Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sudden Memory Loss Case : अशक्तपणा नाही, ना बोलण्यात अडचण; तरी अचानक स्मरणशक्ती गेली, ६० वर्षीय व्यक्तीला दुर्मिळ स्ट्रोकचा फटका

Sudden Memory Loss Case : ६० वर्षीय व्यक्तीला अचानक अलीकडील घटना लक्षात ठेवण्यात अडचण येऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. शरीरात अशक्तपणा किंवा बोलण्यात अडचण यांसारखी स्ट्रोकची सामान्य लक्षणे नसतानाही एमआरआय तपासणीत मेंदूतील थॅलेमसच्या पुढील भागात रक्तपुरवठा खंडित झाल्याचे आढळले.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 21, 2026 | 09:17 PM
GENERATE AI PHOTO

GENERATE AI PHOTO

Follow Us
Follow Us:
  • मर्यादित भागात रक्तपुरवठा   
  • मेंदूच्या कोणत्या भागावर परिणाम  
  • स्ट्रोकच्या उपचारांमध्ये प्रत्येक मिनिट महत्त्वाचे  
 

Sudden Memory Loss Case : अलीकडे घडलेल्या घटना लक्षात ठेवण्यात अचानक अडचण येऊ लागल्याने ६० वर्षीय एका व्यक्तीला रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) आणण्यात आले. स्ट्रोकमध्ये सामान्यतः दिसणाऱ्या लक्षणांपेक्षा या रुग्णाची अवस्था वेगळी होती. त्याला शरीरात अशक्तपणा, बोलण्यात अडचण किंवा इतर कोणतीही स्पष्ट न्यूरोलॉजिकल लक्षणे नव्हती.

अचानक उद्भवलेल्या स्मरणशक्तीच्या समस्येमागील नेमके कारण सुरुवातीला ओळखणे कठीण झाले. सुरुवातीला कुटुंबीयांना स्मरणशक्तीतील हा बदल तणावामुळे झाला असावा असे वाटले.त्यामुळे त्यांनी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेतला. मात्र, स्मरणशक्ती अचानक कमी होणे हे एक गंभीर धोक्याचे लक्षण असल्याने पुढील न्यूरोलॉजिकल तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मर्यादित भागात रक्तपुरवठा

वॉकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल येथील कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉ. शीतल गोयल यांनी सांगितले की, स्मरणशक्तीमध्ये अचानक झालेल्या बदलाचे कारण शोधण्यासाठी मेंदूचा एमआरआय करण्याचा तातडीने सल्ला देण्यात आला. या तपासणीत थॅलेमसच्या अँटिरिअर न्यूक्लियसचा समावेश असलेल्या मर्यादित भागात रक्तपुरवठा खंडित झाल्याचे (इन्फार्क्ट) आढळले. त्यामुळे रुग्णाला अचानक जाणवणाऱ्या स्मरणशक्तीच्या समस्येचे कारण स्पष्ट झाले.

डॉ. गोयल म्हणाल्या, “स्मरणशक्ती अचानक कमी होणे हे नेहमीच तणावाशी किंवा मानसिक कारणांशी संबंधित असते असे समजू नये, विशेषतः जेव्हा हा बदल अचानक घडतो. या प्रकरणात शरीरात अशक्तपणा किंवा बोलण्यात अडचण नसल्यामुळे स्ट्रोकची शक्यता सहज लक्षात आली नसती. मात्र, लक्षणे अचानक सुरू होणे हे एक महत्त्वाचे धोक्याचे संकेत होते. एमआरआय तपासणीमुळे थॅलेमसच्या पुढील भागात रक्तपुरवठा खंडित झाल्याचे निदान झाले आणि रुग्णाच्या स्मरणशक्तीतील बिघाडाचे कारण स्पष्ट झाले.”

Skincare Routine: मान, कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा होईल कमी! अंघोळी करण्याआधी शरीराला लावा ‘हा’ बॉडी मास्क 

मेंदूच्या कोणत्या भागावर परिणाम

या प्रकरणातून स्ट्रोकमध्ये नेहमीच शरीरात अशक्तपणा जाणवतो असे नाही, हे अधोरेखित होते. मेंदूच्या कोणत्या भागावर परिणाम झाला आहे, यानुसार स्ट्रोकची लक्षणे वेगवेगळी असू शकतात. अचानक स्मरणशक्ती कमी होणे, दृष्टीमध्ये बदल होणे, वर्तनात किंवा व्यक्तिमत्त्वात बदल जाणवणे, बोलण्यात किंवा भाषा समजून घेण्यात अडचण येणे, चक्कर येणे, शरीराचा तोल जाणे किंवा अचानक बधिरपणा आणि संवेदनांमध्ये बदल होणे, अशी लक्षणेही स्ट्रोकमध्ये दिसू शकतात.

स्ट्रोकच्या उपचारांमध्ये प्रत्येक मिनिट महत्त्वाचे

न्यूरोलॉजिकल लक्षणे अचानक सुरू होणे हे एक महत्त्वाचे धोक्याचे संकेत आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करू नये. लक्षणे नेहमीच्या स्वरूपाची नसली किंवा स्ट्रोकची सर्वसामान्य लक्षणे दिसत नसली, तरी वेळेत वैद्यकीय तपासणी आणि मेंदूचे योग्य इमेजिंग केल्यास स्ट्रोकचे निदान होण्यास मदत मिळू शकते.

डॉ. गोयल पुढे म्हणाल्या, “स्ट्रोकच्या उपचारांमध्ये प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते. स्मरणशक्ती, दृष्टी, बोलणे, वर्तन, शरीराचा तोल किंवा संवेदनांमध्ये अचानक आणि कोणतेही स्पष्ट कारण नसताना बदल झाल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे. स्ट्रोकची ही कमी परिचित लक्षणे ओळखल्यास रुग्णांना वेळेत योग्य न्यूरोलॉजिकल उपचार मिळण्यास मदत होऊ शकते.”

Menopause: वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरात होतात ‘हे’ मोठे बदल, रजोनिवृत्तीच्या काळात स्वतःच्या आरोग्याची घ्या योग्य काळजी

Web Title: Sudden memory loss 60 year old man rare thalamic stroke sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 09:17 PM

Topics:  

  • brain tumor symptoms
  • Mumbai hospital
  • Old Age Couple
  • Symptoms

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.