सर्दीमुळे सतत कान दुखतो? मग 'हे' घरगुती उपाय करून मिळवा आरा
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवतात. साथीचे आजार झाल्यानंतर सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब किंवा आरोग्यासंबंधित इतरही अनेक समस्या उद्भवतात. पण सर्दी, खोकला झाल्यानंतर बऱ्याचदा कान दुखतो. कानामध्ये वाढलेल्या वेदनांमुळे काहीवेळा कहयोची=खूप जास्त तीव्र वेदना होतात. तर काहींच्या कानात बुरशी तयार होते. कानात निर्माण झालेल्या बुरशीमुळे कानाचे देडे बसतात. कानाच्या आतील भाग घसा आणि नाकाशी जोडणारी यूस्टेशियन ट्यूब असते. त्यामुळे सर्दी झाल्यानंतर नळीला सूज येते किंवा नळी बंद होते.यामुळे कानाच्या आतील भागावर जास्तीचा तणाव येतो आणि कानात वेदना होऊ लागतात. ही समस्या प्रामुख्याने सर्दी झाल्यानंतर उद्भवते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कान दुखीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे कानाच्या समस्या दूर होतील. (फोटो सौजन्य – istock)
वारंवार सर्दी, खोकल्यामुळे कानाच्या आतील भागात वेदना होत असतील तर सर्व प्रथम वाफ घ्यावी. वाफ घेतल्यामुळे नाकासोबत कानालासुद्धा आराम मिळतो. गरम पाण्याची वाफ घेतल्यामुळे नाक-घसा मोकळा होतो आणि कानावर वाढलेला तणाव कमी होण्यास मदत होते. याशिवाय हलक्या हाताने तेलाचा मसाज करावा. मसाज केल्यामुळे कानाच्या आतील स्नायूंना आराम मिळतो. तसेच घशाला आलेली सूज कमी करण्यासाठी गरम पाण्यात मीठ टाकून पाण्याच्या गुळण्या कराव्यात. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होईल. तसेच सर्दी खोकला झाल्यानंतर गरम पाणी पिणे, सूप आणि हळदीच्या दुधाचे सेवन करावे.
कान दुखत असल्यास कोणताही पदार्थ कानात थेट टाकू नये. यामुळे कानाला हानी पोहचू शकते. याशिवाय कान कोणत्याही पिन किंवा काठीने कोरू नये. कानात कोणतेही औषध किंवा तेल टाकण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अन्यथा कानाला आतून इजा होऊ शकते. तुम्हाला जर वारंवार सर्दी, खोकला होत असेल तर कानात कापसाचे छोटे छोटे गोळे करून घालावेत. यामुळे कानाच्या नाजूक त्वचेला हानी पोहचणार नाही. कान स्वच्छ ठेवणे शुद्ध तितकेच आवश्यक आहे.
कानात वाढलेल्या वेदना जास्त काळ टिकून राहिल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा कानासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. कानातून पाणी किंवा पस लागल्यास कोणतेही घरगुती उपाय करण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. तसेच कान नाक आणि घशाचा एकमेकांशी संबंध असतो. त्यामुळे कान दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर वेळीच घरगुती उपाय केल्यास वेदनांपासून आराम मिळेल.
कान दुखण्याची कारणे काय आहेत?
कान दुखण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की कानाचा संसर्ग (Otitis), कानात मळ साचणे, ॲलर्जी, दातांच्या किंवा जबड्याच्या समस्या, किंवा घशातील संसर्ग.
कानाचे संतुलन बिघडण्याची कारणे काय?
अंतर्कर्णाचे कार्य शरीराचे संतुलन राखणे हे असते. अंतर्कर्णाशी संबंधित समस्यांमुळे (उदा. मेनेयर रोग) चक्कर येणे किंवा संतुलन बिघडणे अशी लक्षणे दिसू शकतात.
कानाच्या मागे वेदना होत असल्यास काय करावे?
कानांच्या मागे वेदना होणे हे तणावपूर्ण डोकेदुखी, कानाचा संसर्ग, किंवा जळजळीमुळे असू शकते.