कडू मेथी दाणे शरीरासाठी ठरतील वरदान! रोजच्या आहारात 'या' पद्धतीने करा सेवन
जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी मेथी दाण्यांचा वापर केला जातो. बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. सतत काम करत राहिल्यामुळे शरीराकडे दुर्लक्ष होते. यामुळे कोलेस्ट्रॉल, मधुमेह किंवा उच्च रक्तदाब वाढण्याची जास्त शक्यता असते. आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. जेवणातील पदार्थांमध्ये प्रामुख्याने वापरला जाणारा पदार्थ म्हणजे मेथी दाणे. मेथी दाण्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मेथी दाण्यांचे पाणी प्यावे. यामध्ये प्रथिने, लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम तसेच जीवनसत्त्व ए , सी ,के, फॉलिक ऍसिड मोठ्या प्रमाणावर आढळून येते. यामुळे अनेक आजारांपासून शरीराचा बचाव होतो.(फोटो सौजन्य – istock)
साथीच्या रोगांचं थैमान; डेंग्यू 113, मलेरिया 100, चिकनगुनियाचा कहर; रुग्णसंख्येतही वाढ
बऱ्याचदा तिखट किंवा अतितेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. पचनक्रिया बिघडल्यानंतर गॅस, अपचन किंवा बद्धकोष्ठता वाढते. शरीरात वाढलेल्या बद्धकोष्ठतेमुळे आतड्यांमध्ये विषारी घटक तसेच साचून राहतात, ज्यामुळे वारंवार आंबट ढेकर येणे, अपचन इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. वारंवार बद्धकोष्ठता होत असेल तर मेथी दाण्यांचे पाणी प्यावे. यासाठी एक ग्लासात पाण्यात अर्धा चमचा मेथी दाणे भिजत घालून ठेवा. रात्रभर भिजल्यानंतर सकाळी उठून पाण्याचे सेवन केल्यास आतड्यांमधील घाण स्वच्छ होण्यासोबतच शरीर सुद्धा डिटॉक्स होईल आणि तुमचा संपूर्ण दिवस आनंदात जाईल.
रक्तात वाढलेल्या साखरेमुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. सतत लघवीला होणे, अंगाला खाज येणे, सतत तहान लागणे किंवा चक्कर येणे इत्यादी लक्षणे शरीरात दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. यासोबतच मेथी दाण्यांच्या पाण्याचे सेवन केल्यास रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात राहील. दाण्यांमध्ये असलेल्या लोह व कॅल्शियममुळे शरीराची कमी झालेली ताकद वाढते. पण अतिप्रमाणात मेथी दाण्यांचे सेवन केल्यास रक्तातील साखर पूर्णपणे कमी होऊ शकते.
सकाळी उठल्यानंतर नियमित फॉलो करा ‘या’ सवयी! चेहऱ्यावरील घाण होईल कायमची स्वच्छ, वाढतील आनंदी हार्मोन
मेथीचे दाणे आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांसाठी सुद्धा गुणकारी ठरतात. चेहऱ्यावर आलेले पुरळ, पिंपल्स किंवा डाग कमी करण्यासाठी मेथी दाण्यांचा वापर करावा. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि इतर गुणधर्म त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी मदत करतात. वाढत्या वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी मेथी दाण्यांचा वापर करावा. केसांमध्ये कोंडा झाल्यास मेथी दाण्यांची पेस्ट तयार करून केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकापर्यंत सगळीकडे लावावी. यामुळे केसांमधील कोंडा कमी होतो.
मेथी दाणे खाण्याचे फायदे?
मेथीमधील फायटोएस्ट्रोजेन्स आणि डायोजेनिन शरीरातील इस्ट्रोजेनची नक्कल करतात, मासिक पाळी आणि रजोनिवृत्ती दरम्यान हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करतात. हे अनियमित मासिक पाळी नियंत्रित करण्यास मदत करते आणि मासिक पाळीच्या वेदना आणि अस्वस्थता कमी करते.
कोलेस्टेरॉल म्हणजे काय?
कोलेस्टेरॉल हा एक मेणासारखा पदार्थ आहे, जो यकृतामध्ये तयार होतो आणि काही पदार्थांमध्ये देखील आढळतो. शरीरातील पेशींसाठी आणि संप्रेरके (hormones) बनवण्यासाठी हे आवश्यक आहे.
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याचे मार्ग:
कार्बोहायड्रेटचे सेवन नियंत्रित करणे, फायबरचे सेवन वाढवणे.नियमित व्यायाम करणे, ताण व्यवस्थापित करणे आणि पुरेशी झोप घेणे.