Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संडे स्पेशल : रविवारची सुरुवात रंगदार करा; घरी बनवा खमंग, कुरकुरीत तव्यावर भाजलेली ‘मांदेली रवा फ्राय’

Mandeli Rava Fry Recipe : सी-फूड लव्हर्ससाठी मांदेली म्हणजे जीव की प्राण... महाराष्ट्रात अनेक खाद्यप्रेमींना याची चव फार आवडते. मसाला आणि रव्याच्या कोटिंगमध्ये खमंग तळलेला हा मासा साध्या वरण-भातासोबतही अप्रतिम लागतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 28, 2025 | 09:30 AM
संडे स्पेशल : रविवारची सुरुवात रंगदार करा; घरी बनवा खमंग, कुरकुरीत तव्यावर भाजलेली 'मांदेली रवा फ्राय'

संडे स्पेशल : रविवारची सुरुवात रंगदार करा; घरी बनवा खमंग, कुरकुरीत तव्यावर भाजलेली 'मांदेली रवा फ्राय'

Follow Us
Close
Follow Us:
  • कोकण किनारपट्टीवर आढळणारी मांदेली महाराष्ट्रात खूप फेमस.
  • मांदेलीला अनेक प्रकारे बनवले जय शकते पण खमंग तळून तयार केलेली मांदेली सुंदरच लागते.
  • गरमा गरम डाळ भातासोबत खाल्ल्यास तर याची चव आणखीन छान लागते.
महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर आढळणारी मांदेली मासळी ही लहान असली तरी चवीला अतिशय खमंग आणि पौष्टिक मानली जाते. कोकण, मुंबई, ठाणे आणि आसपासच्या भागात मांदेली मासळीचे विविध प्रकार बनवले जातात, पण त्यातला सर्वात लोकप्रिय आणि घराघरात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे मांदेली रवा फ्राय. मांदेलीला फारशी मसालेदार तयारी लागत नाही. अगदी कमी मसाल्यांमध्येही तिची नैसर्गिक चव अप्रतिम लागते. रव्यामध्ये घोळवून तव्यावर तळलेली मांडेली बाहेरून खमंग, कुरकुरीत आणि आतून मऊ लागते.

Recipe : व्हेजिटेबल सामोसा सोडा, घरी बनवा ज्युसी, मसालेदार आणि कुरकुरीत असा ‘चिकन सामोसा’

पावसाळा किंवा हिवाळ्याच्या दिवसांत गरमागरम मांदेली रवा फ्रायसोबत कांद्याची कोशिंबीर, लिंबाचा रस आणि गरम भाकरी किंवा भात असला की जेवणाची मजाच काही औरच असते. हा पदार्थ झटपट तयार होतो, कमी तेलात करता येतो आणि प्रथिनांनी भरपूर असल्यामुळे आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. विशेष म्हणजे पाहुणे अचानक आले तरी कमी वेळात तयार होणारा हा मासळीचा पदार्थ सर्वांची वाहवा मिळवतो. चला तर मग, घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मांदेली रवा फ्राय रेसिपी जाणून घेऊया.

 साहित्य

  • मांदेली मासळी – 250 ग्रॅम (स्वच्छ करून धुतलेली)
  • हळद – ½ टीस्पून
  • लाल तिखट – 1 टीस्पून (चवीनुसार)
  • मीठ – चवीनुसार
  • लिंबाचा रस – 1 टीस्पून
  • आले-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
  • रवा – ½ कप
  • तांदळाचे पीठ – 2 टेबलस्पून (ऐच्छिक, अधिक कुरकुरीतपणासाठी)
  • तेल – तळण्यासाठी
चहा कॉफी पिणे कायमचे जाल विसरून! सकाळच्या नाश्त्यात प्या गरमागरम पौष्टिक कुळीथ सूप, सर्दी खोकल्यावर जबरदस्त उपाय

कृती

  • सर्वप्रथम मांदेली मासळी स्वच्छ करून पाण्याने स्वच्छ धुवा.
  • एका भांड्यात मासळीमध्ये हळद, लाल तिखट, मीठ, आले-लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस घालून चांगले मिक्स करा.
  • ही मसाल्याची मांदेली 10–15 मिनिटे मुरण्यासाठी ठेवा.
  • दुसऱ्या प्लेटमध्ये रवा आणि तांदळाचे पीठ एकत्र करा.
  • मुरलेली मांदेली एक एक करून रव्यामध्ये नीट घोळवा.
  • तव्यावर मध्यम आचेवर तेल गरम करा आणि त्यात रव्याचे कोट केलेली मांदेली सावकाश ठेवा.
  • दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  • अतिरिक्त तेल निघण्यासाठी टिश्यू पेपरवर काढा.
  • गरमागरम मांदेली रवा फ्राय कांदा, लिंबाची फोड आणि हिरवी मिरचीसोबत सर्व्ह करा.
  • भाकरी, चपाती किंवा वरण-भातासोबतही हा पदार्थ अप्रतिम लागतो.

Web Title: Sunday special make delicious crispy mandeli rava fry at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 09:30 AM

Topics:  

  • Fish market
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : व्हेजिटेबल सामोसा सोडा, घरी बनवा ज्युसी, मसालेदार आणि कुरकुरीत असा ‘चिकन सामोसा’
1

Recipe : व्हेजिटेबल सामोसा सोडा, घरी बनवा ज्युसी, मसालेदार आणि कुरकुरीत असा ‘चिकन सामोसा’

Recipe : पश्चिम बंगालमधील फेमस पदार्थ, मसालेदार अन् कुरकुरीत असा ‘आलू चॉप’ तुम्ही कधी खाल्ला आहे का?
2

Recipe : पश्चिम बंगालमधील फेमस पदार्थ, मसालेदार अन् कुरकुरीत असा ‘आलू चॉप’ तुम्ही कधी खाल्ला आहे का?

साधा, सोपा पण चवीला मजेदार असा स्ट्रीट स्टाईल ‘अंडा बर्गर’, हलक्या भुकेला शमवण्यासाठी परफेक्ट पर्याय
3

साधा, सोपा पण चवीला मजेदार असा स्ट्रीट स्टाईल ‘अंडा बर्गर’, हलक्या भुकेला शमवण्यासाठी परफेक्ट पर्याय

हिवाळ्यात आवर्जून बनवा पंजाबचा फेमस पदार्थ ‘सरसो दा साग’, चवीसह शरीरालाही मिळवून देईल अनेक फायदे
4

हिवाळ्यात आवर्जून बनवा पंजाबचा फेमस पदार्थ ‘सरसो दा साग’, चवीसह शरीरालाही मिळवून देईल अनेक फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.