कंबर गुडघ्यांच्या वेदनांनी त्रस्त आहात? मग आहारात 'या' पद्धतीने करा मखाणाचे सेवन
वय वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात हाडांमधील वेदना, सतत कंबर दुखणे, गुडघे दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. जंक फूडचे अतिसेवन, धूम्रपान, अपुरी झोप, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात. हल्ली कमी वयातच अनेकांना कंबर दुखणे, हातापायांमधून मुंग्या येणे इत्यादी अनेक समस्या दिसून येतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. आहारात नेहमीच मखाणाचे सेवन करावे. मखाणा खाल्यामुळे आरोग्य सुधारते. संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर तेलकट किंवा तिखट पदार्थाचे सेवन करण्याऐवजी मखाणा खावा. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि शरीर कायमच निरोगी राहते. आज आम्ही तुम्हाला मखाणा खाण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. या पद्धतीने मखाणाचे सेवन केल्यास शरीरात अनेक बदल दिसून येतील.(फोटो सौजन्य – istock)
सर्दीमुळे सतत कान दुखतो? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, कानाच्या समस्या होतील कायमच्या दूर
मखाणामध्ये कॅल्शियम, फॉस्फर,मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात, ज्यामुळे कमकुवत झालेल्या हाडांना पोषण मिळते. शरीरात हाडे कायमच मजबूत ठेवण्यासाठी नियमित मखाणा खावा. यामुळे वजन सुद्धा नियंत्रणात राहते. दैनंदिन आहारात फायबर युक्त पदार्थांचे नियमित सेवन करावे. फायबर युक्त पदार्थ खाल्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते. वय वाढल्यानंतर हाडांमधील कॅल्शियम कमी होऊन जाते. कॅल्शियम कमी झाल्यानंतर हाडे सतत दुखतात किंवा हाडांमध्ये वेदना वाढतात.
हाडे कायमच मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी नियमित मखाणाचे सेवन करावे. मखाणा खाल्यामुळे हाडांना योग्य पोषण मिळते. हाडांसंबंधित ऑस्टिओपोरोसिससारख्या गंभीर आजारापासून शरीराचा बचाव करण्यासाठी मखाणा खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये कॅल्शियमव्यतिरिक्त मॅग्नेशियम, फॉस्फरस, प्रोटीन्स इत्यादी अनेक पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे नियमित मखाणा खावा. यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते. वाढलेले वजन कमी करताना भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी मखाणा खावा.
कढईमध्ये तूप गरम करून त्यात मखाणा भाजून घ्या. भाजून घेतलेल्या मखाणा थंड करून घ्या. त्यानंतर भाजलेल्या मखणांवर थोडे काळे मीठ, चाट मसाला किंवा जिरे पावडर टाकून तुम्ही खाऊ शकता. हा पदार्थ संध्याकाळच्या नाश्त्यात खाण्यासाठी अतिशय उत्तम आहे. याशिवाय मखाणापासून खीर आणि तिखट भाजीसुद्धा बनवली जाते.
मखाना म्हणजे काय?
मखाना म्हणजे कमळाचे बीज आहे, जे दिसायला पॉपकॉर्नसारखे असते. हे शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असून त्यात प्रथिने, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह यांसारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात.
मखाना खाल्यास शरीराला होणारे फायदे?
मखान्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, विटामिन आणि खनिजे असतात, जे शरीराला निरोगी ठेवतात. फायबर भरपूर असल्याने मखाना खाल्ल्याने पोट भरते आणि वारंवार भूक लागत नाही, त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.