वारंवार सांधे दुखतात? मग दह्यात मिक्स करून खा 'या' बिया, वयाच्या १०० व्या वर्षी हाडे राहतील मजबूत
चुकीचा आहार, कामाचा तणाव, आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, मानसिक तणाव, अपुरी झोप, पचनाच्या समस्या इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे कामाच्या धावपळीमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. हल्ली सांध्यांमधील किंवा हाडांमधील वेदना अतिशय सामान्य समस्या झाली आहे. वय वाढल्यानंतर शरीरातील कॅल्शियम हळूहळू कमी होऊन जाते. त्यामुळे लहान वयात सुद्धा हाडांमधील वेदना वाढू लागतात. तासनतास तास एका जागेवर बसून काम करत राहिल्यामुळे पाठ दुखणे, कंबर दुखणे, हाडांमध्ये वेदना होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. सांधे दुखीच्या समस्येकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. अन्यथा आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवतात.(फोटो सौजन्य – istock)
सर्दीमुळे सतत कान दुखतो? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, कानाच्या समस्या होतील कायमच्या दूर
दैनंदिन जीवनातील चुकीच्या सवयी आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे सांध्यांमध्ये वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार करणे आवश्यक आहे. हाडांमधील कॅल्शियम वाढवण्यासाठी आहारात बदल करणे सुद्धा आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हाडांमधील वेदना कमी करण्यासाठी दह्यात कोणत्या बिया मिक्स करून खाव्यात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या बियांच्या सेवनामुळे शरीराला कॅल्शियम आणि इतर आवश्यक पोषक घटक मिळतात.
अळशीच्या बियांचा वापर लाडू बनवण्यासाठी किंवा खीर बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. या बियांमध्ये फायबर आढळून येते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. मधुमेह आणि संधिवाताच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी नियमित एक चमचा अळशीच्या बियांचे सेवन करावे. अळशीमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि चांगले फॅट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. अळशीच्या बिया तव्यावर भाजून घ्या. बिया थंड करून मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पावडर तयार करा. तयार केलेली पावडर दह्यात मिक्स करून खाल्यास संधिवाताची समस्या कायमची दूर होईल आणि आरोग्य सुधारेल.
केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी भोपळ्याच्या बियांचे सेवन केले जाते. भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम आणि फॉस्फरस इत्यादी अनेक घटक आढळून येतात. शरीरातील हाडे मजबूत ठेवण्यासाठी भोपळ्याच्या बियांचे सेवन करावे. तसेच या बियांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते, ज्यामुळे मधुमेह किंवा उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येने त्रस्त असलेले लोक भोपळ्याच्या बियांचे सेवन करू शकतात. सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी नियमित एक चमचा भोपळ्याच्या बिया खाव्यात.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं सूर्यफुलाच्या बिया खायला खूप आवडतात. या बिया प्रामुख्याने मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांनी खाव्यात. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. सूर्यफुलाच्या बिया तुम्ही दह्यात मिक्स करून किंवा साल काढून नुसत्याच सुद्धा खाऊ शकता. यामुळे आरोग्य सुधारेल.
सांधेदुखीची सामान्य लक्षणे:
सांध्यांमध्ये वेदना, दुखणे किंवा अस्वस्थतासांधे ताठ होणे किंवा जड वाटणे, सूज, सांध्यांची हालचाल मर्यादित होणे.
सांधेदुखीची सामान्य कारणे:
हा सांध्यांचा विकार आहे, ज्यामध्ये ऑस्टियोआर्थरायटिस (Osteoarthritis) आणि संधिवात संधिवात (Rheumatoid Arthritis) हे सामान्य प्रकार आहेत. हाडांना फ्रॅक्चर होणे, सांधे निखळणे, स्नायूंना दुखापत होणे.
सांधेदुखीवरील घरगुती उपाय:
दुखणाऱ्या सांध्यांना आराम द्या, वेदना आणि सूज कमी करण्यासाठी थंड शेकचा वापर करा, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेदनाशामक औषधे घ्या.