Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दर आठवड्याला २ ते ३ महिलांमध्ये आढळतात रक्तस्त्रावासंबंधी विकारांची लक्षणे; वेळीच निदान आणि जनजागृतीची अत्यावश्यकता

महिलांमध्ये आढळणाऱ्या आणि अनेकदा दुर्लक्ष केल्या जाणाऱ्या विकारांपैकी एक म्हणजे ‘व्हॉन विलिब्रँड डिसीज’ हा एक आनुवंशिक आजार आहे. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून शरीराची काळजी घ्यावी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 11, 2026 | 01:12 PM
दर आठवड्याला २ ते ३ महिलांमध्ये आढळतात रक्तस्त्रावासंबंधी विकारांची लक्षणे; वेळीच निदान आणि जनजागृतीची अत्यावश्यकता

दर आठवड्याला २ ते ३ महिलांमध्ये आढळतात रक्तस्त्रावासंबंधी विकारांची लक्षणे; वेळीच निदान आणि जनजागृतीची अत्यावश्यकता

Follow Us
Follow Us:

पुणे:  रक्त गोठण्यास मदत करणाऱ्या घटकांच्या (क्लॉटिंग फॅक्टर) कमतरतेच्या महिला रुग्णांमध्ये वाढ होत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. अनेक महिलांना या आजाराबाबत माहिती नसते, कारण त्याची लक्षणे सामान्य मासिक पाळीशी संबंधित समस्यांप्रमाणे भासतात. या विषयावर फारशी चर्चा देखील केली जात नाही मात्र वेळीच निदान न झाल्यास गंभीर धोके निर्माण होऊ शकतात. त्यामुळे महिलांनी असामान्य रक्तस्त्राव आणि आरोग्याच्या लक्षणांकडे वेळीच अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.(फोटो सौजन्य – AI)

तंबाखू खाऊन कुजलेले दात आठवडाभरात होतील स्वच्छ! ५ रुपयांच्या तुरटीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, दातांच्या समस्या होतील गायब

महिलांमध्ये आढळणाऱ्या आणि अनेकदा दुर्लक्ष केल्या जाणाऱ्या विकारांपैकी एक म्हणजे ‘व्हॉन विलिब्रँड डिसीज’. हा एक आनुवंशिक आजार आहे. या विकारामुळे रक्त योग्यरित्या गोठत नाही. याशिवाय काही महिला हिमोफिलियाच्या वाहक (carrier) असू शकतात किंवा यकृताचे आजार, संसर्ग, हार्मोनल असंतुलन किंवा व्हिटॅमिन के च्या कमतरतेमुळेही रक्त गोठण्याच्या समस्या उद्भवू शकतात.

क्लॉटिंग फॅक्टरची कमतरता म्हणजे शरीरात रक्तस्त्राव थांबवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रथिनांची कमतरता. महिलांमध्ये ही समस्या आनुवंशिक असू शकते, जसे की हिमोफिलियाचे वाहक असणे किंवा इतर रक्तस्त्रावाशी संबंधित आनुवंशिक विकार. यकृताच्या समस्या, संसर्ग, हार्मोनल बदल किंवा व्हिटॅमिन के च्या कमतरतेमुळेही हा विकार उद्भवू शकतो.

या विकाराची लक्षणे अनेकदा दुर्लक्षित केली जातात किंवा सामान्य लक्षणं समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. महिलांना असामान्य किंवा दीर्घकाळ मासिक पाळी येणे, वारंवार शरीरावर निळे डाग पडणे, हिरड्यांतून रक्त येणे किंवा किरकोळ दुखापत अथवा उपचारानंतरही जास्त रक्तस्त्राव होणे अशी लक्षणे दिसू शकतात. काही प्रकरणांमध्ये प्रसूतीनंतर किंवा स्त्रीरोगविषयक शस्त्रक्रियेनंतरही दीर्घकाळ रक्तस्त्राव होऊ शकतो. ही लक्षणे सामान्य मासिक पाळी किंवा हार्मोनल समस्यांप्रमाणे समजून दुर्लक्षित केली जातात, असे मत लुल्लानगर, पुणे येथील मदरहुड हॉस्पिटल्सच्या वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पद्मा श्रीवास्तव यांनी व्यक्त केले.

डॉ. पद्मा पुढे सांगतात की, दर आठवड्याला सुमारे २ ते ३ महिला अशा लक्षणांसह उपचारासाठी येत आहेत. या रुग्णसंख्येत वाढ होण्यामागे अचुक निदान, वाढती जनजागृती तसेस आहाराच्या चुकीच्या सवयी, तणाव आणि इतर आरोग्यविषयक समस्या यांसारखे जीवनशैलीशी संबंधित घटक कारणीभूत ठरतात. निदानास होणारा विलंब हे देखील एक मोठे आव्हान आहे, कारण अनेक महिला या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात किंवा डॉक्टरांकडे जाण्यास उशीर करतात.

रक्तात वाढलेल्या साखरेमुळे अंगाला सतत खाज येते? मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

त्या पुढे म्हणाल्या, या विकारावर उपचार त्याच्या तीव्रतेनुसार केले जातात. यात क्लॉटिंग फॅक्टर रिप्लेसमेंट थेरपी, रक्तस्त्राव नियंत्रित करणारी औषधे आणि नियमित तपासणी यांचा समावेश होतो. योग्य उपचार आणि काळजी घेतल्यास बहुतांश महिला निरोगी आणि सक्रिय आयुष्य जगू शकतात. त्यामुळे महिलांनी असामान्य किंवा अति रक्तस्त्रावाकडे गांभीर्याने पाहून वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा. वेळीच निदान झाल्यास गुंतागुंत टाळता येते आणि जीवनमान सुधारते.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: महिलांमध्ये रक्तस्त्रावासंबंधी विकार म्हणजे काय?

    Ans: रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्यास किंवा रक्तस्त्राव थांबण्यास वेळ लागल्यास त्याला रक्तस्त्रावासंबंधी विकार म्हटले जाते.

  • Que: महिलांमध्ये रक्तस्त्रावाच्या विकारांची कोणती लक्षणे दिसू शकतात?

    Ans: मासिक पाळीत जास्त रक्तस्राव होणे, जखम झाल्यानंतर रक्त जास्त वेळ वाहणे, वारंवार निळे डाग पडणे, नाकातून रक्त येणे किंवा हिरड्यांतून रक्तस्राव होणे अशी लक्षणे दिसू शकतात.

  • Que: मासिक पाळीत जास्त रक्तस्राव होणे नेहमीच सामान्य असते का?

    Ans: नाही. खूप जास्त रक्तस्राव, दीर्घकाळ पाळी राहणे किंवा वारंवार जास्त रक्त जाणे हे काही वेळा रक्तस्त्रावाच्या विकारांचे संकेत असू शकतात.

Web Title: Symptoms of bleeding disorders found in 2 to 3 women every week urgent need for timely diagnosis and public awareness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • menstruation health
  • women health

संबंधित बातम्या

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा
1

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
2

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.