण पुन्हा राहिला स्वतःच्या पायावर उभा

मणक्याच्या यशस्वी शस्त्रक्रियेने मिळालं नवे आयुष्य! पक्षाघातग्रस्त २१ वर्षीय तरुण पुन्हा राहिला स्वतःच्या पायावर उभा

Follow Us
Follow Us:

२१ वर्षीय हर्ष कल्पेश जैन हा एमबीबीएसचा विद्यार्थी रात्री झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर स्पायनल कॉर्ड (पाठीच्या कण्याच्या मज्जारज्जू) दुखापतीमुळे कमरेखालच्या भागाला पक्षाघात झाला. अपघातानंतर त्याला प्रथम जवळील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, कौटुंबिक आणि अन्य कारणांमुळे जवळपास ४८ तासांनंतर त्याला ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. अशा दुखापतींमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सहा तासांचा ‘गोल्डन अवर’ त्यावेळी निघून गेला होता.(फोटो सौजन्य – istock)

जिम ट्रेनर बनायचंय? ही महत्त्वाची कौशल्ये बाणावी लागतील तुमच्या अंगी! पाहून घ्या टिप्स आणि ट्रिक्स

भारतामध्ये तरुणांमध्ये मणक्याच्या दुखापतींचे प्रमाण चिंताजनक वेगाने वाढत आहे. यामागे मुख्य कारणे म्हणजे रस्ते अपघात आणि उंचावरून पडणे. अशा दुखापतींपैकी सुमारे ४४ ते ४५ टक्के प्रकरणे रस्ते अपघातांमुळे, तर जवळपास ३८ टक्के प्रकरणे पडल्यामुळे होतात. २० ते ४९ वयोगटातील, म्हणजेच सर्वाधिक कार्यक्षम वयोगटातील व्यक्तींमध्ये ही दुखापत अधिक आढळते. विशेषतः खराब रस्ते आणि सुरक्षिततेच्या त्रुटींमुळे होणारे दुचाकी अपघात हे यामागील प्रमुख कारण आहे.हर्ष ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा त्याच्या दोन्ही पायांची हालचाल पूर्णपणे बंद झाली होती. यावरून त्याला पॅराप्लेजिया (कमरेखालच्या भागाचा पक्षाघात) झाल्याचे स्पष्ट झाले. तरीही ऑर्थोपेडिक स्पाईन सर्जन डॉ. प्रियांक पटेल यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेद्वारे मणका स्थिर करणे, त्याची योग्य रचना पूर्ववत करणे आणि मज्जारज्जूवरील दाब कमी करणे हे उद्दिष्ट होते.

डॉ. प्रियांक पटेल म्हणाले, “या रुग्णासंदर्भातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्याला विशेष स्पाईन सेंटरमध्ये पोहोचण्यास झालेला विलंब. दुखापतीनंतर जवळपास ४८ तासांनी तो आमच्याकडे आला, तेव्हा त्याच्या दोन्ही पायांची हालचाल पूर्णपणे बंद झाली होती. लवकर उपचार केल्यास परिणाम अधिक चांगले मिळतात, परंतु उशिरा उपचार झाले म्हणजे उपचार निष्फळ ठरतात असे नाही. या प्रकरणात मज्जारज्जू पूर्णपणे तुटलेली नव्हती. त्यामुळे मणका स्थिर करणे, मज्जारज्जूवरील दाब कमी करणे आणि रुग्णाला बरे होण्याची सर्वोत्तम संधी देणे शक्य झाले. अशा वेळी आशा सोडू नये आणि रुग्णावरील उपचार थांबवू नयेत.”

शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मात्र, डॉक्टरांच्या मते शस्त्रक्रिया हा उपचारांचा केवळ एक भाग आहे. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या पाच ते सहा दिवसांत हर्षच्या पायांमध्ये हालचालीची सुरुवातीची चिन्हे दिसू लागली. यावरून मज्जातंतू पूर्णपणे तुटले नसल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर त्याच्यासाठी नियोजनबद्ध आणि सखोल पुनर्वसन कार्यक्रम सुरू करण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर २४ तासांच्या आत त्याला बसविण्यात आले. हार्नेसच्या सहाय्याने चालण्याचा सराव, मार्गदर्शित हालचाल प्रशिक्षण आणि विशेष फिजिओथेरपी सुरू करण्यात आली. या उपचारांमुळे हालचाली सुधारण्याबरोबरच बेडसोर्स, फुफ्फुसांचे संसर्ग आणि स्नायूंची झीज यांसारख्या गुंतागुंती टाळण्यासही मदत झाली.

डॉ. प्रियांक पटेल म्हणाले, “या रुग्णाच्या पुनर्वसनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. शस्त्रक्रिया मणका स्थिर करते, पण पुन्हा चालणे आणि स्वावलंबी होणे हे सातत्यपूर्ण पुनर्वसनावर अवलंबून असते. लवकर पुनर्वसन सुरू केल्यास हालचाली सुधारतात आणि बेडसोर्स, सांधे आखडणे, फुफ्फुसांचे संसर्ग व स्नायूंची झीज यांसारख्या गुंतागुंती टाळता येतात. हर्षने पक्षाघातातून आधाराच्या सहाय्याने चालण्यापर्यंत केलेली प्रगती हे योग्य वैद्यकीय उपचार, सातत्यपूर्ण पुनर्वसन, कुटुंबाचा पाठिंबा आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या एकत्रित परिणामाचे उत्तम उदाहरण आहे.या संपूर्ण काळात हर्षने खचून न जाता अत्यंत शिस्तबद्धपणे पुनर्वसन पूर्ण केले. वैद्यकीय शिक्षण घेत असल्याने त्याने उपचार प्रक्रियेचे महत्त्व समजून घेतले. कुटुंबीय आणि वैद्यकीय पथकाच्या मदतीने फिजिओथेरपी, मूत्राशय व्यवस्थापन, चालण्याचे प्रशिक्षण आणि मानसिक समुपदेशन यांचा समावेश असलेला विशेष कार्यक्रम त्याने सातत्याने पूर्ण केला.

चिकन मटण खाण्याऐवजी आहारात करा ‘या’ प्रोटीनयुक्त फळांचे सेवन, थकवा- अशक्तपणा कमी होऊन राहाल कायमच फिट

आज हर्ष पूर्ण पक्षाघाताच्या अवस्थेतून आधाराच्या सहाय्याने चालण्यापर्यंत पोहोचला आहे. पुढील काही महिन्यांत तो पूर्णपणे स्वावलंबीपणे चालू शकेल, असा डॉक्टरांना विश्वास आहे.हर्षच्या अनुभवातून आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. मणक्याला दुखापत झालेल्या रुग्णांना योग्य प्रकारे स्थिर न करता हलविल्यास मज्जारज्जूचे नुकसान अधिक वाढू शकते. त्यामुळे अशा रुग्णांना योग्य स्थिरीकरण करून रुग्णवाहिकेतूनच हलविणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

डॉक्टरांच्या मते, या प्रकरणातून तीन महत्त्वाचे संदेश मिळतात. वेळेत उपचार झाल्यास परिणाम अधिक चांगले मिळतात, मात्र उशिरा उपचार झाले तरीही त्यांचा फायदा होऊ शकतो; शस्त्रक्रियेनंतर सातत्यपूर्ण पुनर्वसन अत्यावश्यक आहे; आणि भारतात वाढत्या मणक्याच्या दुखापतींचा सामना करण्यासाठी पुनर्वसन व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज आहे.विशेषतः दुचाकी अपघातांचे प्रमाण वाढत असताना हर्षची कहाणी ही एकीकडे सावधगिरीचा इशारा देणारी असून, दुसरीकडे योग्य वैद्यकीय उपचार, नियोजनबद्ध पुनर्वसन आणि जिद्दीच्या बळावर गंभीर मणक्याच्या दुखापतीनंतरही अर्थपूर्ण पुनर्प्राप्ती शक्य असल्याचा आशादायी संदेश देणारी आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मणक्याची शस्त्रक्रिया कोणत्या परिस्थितीत करावी लागते?

    Ans: मणक्याला गंभीर दुखापत, डिस्कचा त्रास, मज्जारज्जूवर दाब येणे, फ्रॅक्चर किंवा पक्षाघाताचा धोका असल्यास डॉक्टर शस्त्रक्रियेचा सल्ला देऊ शकतात.

  • Que: मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा चालणे शक्य होते का?

    Ans: हे दुखापतीचे स्वरूप, उपचाराची वेळ, रुग्णाची शारीरिक स्थिती आणि पुनर्वसन यावर अवलंबून असते. काही रुग्णांमध्ये योग्य उपचारांनंतर चालण्याची क्षमता सुधारू शकते.

  • Que: मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर कोणती काळजी घ्यावी?

    Ans: डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे, जड वजन उचलणे टाळणे, नियमित फॉलो-अप करणे, संतुलित आहार घेणे आणि फिजिओथेरपी सुरू ठेवणे आवश्यक आहे.

Web Title: Successful spine surgery gives 21 year old paralysis patient a new lease on life walks again on his own feet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • Accident Case
  • Doctor advice
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा
1

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
2

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.